कॅटेगरी: नोंद

झोप

आई गावी गेल्यापासून सगळाच गोंधळ चालू आहे. रात्री झोपायला उशीर. आणि मग उठायला सुद्धा उशीर. आणि त्याचा परिणाम सगळीकडे होत आहे. काल कहर झाला. उठलो नऊ वाजता. दहाच्या कंपनीच्या बससाठी गेलो. बस आली, आणि मग लक्षात आल की माझ ओळखपत्र, बसपास आणि कंपनीच एक्सेस कार्ड विसरलं म्हणून. मग परत मागे फिरव तर बस जाईल. आणि कंपनीत जायला आणखीन उशीर होईल. शेवटी बसमध्ये बसलो. आजकाल रोज काही ना काही नवीन घडते. त्या माझ्या थांब्यावर माझ्यासोबत आणखीन एक जण बस मध्ये चढला. आणि नंतर माझ्या.. चुकून त्याच्याकडे बघून ओळख दाखवली आणि काय तो सुरूच झाला. कुठून त्याला ओळख दाखवली अस झाल. माझा बसमध्ये बसल्यावर ‘झोप’ हा एक कलमी कार्यक्रम चालू असतो. (more…)

रेल्वे

काल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल प्रवाश्यांचे हाल झाले. तस हा योगायोग जरी घडला असला तर ममताजींनी जे बजेट सादर केल ते खरच खूप चांगल होत. मुंबईत एकशे एक नवीन लोकल, मुंबई शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस सारख्या अनेक गाड्या सुरु केल्या आहेत. ममताजींनी जे केल त्यामुळे खर तर त्याचं अभिनंदन करायला हव. आज मी त्यांना ‘धन्यवाद’ चा एक इमेल टाकणार आहे. जमल्यास तुम्हीही टाका. (more…)

जंगलराणीच अभिभाषण

माननीय सदस्य ‘प्राणी’ गण,
या नव्या दशकात दोन्ही गुहेतील पहिल्या सत्राला आपण सगळे उपस्थित आहात. मी तुमचे स्वागत करते (म्याऊ..). मला हा विश्वास आहे की तुम्ही सर्व जण या जंगलाला समृद्धीच्या दिशेने आणि विश्वात एका उच्च जागी नेण्यासाठी समर्पित होऊन काम कराल आणि गौरवपूर्ण दशक बनवाल. पुढे अजून शिकारी करायच्या आहेत म्हणून तुमच लक्ष अपेक्षित आहे.

मी त्या मुंग्यांच्या कुटुंबियासाठी दुखः प्रकट करते ज्यांचे प्रियजन पुण्याच्या दहशदवादी हल्ल्यात गमावलेले आहेत. नक्षली लांडग्यांची हिंसा पश्चिम बंगालच्या जंगलात चालूच आहे. ज्यात अनेक निष्पाप प्राणी मारले गेले आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला त्याविरुद्ध लढण्याला अधिक दृढ करतात. माझे ‘मनीसिंह’ च्या सरकारने त्या नक्षली लांडग्यांना हिंसा सोडून गप्पा मारायचा बोलावलं आहे. प्राण्यांच्या प्रशासनाला सुदृढ करणे आणि सर्वांगीण लाभ देण्याची योजना आमच्या दृढ ध्येय्याने चालू राहतील. (more…)

मेट्रो

पुण्यात ‘मेट्रो’ रेल्वेचा प्रकल्प सुरु होणार आहे. खर्च दहा हजार कोटी. या शनिवारी आमच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आठ टक्के करवाढ मंजूर करून घेतली आहे. १०५ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवकांनी करच्या बाजूने मतदान केले. आणि अनेक नगरसेवक गैरहजर राहिल्याने तो प्रस्ताव मंजूर झाला. आता तो जो ‘मेट्रो’ रेल्वे प्रकल्प सुरु करण्याचा हट्ट आमच्या दोन्ही महानगरपालिकांनी घेतला आहे त्यापैकी एकाही महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. काल परवापर्यंत बीआरटी च्या बसेस ३३० कोटी खर्च करून १५०० बसेस खरेदी या दोन्ही महानगरपालीकेंना जास्त खर्चिक वाटत होत्या. आता दहा हजार कोटी ही रक्कम लहान वाटत आहे. काय गणित आहे कुणास ठाऊक? बर स्वारगेट ते वाकडेवाडी मध्ये याचा पहिला टप्पा होणार आहे. इथे रस्त्याला जागाच नाहीत. आणि हे भुयारी मार्ग कुठून काढणार देव जाणे. (more…)

गाव

नगर जिल्हातील वांबोरी नावच गाव आहे. या शनिवारी सकाळी शिवाजीनगरहून नगर बस पकडली. ‘विनाथांब’ बस होती. सहाच प्रवासी बसमध्ये. एक चालक, एक वाहक पकडून आठ. व्ही.आय.पी असल्याप्रमाणे वाटत होत. पुणे नगर महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सव्वा दोन तासात नगरला. नगरहून ‘वांबोरी’ बस पकडली. घरी गेल्यावर नेहमी प्रमाणे ‘वीज’ नव्हती. संध्याकाळी माझ्या गावातील मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो. गाव लहान असेल तरी तीस हजाराची लोकवस्ती आहे. घरी पुन्हा येताना शिवसेना, भाजप, मनसे यांच्या नवीन पाट्या बघितल्या. गावात आजकाल राजकारण जोरात आहे. दरवर्षीप्रमाणे ‘रामायण’ या विषयावर सप्ताह चालू झालेला आहे. गाव जरा जास्तच धार्मिक आहे. माझे वडील आई आणि जवळपास संपूर्ण गावच संध्याकाळी सप्ताहात असते. रात्री वीज राहिल्याने मुळा प्रवरा वीज मंडळाचे उपकार मानले. (more…)

नोकरी

परवा माझ्या एका मित्राचा दोन वर्षांनी फोन आला होता. मला म्हणाला ‘मी आता बी.सी.ए च्या तिसऱ्या वर्षाला आहे. यापुढे एम.सी.ए करायचे म्हणतो आहे. तर मग मला नोकरीसाठी काही अडचण येणार नाही ना?’ मी  ‘नाही’ येणार अस म्हणून फोन ठेवला. काल संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचा की माझ्या एक मित्र तिला भेटला होता. तर ती मला सांगत होती ‘तो खूप टेन्शनमध्ये होता. त्याला तू काय झाल विचार’. मी ‘हो’ म्हणू फोन ठेवला आणि त्या माझ्या मित्राला फोन केला. त्याला विचारलं काय झाल तर तोही नोकरीच्या शोधात होता. आता तो शोधात आहे हे माहिती होत पण सहा महिन्यात एक कंपनी भेटू नये? त्याला विचारलं अडचण काय आहे तर बोलला की माझी कंपनी सहा महिन्यापूर्वी बंद पडली. आता कुठेही मुलाखत दिली तरी देखील कुठे नोकरी मिळत नाही आहे. नीट बोलल्यावर त्याच्या इंग्लिशची अडचण लक्षात आली. येत असून देखील ते दाखवता येत नाही. पुढच्या आठवड्यात आम्ही भेटणार आहोत. (more…)

अपेक्षा

काल संध्याकाळी माझ्या काकाने मला घरी येताना माझी पत्रिका आणि एक फोटो आणायला सांगितला. घरी गेलो तर एक गृहस्थ आले होते. माझी पत्रिका आणि फोटो घेतला. असो, माझ्याकरिता त्यांनी एक स्थळ आणल होत. माझ्याबद्दल माहिती विचारली. सगळ झाल्यावर तुमची मुली बद्दलची अपेक्षा काय अस विचारलं. काय बोलणार, त्यांना म्हणालो की ‘विश्वास’ ठेवता यायला हवा. ते म्हणाले ‘विश्वासावरच सगळ चालत. अजून काही अपेक्षा असतील ना?’ त्यांना म्हटलं ‘माझ्या फार काही अपेक्षा नाही’. ते ‘बर’ म्हणून निघून गेले. याआधीही असच, ते आधी आलेले स्थळ देखील  ‘अपेक्षा काय?’ आता या सगळ्यांच्या अपेक्षेचा अर्थ असा की, मला मुलगी दिसायला गोरी हवी? किंवा ती नोकरी करणारी हवी? मग नोकरी करत असेल तर पगाराची अपेक्षा काय? मग हे नाही तर तिला स्वयंपाक, तीच शिक्षण, तिची शरीरयष्टी, तिला चष्मा हवा की नको? हे असले प्रश्न मी ऐकले की वाटत मला एखादी वस्तूच विकत घ्यायची आहे. आणि ते मला वस्तू कशी हवी अस विचारात आहेत. (more…)

इंग्लिश

या नवीन कंपनीत आल्यापासून या दोन भाषेचा वापर होतो आहे. इंग्लिश माझ फारच खराब आहे. पण सध्याला बोलतोच. आतापर्यंत मी माझ्या कामाचा वेग आणि कामाचा दर्जा कसा सुधारला जाईल एवढंच बघत होतो. आता त्यापेक्षा अधिक माझ इंग्लिश बोलण कस सुधारेल याकडे लक्ष देत आहे. मुळात इंग्लिशची भीती वाटत नाही आहे. आणि इंग्लिश फ़क़्त कंपनीच्या कामापुरती वापरणार. मराठी भाषा ही कधीही सर्वोच्य आहे. मी हिंदी भाषा आता वापरण जवळपास बंदच केल आहे. जानेवारी महिन्यात मी मोजून दोन वेळेस हिंदीत बोललो. आजकाल त्याच देखील हिशेब ठेवतो. या महिन्यात दोनदा हिंदीचा वापर केला आहे. मुळात भाषा हे एक माध्यम आहे. इंग्लिश या वर्षात पक्क करून टाकील. मध्यंतरी ते रिलायन्स कंपनीचे डेटाकार्ड घेतलं तर त्यांचे आजकाल खूप फोन येतात. मग त्याचाही मी माझ्या ‘इंग्लिश’ सुधारण्यासाठी उपयोग करून घेतो. (more…)

प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. म्हणजे कोणी वक्त्याने खूप मोठ तासाभराच भाषण द्याव. आणि लोकांनी भाषण संपल्यावर टाळ्या वाजू नयेत, त्याला अंडी देखील फेकून मारू नये. किंवा फोन केल्यावर पलीकडून कोणीच काही बोलू नये. मग त्या भाषणाला आणि आपल्या फोनला काय अर्थ राहील? प्रतिक्रिया जे जिवंतपणाचे लक्षण आहे. मी माझा ब्लॉग सुरु करण्यामागे देखील हेच कारण होत. रोज ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वेबसाईटवर जात होतो. त्यांच्या लेखांवर मी माझी प्रतिक्रिया पाठवायचो. पण मोजून दोन तीन प्रतिक्रिया प्रकाशित केल्या. ‘सकाळ’ आणि ‘लोकसत्ताचे’ ही हेच. लोकसत्ताच संपादक नेहमी नवीन नवीन अग्रलेखात ‘चमत्कार’ घडत असतात. सुरवातीला मी ताबडतोप प्रतिक्रिया पाठवायचो पण ते प्रतिक्रिया प्रकाशितच करत नाहीत. (more…)

यापुढे कर भरणार नाही

खरच बरोबर आहे. माझ्या नुसत्या बडबडीला काय अर्थ आहे? काल माझ्या एका नोंदीला आलेल्या प्रतिक्रियेत हेच होते. प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे. मी ज्या सरकारला नाव ठेवत आहे. तेच मुळात काहीही न करू शकणार आहे. शंभर कोटी प्रेतांच्या देशात अजून काय घडू शकते? पुण्यात बॉम्बस्फोट होणार हे ह्या नंदी बैल मुख्यमंत्र्याला आणि त्याच्या पोलिसी कुत्र्यांना माहिती होती. तरी देखील.. सोडा परत मी त्यांच्यावर सुरु झालो. ते काहीच करू शकत नाही. चार माणसांच्या बदल्यात इस्राईलने पेलेस्टांइनच्या राष्ट्रपतीला त्याच्या राजभवनात रणगाडे घालून त्याला ठार मारणारे आपण नाही आहोत. जर सरकार आपल्या लोकांना असच मरू देणार असेल आणि आपल्याच जीवावर स्वतः कायद्याचे उल्लंघन करणार असेल तर आपण का कायदे पाळायचे? या वेळेपासून मी सरकारचा कर भरणार नाही. (more…)