कॅटेगरी: माहिती

आभासी जीवन

आभासी जीवन अर्धे जग जगत आहे. जगाची साधारणतः लोकसंख्या आठ अब्जच्या घरात आहे. त्यापैकी ५.२ अब्ज आंतरजाळाशी जोडलेले आहेत. अन ४.२ अब्ज लोक कोणत्या ना कोणत्या समाज माध्यमांवर सक्रिय आहे!

सक्रिय इतके की, जगाच्या कोणत्याही देशापेक्षा अधिक क्रयशक्ती त्यांची होते. मध्यंतरी असाच मुलांच्या दूरदर्शन संचाच्या वेडाचा एक अहवाल पाहण्यात आलेला. साधारण १२ ते १८ वयोगटातील मुले दिवसाकाठी आठ तास दूरदर्शन संचासमोर असतात असं त्यात नमूद केलेलं!

सुरवातीला हे धक्कादायकच वाटलेलं. पण जगाला भ्रमणयोजक आणि आंतरजाळाने वेडसमोर तेही फिके! आजमितीला २ अब्जच्या घरात संकेतस्थळे आहेत. १.९ पद्म (१९०० अब्ज) विपत्र/ईमेल पाठवलेली आहेत. दर क्षणाला गुगल शोधयंत्रावर लाखभर शोध घेतले जातात!

आतापर्यंत ५४ लाख नोंदी/लेख लिहिले गेले आहेत. दर क्षणाला ९५००हुन अधिक ट्विट संदेश प्रकाशित होतात. क्षणाला युट्युबवर ९२ हजाराहून अधिक चित्रफिती पहिल्या जातात. आभासी जीवन इतके मोठे आहे.

क्षणाला ११००हुन अधिक इन्टाग्रामवर छायाचित्रे. तर क्षणाला टंब्लरवर दोन हजार संदेश प्रकाशित होतात. जवळपास ३ अब्ज फेसबुकचे वापरकर्ते आहेत. पिंटरेस्टचा वापर ४० कोटीहून अधिक लोक करतात. क्षणाला सहा हजाराहून अधिक स्कायपी संभाषणे होतात. वर्षाला लाखभर संकेतस्थळांवर आभासी दरोडा टाकला जातो.

क्षणाला लाखभर जीबी माहितीच्या पाहण्या होतात. दिवसाकाठी चार लक्ष संगणक/फुलणक खरेदी केले जातात. तीस लाखांहून अधिक भ्रमणयोजकांची विक्री होते. हे सगळं इतकं मोठं आहे की आपणच नव्हे तर सर्व जग हे आभासी जगत असल्याचे द्योतक आहे.

कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही. ज्यात काही फायदा नाही अशी कोणतीही गोष्ट फारकाळ टिकत नाही. आभासी जगाचा फायदा जोपर्यंत आहे तोवर ते असेल. त्याचा प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतो.

आपण कितीही टाळले तरी आपण त्याचा भाग झालेलो आहोत. अनेक देशांचे सरकार आंतरजाळाचा वापर आपल्या नागरिकांवर नियंत्रणासाठी करतात. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या वाईट अशा दोन्ही बाजू असतात. सूचनांचा भडीमार मुळे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर ह्याचे वाईट परिणाम घडले. अपुरी झोप, चिडचिडेपणा, ताण वाढण्यासारख्या गोष्टीही वाढल्या आहेत.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. ‘अति तिथं माती’ ही म्हण सगळीकडे लागू पडते. त्यामुळे, ह्या आभासी जगात किती रममाण व्हायचे हे ठरवायला हवे. तूर्तास इतकेच. बाकी बोलूच!!

वेबसाईट

वेबसाईट बद्दल काही नव्याने सांगावं अशी परिस्थिती नाही. तरीही ज्ञानाची उजळणी करण्याचा यत्न करतो. आपण सर्वजण परिस्थितीमुळे म्हणा वा युगाची अपरिहार्यता आभासी जगाला आपलेसे केले आहे. या डिजिटल/आभासी जगाची पहिली पायरी म्हणजे वेबसाईट/संकेतस्थळ असं आपण म्हणू शकतो.

खाद्यान्नाच्या विश्वात झोमॅटो/स्वीगी सारख्या हॉटेलातील अन्न घरपोच देणाऱ्या कंपन्यांनाचा आधार हा वेबसाईट हाच आहे. आस्थापनांचे मुख्य चेहरा म्हणून संकेतस्थळ (वेबसाईट) नव्याने सांगायची गरज नाही. तुम्ही व्यवसाय सुरु करत आहात, तर तुम्हाला संकेतस्थळाची गरज भासणारच!

अगदी काही शोध घ्यायचा आहे. तर गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्या सेवेसी अहोरात्र हजर आहे. काही वस्तू मागावयाच्या आहेत मग चाळा अमेझॉन,फ्लिपकार्ट सारखी संकेतस्थळे! मनोरंजनासाठी हॉटस्टार, नेटफ्लिक्स, युट्युब सारखी संकेतस्थळे! जवळपास सर्वच क्षेत्रांची गरज संकेतस्थळे झाली आहेत!

मनपा असो वा केंद्रीय आस्थापने! त्यांच्याही सेवा अन तक्रारीसाठी संकेतस्थळे बनवलेली आहेत! थोडक्यात, संकेतस्थळे आपल्यासाठी नवीन नाहीत! इतके काय बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रे देखील आता संकेतस्थळावर अद्ययावत माहिती पुरवत असतात! इतकेच काय फेसबुक सारखी संकेतस्थळे जगाला एका धाग्यात गुंफत आहेत.

जगात अशी पावणे दोन संकेतस्थळे आहेत. मानवाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ती सहाय्यक ठरत आहेत. टाळेबंदीच्या काळात त्यांनीच जगाला दूर असूनही एकमेकांच्या संपर्कात ठेवले!

एकूणच आताच्या युगात संकेतस्थळे आपल्याला बहुपयोगी ठरत आहेत. आपण जर नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर त्याची माहिती जगाला मिळावी यासाठी नक्कीच संकेतस्थळ बनवणे नक्कीच फायदेशीर आहे. व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी खचितच ते हितवाह आहे!

हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही

हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही. धक्का बसला ना. राज्यघटनेतील कलम ३४३ चे चुकीच्या अर्थाने देशभरात हा गैरसमज पसरलेला आहे. हो, हे खरे आहे. मी देखील शालेय जीवनात हिंदी राष्ट्रभाषा आहे असेच शिकलो. परंतु ते धादांत खोटे आहे. सुरवातीला मलाही धक्काच बसलेला. (more…)

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा हे नाव मजेशीर वाटेल. परंतु खरोखच अनेक अंधश्रद्धा आपल्याला आपल्या मोबाईल फोन/भ्रमणध्वनी बाबत आहेत. अशाच काही अंधश्रद्धाबद्दल आज थोडी उहापोह करणार आहे. (more…)