कॅटेगरी: नोंद

महिला आरक्षण

घरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक्स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत. काल मी शिवाजीनगरला मित्रांना भेटायला बस मधून जाताना लेडीज सीटवर बसून प्रवास केला. बऱ्याच दिवसांनी असा लेडीज सीट प्रवास केला. खूप टेन्शन होत. म्हटलं कोणी महिलेने येऊन उठायला सांगितलं तर उठावे लागेल. तस म्हटलं तर बसमध्ये डाव्या बाजूच्या सगळ्या सीट महिलांसाठी ‘आरक्षित’ असतात. कदाचित पुण्यातील अनेकांचा या ‘आरक्षणाला’ तात्त्विकदृष्ट्या विरोध आहे. उदाहरण पहायचं असेल तर ‘अग बाई अरेच्या’. पण माझा तरी सगळ्याच ठिकाणी महिला आरक्षणाला विरोध नाही. (more…)

बडी बेगम

परवा म्हणे दरबार भरला होता. मलिका ए हिंदोस्तान बडी बेगम त्यावेळी रयतेवर चिडल्या. ‘काय लावलाय महागाई आणि कर वाढ? कधी बघावे त्यावरच रयतेच रडण आपल चालूच. काय दुसरा धंदा आहे की नाही?’ सगळे सरदार जमा झाले होते. प्रत्येकाने आपआपले अर्ज दरबारात सादर केले. आता बाकी काही नाही ना म्हणून अर्ज. मग बडी बेगमने त्यांच्या शुद्ध आणि स्पष्ट भाषेत सगळ्यांना आदेश दिला की जा आणि माझ्या रयतेला सांगा की ‘हे सगळ कोणासाठी चालल आहे?’ एकाने मध्येच ‘पंजासाठी’. मग मलिका ए हिंदोस्ता आणखीन भडकल्या ‘अरे फुलांनो, आम रयतेसाठी चालल आहे’. अस म्हटल्यावर सगळ्या सरदारांनी मान डोलावून होकार दिला. पुढे बडी बेगम म्हणाल्या ‘आम्ही काय नाही केल? बॉम्बस्फोट काय असतो. कसा असतो. कधी बघितला होता काय? आम्ही तुम्हाला ‘होम डिलीव्हरी’ दिली. अतिरेकी कसा असतो. हे कधी उघड्या डोळयांनी पाहिलं होत का? त्याचा चेहरा कधी पहिला होता का? बघा आमच कसब.’ (more…)

क्षमा असावी

माझ्या त्या एका ओळीच्या इमेलमुळे आणि त्यामुळे पुढे आलेल्या प्रतिक्रियांमुळे अनेकांना त्रास झाला आहे. झालेला प्रकार खुपंच दुर्दैवी होता. सुरवात माझ्यामुळे झाली असल्याने याला संपूर्णपणे मीच जबाबदार आहे. तुम्हाला घडलेल्या त्रासाबद्दल मी तुमच्या सर्वांची हात जोडून क्षमा मागतो. यापुढे परत कधी हा प्रकार माझ्याकडून घडणार नाही याची मी काळजी घेईल. आपण सर्वांना झालेल्या त्रासाचा, मनस्तापाचा आणि वाया गेलेल्या वेळेचा कोणत्याही प्रकाराने भरून काढणे शक्य नाही हे मी जाणतो. यावर आलेले इमेल आणि त्यावर आलेल्या नोंदी, प्रतिक्रिया मी वाचल्या आहेत. अनेकांनी ‘मुर्ख’ वगैरे शब्द प्रयोग वापरले आहेत. अनेकांचे कामात आलेल्या व्यत्ययामुळे खूप त्रागा झाला आहे. अनेकांच्या कंपनीच्या इमेल आयडी असल्याने त्यांना कामात त्रास झाला. (more…)

पी जे

एक महिन्यापासून रोज दर दहा मिनिटांनी ‘आप सुन रहें है पुणे का नंबर वन…’ ‘और मै हू..’. ऐकतो आहे. त्या एफ एम वर चांगली गाणी चालू असतात. आणि हे मधेच ‘बजाते रहो’ नाही तर ‘बल्ले बल्ले’ अस काहीस वाक्य घुसडतात. आणि गाण्याचा आस्वाद घेत असताना हे मधेच काही तरी पांचट जोक मारतात. हसू येण्याऐवजी राग येतो. त्यात तो ‘घंटा सिंग’. त्याच्या फोनपेक्षा मोबाईल कंपन्यांचे जाहिरात परवडली. इतकी तरी डोकेदुखी होत नाही. हे आर जे कुठून पकडून आणतात देव जाणे. मधेच मराठी आणि मधेच हिंदी. निदान एका भाषेत बोला. पण गाणी हिंदी. गाणे चालू असताना मधेच ‘हाये..’ आता हे काय? बर तो त्यांचा टाईमचेक पण अनेक वेळा चुकीचा. त्यात लवगुरु बद्दल काही विचारूच नका. सगळ्यांना एकच सल्ला ‘तिचा सरळ विचार, नाही म्हणाली तर दुसरी’. ‘क्या आप व्हर्जिन है? अगर हो तो मुझे कॉल करो और जितो..’ बर अस म्हणणारी एखादी मुलगी आर जे. (more…)

स्वप्न

पहाटे एक स्वप्न पडलं होत. ‘ती’च्या वडिलांनी तीच्या लहान बहिणीसाठी एक स्थळ पसंत केल. आणि तिचा सुद्धा याला होकार होता. यार असली स्वप्न पहाटे का पडतात? मी मुंबईला नोकरी जाण्याआधी एकदा एक स्वप्न पडलं होत की मी एका माझ्यापेक्षा वरच्या दर्जाच्या माणसावर रागावतो आहे. आणि ते स्वप्न सात महिन्यांनी खरं झाल होत. एकदा मुंबईच्या कंपनीतील माझा बॉस मला दर दहा मिनिटांनी काम किती झाल अस सारखं विचारात होता. आणि त्यावेळी मी त्याला रागाच्या भरात ‘झाल की सांगतो’ अस म्हटलं. सगळ स्वप्नात घडल्याप्रमाणे घडल. गोष्ट घडून गेल्यावर ही गोष्ट आधी कुठे तरी पाहिलेली अस वाटायला लागल. मग लक्षात आल की हे आधी मी स्वप्नात बघितलं होत. (more…)

परत चूक

यार परत चूक झाली. काल सकाळी माझी सिनिअर मला बरंच काही बोलली. पण मला काहीच नाही कळलं. माझ्या संगणकावर ते भंगार इंटरनेट एक्सप्लोरर आहे. त्यावर मी केलेलं काम बरोबर दिसत होत. आणि काम बरोबर चालू आहे म्हणून मी देखील निश्चिंत होतो. पण घरी आल्यावर बघितलं तर बाकीच्या ब्राउझरमध्ये बिघडलेल. मग माझ्या लक्षात आल की ती एवढी का भडकली होती. बर त्यांना मला ती हवी असलेली सोफ्टवेअर मागितलेली होती. पण एवढी मोठी कंपनी. आणि पैसे लागतात म्हटलं की नाही म्हणाले. बर कसे बसे दोन सोफ्टवेअर दिलेत. बर ते इन्स्टाल करायला किती वेळ लागतो. दहा मिनिटांच काम. दोन आठवड्यांनी एक सोफ्टवेअर टाकल. आणि अजून दुसऱ्या सॉफ्टवेअरला बहुतेक मुहूर्त पाहून टाकणार असतील. मला माझ झालेलं काम सगळ्या ब्राउझरच्यामध्ये बघण्यासाठी आधी एक ‘अडोब’चे सोफ्टवेअर मिळते. ते मागितले. पण दिले नाही. आणि आता त्या चुकलेलं काम परत करा. असल् डोक दुखत आहे ना. सोफ्टवेअर देणार नाहीत. आणि चुका का झाल्या असा उलट प्रश्न विचारणार. आता आज मी माझ्या सिनिअराला झापणार आहे. (more…)

होली का?

काल सकाळी इमारतीच्या बाजूच्या मोठ्या आवाजातील गाणी आणि धांगडधिंगाने जाग आली. बाहेर येऊन बघितलं तर ‘धुळवड’ चाललेली. अरे नाही ‘होळी’, नाही नाही ‘होली’. मग समजलं, पुण्यात ‘होळी’ सणापेक्षा मोठा सण साजरा होतो तो ‘होली’. माझी लहान भाऊ बहिण परवा रात्री माझ्या घरी सुट्टीला आले होते. भाऊ काल पर्यंत होता. पण लहान बहिण ताबडतोप घरी गेली. मला वाटल की काही तरी काम असेल. नंतर कळले ती तो ‘होली’ साजरा करायला गेली. गावी असताना आम्ही गल्लीतील होळीच्या बाजूचा चिखल होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळायचो. आणि सुट्टी देखील धुळवडीची मिळायची. मस्त मजा यायची. आई त्या होळीच्या विस्तवावर पाणी गरम करून घेऊन जायची. आणि आम्ही सगळे एकमेकांना झालेला चिखल मारण्यात आणि त्यात लोळवण्यात दंग असायचो. अजूनही गावी आणि नगरमध्ये असेच चालते. (more…)

चर्चेखेरीज अन्य पर्याय नाही

आजोबांनी कालच आम्ही भांडू शकत नाहीत. आणि गप्पा मारणे याखेरीच काही पर्याय नाही अस स्पष्ट केल. आता सौदी अरेबियात आहेत. काही नाही थोडी हवा पालट. अस कस तीन दिवस सुट्टी नाही का? आजोबा २७ तारखेपासून एक मार्च पर्यंत आहेत तिथे. तिथल वातावरण चांगल आहे म्हणे. पण यावेळी आजोबा खूप वेळ भारतात होते. याआधी हवामानाच काही तरी चर्चा होती म्हणे त्या कोपनहेगनमध्ये. आता आपल्या इथलं उष्ण तापमानामुळे अस जाव लागत. दोन दिवस होते. सतरा आणि अठरा डिसेंबरला. पण तिथला हवामान बिघडलं म्हणून मग ते लवकर इथ आले. त्या आधी आपल्या जवळच्या रशियात गेले होते. सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर. पण खुपच थंडी होती म्हणे तिथे. बर आजोबांचे वय काय आणि असा धावता प्रवास म्हटल्यावर दगदग होते. रोज काय केल हे आजोबा आजींना सांगतात हो. मग आजी म्हणाल तसचं बोलतात. आणि ह्या वयात काय आणि कसल्या गोष्टींची अपेक्षा करतात तुम्ही नातवंड? ते काही नाही, आजोबा शेजारच्यांनी भांडणार वगैरे काही नाही. (more…)

सुट्ट्यांचा देश

काल त्या महानगरपालिकेच्या ‘माहिती अधिकार’ विभागात अर्ज देण्यासाठी गेलो. बर, चिंचवडमधील ‘माहिती अधिकार’ विभागाचे कार्यालय चाफेकर चौकात. पण हेच ते कार्यालय हे त्या त्याच्या बाजूच्या रिक्षावाल्याला देखील माहित नव्हते. तासभर फिरल्यावर शेवटी मला त्या बसपास केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगतले. बर जाऊनही काही फायदा झाला नाही. सुट्टी होती. तीन दिवस सुट्टी आहे. तशी मलासुद्धा तीन दिवस सुट्टी आहे. जगात सगळ्यात जास्त सुट्ट्या आपल्या देशात मिळतात अस मी एका वर्तमानपत्रात वाचाल होत. खर आहे. त्या बसपास केंद्रातील अधिकाऱ्याला विचारलं की ‘माहिती अधिकार’ कार्यालयाला कधी सुट्टी असते? तो म्हणाला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. आणि रविवारी आठवड्याची सुट्टी. बर म्हणून महानगरपालिकेत गेलो तर तिथे देखील तेच. तिथून निघाल्यावर सुट्ट्याबद्दल विचार करत होतो. ते रेशनकार्ड वेळी देखील असंच. मागील वर्षी चौकशी गेलो की आता काय तर अमुक अमुक जयंती नंतर गेलो तर यांची पुण्यतिथी. नंतर काय तर दिवाळी. मग काय तर नाताळ. मस्त आहे. (more…)

नेट आहे तुजपाशी

काल कंपनीत काम करत असताना खूप अडचणी आल्या. एक तर दोन महिने काही काम दिल नाही. आणि आता दिल तर ते ताबडतोप हव. आता नुसत बसून राहिल्याने माझ्या कामाचा वेग कमी झाला आहे. मग त्यात एखादी नवीन गोष्ट आली की माझी गोची होऊन जायची. मग काय नेट जिंदाबाद. थोड फार शोधल की अडलेल काम कस करायचं याची सगळी माहिती यायची. त्यामुळे दिवसभर शोध मोहीम आणि काम मस्त झाल. आणि अनेक नवीन गोष्टी समजल्या. संध्याकाळी घरी आल्यावर इंग्लिश स्पिकिंगाची काही माहिती घ्यावी म्हणून संगणकावर बसलो. तर वर्षभर पुरतील एवढी माहिती. आता काय गरज आहे ‘इंग्लिश स्पिकिंग’ क्लासची? आणि सराव करायचा झाला तर आहेच ना ‘कस्टमर केअरवाले’. अजून काय हव आहे? फक्त सुरवात करायची गरज आहे. कुठेही जाऊन पैसे खर्च करायची गरज नाही. (more…)