राजे वैतागले. ‘चाकरी’ किती दिवस? किती दिवस अजून दुसऱ्याचे राज्य टिकवण्यासाठी/वाढवण्यासाठी लढाया मारायच्या. आणि लढाया मारून देखील मरायचे. कधी कामाने, तर कधी ‘अपमानाने’. स्वत्व, स्वाभिमान प्रत्येकदा चिडतो. शेवटी काय मिळते. बस, दोन वेळच्या भाकरीसाठी. आणि किती दिवस ही मोगलाई सहन करायची? प्रत्येक ठिकाणी तेच. प्रत्येक सैनिकाची इच्छा, मी सरदार कसा होईल! आणि सरदार झाल्यावर वतनदार आणि मग जहागीरदार. मला माझ्या राज्याचा राजा व्हायचे आहे. स्वतःसाठी स्वतःच्या बळावर राज्य उभे करायचे आहे. कितीही केले आणि कसेही केले दुसऱ्याकडे चाकरी मनाला पटेल अस काही विचार करण्याचीही मुभा मिळत नाही. बस एक आदेश मिळतो. लढाई सुरु. दुसऱ्याचे राज्य मोठे करून कसला शौर्यपणा. कसली बहादुरी? असो, त्याचाच श्रीगणेशा करण्याचा मानस आहे. त्यासाठी ही तयारी.
कॅटेगरी: मी
सिंघम..
चित्रपटाची सुरवात होते. एका छोट्याशा गावातील पहाटेची वेळ.
संकल्प स्वतःचे
किती अवघड! म्हणजे ‘संकल्प’ ही गोष्टच अशी आहे की, जी पाळणे जवळपास अशक्यप्राय आहे. शाळेत असतांना शिक्षकांच्या सांगण्यावरून मी अनेकदा अभ्यासाचे ‘वेळापत्रक’ बनवायचो. आणि ते पाळण्याचा संकल्प करायचो. पण चुकून एकदाही तो संकल्प पूर्णत्वास गेला नाही. इतरांचे पाहून वर्षाच्या सुरवातीला मी देखील नवीन गोष्टींचे ‘संकल्प’ सोडायचो. आणि सुरवात व्हायची. काही दिवसांनी ‘संकल्प’
गोष्ट एका फसलेल्या चोरीची
एका आटपाट नगरात एक ‘हेमंत’ नावाचा युवक रहात असतो. तो ज्या इमारतीत वास्तव्य करीत असतो. त्या इमारतीला लागुनच असलेले ‘साई’मंदिरातील पेटी फसलेल्या चोरीची ही गोष्ट. नेहमीप्रमाणे रोज त्या मंदिराच्या
संगीत
हे संगीत म्हणजे मनाचा आरसा. जसे पावसात भिजतांना मन उल्हासित होते, अगदी तसेच गाणी ऐकतांना सुद्धा. म्हणजे,