मागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. अख्खा दिवस झोपून काढला. काल पण खर तर तेच केल होत. काल रात्री ताप उतरला होता. पण सकाळी पुन्हा आला होता. असो आता फ़क़्त डोक दुखत आहे. माझ्या या तापामुळे अनेकांची तशी डोकेदुखी झाली. आई तर काही विचारू नका. तिला तर काय करू आणि काय नको अस झाल होत. (more…)
कॅटेगरी: नोंद
माझे नाव पुढील पानावर
मी आठवीत असताना, माझ्याकडे जी पुस्तके होती त्यात इतिहासच एक पुस्तक होत. माझ्या वडिलांनी मला कधीच नवी कोरी पुस्तक आणली नाही. त्यांचे एक मित्र होते. त्यांच्या मित्राचा मुलगा माझ्यावरच्या इयत्तेत होता. तो आधी अभ्यासक्रमाची पुस्तके वापरायचा आणि वर्ष संपल्यावर तो मला ती सगळी पुस्तके मला वापरायला द्यायचा. आणि माझ वर्ष संपल्यावर मी त्याच्या बहिणीला ती द्यायचो. ती माझ्यापेक्षा एका वर्षांनी लहान व माझ्या खालील इयत्तेत. आमच दरवर्षी अस चालायचं. मी आठवीला गेलो तेव्हा माझी सातवीची अभ्यासक्रमाची पुस्तक त्याच्या लहान बहिणीला दिली. आणि आठवीची अभ्यासक्रमाची पुस्तके आणली. (more…)
अपघात
आज संध्याकाळी आठच्या लोणावळा लोकलने मी येत असताना गाडी फारच थांबत थांबत येत होती. दापोडीच्या पुलावर तर दहा मिनिटे थांबली. आता पुण्यातील लोकल कुठेही आणि कधीही थांबतात. आता एका वर्षानंतर मला देखील सवय झाली आहे. लोकल दापोडीहून निघून कासारवाडीला आली. जेव्हा कासारवाडीहून लोकल निघाली तर फलाटाच्या शेवटी दोन पोलीस उभे होते. अंधार असल्याने त्यातील एक पोलीस हातात एक मोठी बैटरी घेवून उभा होता. त्या फलाटावर एक प्रेत होते. बघूनच समजून गेलो. त्याच्या शरीरावर कापड टाकलेले होते. तरी मधील भाग खोलगट दिसत होता. लोकलला एवढा उशीर का झाला हे सुद्धा समजले. बहुतेक सातच्या नंतर सुटणाऱ्या एक्स्प्रेसने उडवले असावे. (more…)
अकलेचे कांदे
काल रात्री आमच्या इमारतीतील वरच्या मजल्या वरील एक व्यक्ती आला. मला म्हटला कि माझ्या संगणकाचा फोर्मेट मारायचा आहे. मी विचारलं का? तर तो बोलला, माझ्या संगणकातील मेक्याफी अंटी व्हायरस काढायचा आहे म्हणून. त्याला मी म्हणालो मग अनइंस्टाल करायचा मग. त्यासाठी फोर्मेट मारण्याची काय गरज?. तो म्हणाला नाही. फोर्मेट करावा लागेल अस माझा मित्र म्हणाला. त्याला म्हटला मला सुटीच्या दिवशी माझ्याकडे तुझा संगणक घेऊन ये. मग मी तो काढून दुसर एखादा टाकू. तो म्हटला ठीक आहे. बर हा जो व्यक्ती होता ना हा इंजिनियर आहे. आणि त्याच्या हाताखाली पन्नास जण काम करतात. आणि हा बोलतो कि सोफ्टवेअर काढण्यासाठी पीसी फोर्मेट करायचं. (more…)
लव्ह मैरेज की अरेंज मैरेज?
काल रात्री लोकल चुकल्याने बसने आलो. त्यात नेहमीप्रमाणे एक प्रेमी युगल होते. नाही तरी पुण्यात असले प्रेमी युगलांची संख्या कुठे कमी आहे म्हणा. संध्याकाळी घरी आलो. आमच्या शेजारी एक नवीन जोडप आल आहे राहायला. त्यांना एक गोड बाळ पण आहे. आज त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. नक्की काय होत आहे हे बघायसाठी मी बाहेर डोकावून बघितलं तर मारहाणीचा आणि कोणाचा तरी रडायचं आवाज येत होता. त्यांच्या घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला असल्याने नक्की काय होत हे मला कळल नाही. पण एवढं नक्की त्या जोडप्यात वादावादी चालू होती. सकाळी लोकल मध्ये एकाने सांगितलं की त्यांच्या येथील एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याने बोलताना त्याची जुनी लफडी तिच्या बायकोला सांगितली. त्याच्या बायकोला वाटले की हा मोकळ्या मनाचा आहे म्हणून तिने देखील तीच जुन प्रेम प्रकरण त्याला सांगितलं. झाल ह्याने तिला घराबाहेरच काढल. (more…)
मी चुका सम्राट
काय सांगू काल आणि आज मी कंपनीत कामात फारच चुका केल्या. तसा चुका अखंडपणे करण्याचा विक्रम मीच नोंदवला असेल. ज्या कामाला फार फार तर अर्धा दिवस लागायला हवा तिथ मी काल आणि आज मिळून दोन दिवस लावले आहेत. आणि अजूनही काम काही झालेलं नाही. अकरावीत असताना एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता भ्रष्टाचाराचा. त्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस सुद्धा मिळाले. पण ज्यांनी स्पर्धा आयोजित केली होती त्या अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्यांच्या समितीतील भष्टाचार बद्दल बरच काही मी त्या निबंधात लिहिले होते. वकृत्व स्पर्धेत भाग घेतला, आणि भाषणासाठी उभा राहिलो. विषय होता माझा आवडता नेता. आणि भाषणाची पारंपारिक सुरवात केली आणि कोणावर बोलायचे तेच नेमके विसरलो. मग काय एका मित्राने सांगितले, मी कोणत्या नेत्यावर बोलणार होतो ते. (more…)
काळजीपेक्षा भीतीच जास्त
मागील दोन दिवसांपासून मला थोडी सर्दी आणि खोकला झाला होता. मला सहसा आजार होत नाहीत. पण यावेळी मात्र सर्दी झाली आणि त्यानंतर खोकला. आईच काही विचारू नका. मी काही म्हटलं नाही तरी मेडिकल मध्ये जाऊन व्हिक्स, दोन पांढऱ्या रंगाच्या गोळ्या आणल्या आणि घे म्हणाली. आता तिच्याशी काही वाद घालण्यात काही फायदा नव्हता. बर मी काल घेतो म्हणालो आणि सकाळी विसरलो. तर आईने ताबडतोप माझ्या वडिलांना फोन करून सांगितले. मग काय सकाळी सकाळी वडिलांचा फोन ओषधे घे म्हणून. त्यांना मी घेतो म्हटल्यावर त्यांनी फोन ठेवला. बर सकाळी कंपनीत आलो तर माझा सिनिअर आला नव्हता. चौकशी केल्यावर कळले की, त्याची मुलगी पलंगावरून खाली पडली. आणि आता हॉस्पिटल मध्ये आहे. पलंगावरून पडल्यावर हॉस्पिटलमध्ये? अस विचारल्यावर कळले की त्यानंतर तिने उलट्या करायला सुरवात केली म्हणून हा आपला डॉक्टरकडे घेवून गेला. (more…)
गैरसमज
आज संध्याकाळची ५:३० ची शिवाजीनगरहून लोणावळा लोकल पकडली. लोकल चिंचवडला आली. लोकल चिंचवडहून ज्यावेळी निघाली त्यावेळी माझ्या पुढच्या डब्यातील एका गेट वीराने एका मुलीचा स्क्राफ ओढला. ती फारच लोकलच्या जवळ असल्याने त्याचा सहज हात पोहचला होता. गाडीने वेग घेतला. तिचा स्कार्फ बरोबर तिची ओढणीसुद्धा ओढली गेली. ते बघून माझ खर तर काही संबंध नव्हता. पण तरीदेखील तिळपापड झाला. दोन सेकंदासाठी त्या गेट बहाद्दराला शिवी द्यावी अस मनात आल. माझ्या डब्यातील एक जण म्हणाला आजकाल मुल फार मुलींची छेड काढत असतात. खर तर अशी मुलींची छेडाछेडी मी मुंबईला असताना देखील कधी बघितली नव्हती. पुण्यात मुलींना शिट्ट्या मारतात हे बघितलं होत. पण अस अंगावर हात टाकण, पहील्यांदीच बघितलं. मी तो कोण आहे हे बघायचा प्रयत्न करीत होतो. पण तो कोण हे दिसतच नव्हत. माझ्या डब्यातील थंड प्रतिक्रिया बघून माझा खूपच त्रागा होत होता. विचार केला कि पुढच्या स्टेशनाला त्याला गाठायचं. (more…)
दंगल कोणाची हिंदूची की मुसलमानाची?
मागील दोन दिवसांपासून एक बातमी रोज वर्तमानपत्रात येत आहे. बातमी आहे मिरजेतील बिघडलेल्या वातावरणाबद्दल. सगळ्याच वर्तमानपत्रात अस लिहाल जातं की दंगल हिंदू- मुस्लीम मध्ये होत आहे. आता दंगल नेहमीच कुठे ना कुठे घडत असले. आणि अशा गणेश उत्सवात दंगली हा प्रकार काही नवीन नाही. आणि मला त्याबद्दल काही बोलायचे सुद्धा नाही. कारण मी काही आता मिरजेत नेमके काय घडते आहे हे काही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली नाही. पण वर्तमानपत्रातील नेहमी अशा प्रकारच्या बातम्यांच्या वेळी एक शब्द नेहमी वापरला जातो. आणि तो म्हणजे ‘हिंदू-मुस्लीम’. (more…)
साडेसाती
माझे आई आणि वडील भविष्य, ज्योतिष शास्त्राला मानतात. आज रात्री माझी आई म्हणाली की तुझी आजपासून साडेसाती संपली. आता त्यांच्या मते मागच्या काही वर्षांपासून ज्या अडचणी मला येत होत्या त्याचे मूळ कारण साडेसाती हे होते. मध्यंतरीपासून मला आर्थिक अडचणी अनेक येत आहेत. म्हणजे मला माझी मिळकतीपेक्षा अधिक खर्च होत आहे. आता मी फालतू खर्च काहीच करत नाही. तरीदेखील असे होते. आता साडेसाती किंवा भविष्य यामुळे मला अशा अडचणी येत आहेत अस मी मानत नाही. घर घेतल्यापासून माझ्या मिळकतीतील एक मोठा हिस्सा लोनच्या हप्त्यात जातो. दुसर म्हणजे मी करत असलेली इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक. आणि हो मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सरकार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे खर्चच खर्च होत आहे. त्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतात. (more…)