कॅटेगरी: नोंद

म्हणे आम्ही मुली

मी ज्या कंपनीत काम करतो तिथे माझ्या सोबत काही मुली(?) काम करतात. आता त्या म्हणतात कि आम्ही मुली आहोत. स्त्रिया आणि मुली यातला फरक काय? या प्रश्नाचे उत्तर देणे अगदी सोपे आहे. साधारणत आपल्या समाजात लग्न झाले कि मुलीला स्त्री मानतात. आता काहीना हे मान्य नसेल. आणि मला सुद्धा मान्य नाही. जी मुलगीला मुले झालेले आहेत, तिला तर आपण GIRL किंवा मुलगी कस मानायचं? हाच प्रश्न मला पडलेला आहे. माझ्या कंपनीत ह्या नियमाने एक दोन सापडतील. पण कंपनीतील उरलेल्या सगळ्या स्वत: ला मुली म्हणवून घेतात. (more…)

पुणे पॅटर्नचा नाहीतरी उपयोग काय होता?

राज्यातील समीकरणे बाजूला ठेवून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी सत्ता हेतूने फेबुर्वारी २००७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात असलेले कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिले. खर तर दादाना भाईना महानगरपालिकेतून बाहेर काढायचे होते. म्हणून हा सगळा खटाटोप. काल उद्धव ठाकरे यांनी तो मोडण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला. तस पाहायला गेल तर ह्या पुणे पॅटर्न चा फायदा काहीच नव्हता. जो काही होता तो केवळ शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला होता. आणि नुकसान जे काही झाले ते कॉंग्रेसला झाले. बाकी फेबुर्वारी २००७ पासून ते आता पर्यंत पुण्यात काही नवीन घडले नाही. जे काही थोडे फार झाले ते राष्ट्रीय स्पर्धेपुरती नाटके झाली. भिंती, रस्ते, बस रंगवल्या म्हणजे काही विकास झाला अस मला तरी वाटत नाही. एक गोष्ट मात्र नक्की. इथले सगळे पक्ष कितीही विकासाच्या गप्पा मारू दे. पण सगळ्यांना सत्ताच हवी आहे. आणि विकास नावाचा कोणी इथे आला नव्हता. (more…)

पुण्यात काहीही घडू शकते

पुण्यात काल दोन बांगलादेशींना अटक झाली. दोघेही आठवी नापास. एकाच नाव अब्दुल हक आणि दुसरा मामून रैफ. घुसखोरी करून ते प्रथम मुंबईत आले. मामून रैफ १९९५ तर अब्दुल २००३ मध्ये भारतात आले. पुण्यात एका मोठ्या कंपनीत अब्दुल हक प्रोजेक्ट इन्चार्ज, त्याचा पगार एक लाख वीस हजार. तो देखील महिन्याचा. आणि मामून रैफ ला वीस हजार महिन्याचा पगार. त्यांनी बरेच पैसे कमावले. इथे लग्नही झाली. त्यातला अब्दुला वानवडीला तर मामून रैफ हिंजवडीला राहायला होता. त्यांनी शाळा सोडल्याचा खोटा दाखल्यापासून ते खोट्या पासपोर्ट पर्यंत सगळ जमवलं. आता पकडले गेले. पण पुण्यात काहीही घडू शकते. (more…)

भाषण का प्रवचन?

१५ ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांनी दुखी चेहऱ्याने पण जोरात भाषण केले. जाऊ द्या काय बोले त्यावर आपण नंतर बोलू. त्यांनी भाषण हिंदीत केले. पण लिहून आणले गुरुमुखीत. गुरुमुखी हि पंतप्रधानांची मातृभाषा. वाचायला सोपे जावे म्हणून काय कि काय म्हणून आणले असावे. सोनियाजी पण भाषण हिंदीतूनच करतात पण, नेहमी भाषण इटलीत लिहून आणतात. कदाचित त्यानाही वाचायला सोपे जावे म्हणून असेल. आधी मी लहान असताना माझ्या वडिलांच्या म्हणण्यावरून वकृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. कधी नंबर आला नाही. परंतु भाग घ्यायचो. वडील भाषण पूर्ण पाठ करून घ्यायचे. आणि मग मी तिथे जावून बोलून टाकायचो. (more…)

घरातील अतिरेकी

आज सुटी असल्याने घराची साफसफाई केली. मागच्या आठवडा भरात मुंग्यांनी नुसता उच्छाद मांडून ठेवला होता. कुठलाही कोपरा बघा मातीच माती. आणि बाथरूम मध्ये तर रात्री झुरळांचे राज्य. तरी बर उंदीर नावाच्या दहशद्वाद्याला आमच घर अजून माहिती नाही. नाही तर काय झाले असते देव जाणे. आज संध्याकाळी घरभर भिंतीच्या बाजूने ती मिळते ना लक्षमणरेषा ती आणून आखून ठेवली. तासाभरानी बघतो तर अनेक मुंग्या मेलेल्या. आणि पाच एक झुरळ. चला हा आठवडा तरी चिंता कमी होईल. घर पुसून काढण्याचा प्लान आखला होता. पण बाथरूम आणि किचन मधेच बराच वेळ गेल्याने, शेवटी फारशी पुसून काढण्याचा प्लान रद्द करावा लागला. (more…)

राष्ट्रपति बाई काय म्हणाल्या?

आज सह्याद्री वाहिनी वर राष्ट्रपति बाई चे भाषांतर केलेले स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला केलेले भाषण ऐकायला भेटले. खर तर ते सगळ भाषण मी जसच्या तस ‘हेमंतमत‘ मधे टाकल आहे. आपल्या देशाच्या पहिल्या नागरिक काय म्हणाल्या याचा संक्षिप्त स्वरूपात सांगतो. ताई म्हणाल्या ‘देशात हवामान सध्याला चांगले नसल्याने आणि स्वाइन फ्लू ची साथ आली असल्याने नागरिकांनी सरकारला मदत करायला हवी.’ ‘प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये प्रत्येकाने शिस्तिचे पालन करायला हवे, हीच देशाची संपत्ति आहे.’ ‘देश विकसित होतो आहे. सरकारच्या धोराणाने आपण केलेल्या सतत परिश्रमाने आपला देश जागतिक स्तरावर आपले स्थान निशित करू शकला आहे.’ (more…)

दहीहंडी महत्वाची नाही

पुण्यात नेहमी जोरदार साजरी होणारी दहीहंडी, या वेळी मात्र स्वाइन फ्लू आल्याने ती रद्द करण्यात आली आहे. ही खरच आनंदाची बाब आहे. दोन दिवस पूर्वी येरवडा पुलाच्या बाजूला दहीहंडी कार्यक्रमाची मोठी मोठी पोस्टर लागली होती. एका पोस्टर वर तर चक्क ५ लाखाचे बक्षिस देण्यात आले होते. परंतु आज सकाळ पासून विविध मंडळ यांचे दहीहंडी रद्द अशी पोस्टर बघून बरे वाटले. दहीहंडी हा आपण खर तर मोठ्या आनंदाने साजरा करणारा उत्सव. जगात कुठेही अस घडत नाही. माणसांचे थरावर थर. आणि बघता बघता एक उंचच्या उंच असा मनोरा बनतो. एक चिमुरडा या सर्वांच्या उंच थरावर पोहचतो आणि उंच बांधलेली दह्याची हंडी फोडतो. हे सगळ अगदी उत्साह वर्धक आणि रोमहर्षक पद्धतीने होत. कधी कधी थर कमी असेल तर हंडी फोड़ता येत नाही. परंतु त्याही वेळी उत्साह तेवढाच असतो. हे सगळे गोविंदा त्याही वेळी नाचतच असतात. आणि पाहणारे आनंद लूटत असतात. (more…)

मानमोड्या नव्हे झोपमोड्या

आजचा दिवस फारच क्लेशदायक गेला. म्हणजे करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, त्यातली गत. कंपनीतुन घरी आलो. आणि थोडा वेळ होतो ते लाइट गेली. पुणेरी भाषेत दिवे गेले. मी ज्या भागात राहतो त्या तिथे अस नेहमी घडते. भागाच नाव बिजलीनगर आहे. नावातच केवळ ‘बिजली’ आहे. प्रत्यक्षात अनेक वेळा वीज नसते. वीज नसल्याने मला काही काम करता येणे शक्य नव्हते म्हणुन मी बाहेर माझ्या नव्या शेजर्याशी गप्पा मारत बसलो होतो. तो आहे जळगावचा . जळगावाकरांची मराठी म्हणजे रसाळ, एक लय आणि लाघव. स्वाइन फ्लू वरुन बोलता बोलता विषय निघाला मान मानमोड्याचा. (more…)

पुण्यात स्वाइन फ्लू पेक्षाही घातक मास्क फ्लू

आज सकाळी ९ ची लोकल हुकली. बसने गेलो. कंपनीत आल्या आल्या माझ्या काही सहकारी मैत्रिणी मला विचारू लागल्या की, तू रोज लोकल ने येतो ना? मग मास्क घेतला का? मी म्हटल की लोकलने येतो परंतु मास्क घेतला नाही. झाल त्याना जणू काही भुत बघितल्या सारखेच माझ्याकडे बघू लागल्या. मला म्हणाल्या की, तू घे नाही तर आम्हालाही होइल. एकून डोकाच सरकल. मी त्याना सरळ सांगितल की अस वाटत असेल तर माझ्यापासून दूर रहात जा. बर संगणक चालू करतो तोच माझा एक दोस्तने जी टॉक वर मला तोच प्रश्न की मास्क घेतल का? आधीच या प्रश्नाने डोक सरकवल होत त्यात हा. त्याला म्हटल की नाही घेतला, आणि घेइल की नाही त्याचा अजुन विचार केलेला नाही. कदाचित त्याला समजल असाव. तो फक्त अस म्हणाला की, घेतल नाही तरी काही बिघडत नाही परंतु काळजी घे. (more…)

मास्कचे शहर पूणे

आज सकाळी आवरून निघायला उशीर झाला. त्यात लोकल जाते की काय याच टेंशन. घराला कुलुप लावून बाहेर निघालो तर जिकडे तिकडे सगळे हिरवे पांढरे मास्क घालून चाललेले लोक. आधी छोटी मुले त्यांच्या आई वडिलांबरोबर पाठीवर दप्तर, आणि त्यांच्या हातात हात. अशी आरडा ओरडा करत चाललेली नेहमी बघत आलेलो. बघून खुप छान वाटायचे. त्यांचे निरागस चहरे आणि कर्ण मधुर आवाज. सकाळ अगदी छान होवून जायची. पण आज त्याचे चेहरे मास्क मधे. आणि जणू काही कोणती मोठी दुर्घटना घडलेली अशी भयाण शांतता. कसा बसा मी स्टेशन वर आलो. पाहतो तर काय, सगळेच मास्क घातलेले. (more…)