लोकशाही फक्त नावाची

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पूर्वी आदिलशाही, निजामशाही वगैरे होत्या. त्यावेळी आदिल शहा, निजाम वगैरे राज्य करीत होते. आता लोकशाही आहे. पण खरंच लोकांचं राज्य आहे? (more…)

कर्मवाद

कर्मवाद म्हणजे स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवणे. विचार करा. अमके करायचे तमके करायचे ठरवतो. पण ते होईल याबाबत आपण साशंक असतो. ते केल्याशिवाय कसे समजेल? (more…)

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा हे नाव मजेशीर वाटेल. परंतु खरोखच अनेक अंधश्रद्धा आपल्याला आपल्या मोबाईल फोन/भ्रमणध्वनी बाबत आहेत. अशाच काही अंधश्रद्धाबद्दल आज थोडी उहापोह करणार आहे. (more…)

सोशल मीडिया आणि व्यवसाय

सोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो. (more…)

स्वच्छता

स्वच्छता ही सरकारची जबाबदारी नाही. हो हे मीच म्हणतो आहे. आपण सदैव स्वच्छतेवरून सरकारला झापतो. पण कचरा नेमकं करतंय कोण? याचा विचार केलाय. (more…)

मराठीची सक्ती

महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठीची सक्ती करावी वा न कारवाई यावर सध्याला चर्चा सुरु आहे. काहींच्या मते अल्पसंख्याक शाळांना ती नको आहे. काहींचा तर स्पष्ट विरोध देखील आहे. काहीजण असेही म्हणत आहेत की मराठी माणूसच मराठी नको म्हणतो. (more…)

पाणीप्रश्न आणि आम्ही

पाणीप्रश्न खरं तर दर डिसेंबर महिन्यापासून ते पुढील वर्षीच्या मे जून महिन्यापर्यंत चर्चिला जाणारा विषय. आपल्या घरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावरच आपण यावर बोलतो. टीका मग सल्ले यापुढे हा विषय कधीच जात नाही.

यापेक्षा महत्व आपण कुणीच द्यायला तयारही नाही. देशभरातही हेच! परंतु तरीही आपण स्वतःला फार हुशार वगैरे समजतो. आणि दरवर्षी तेच रटाळ चर्चितो. माझं जन्मगाव नगर जिल्ह्यातील. नगर हा बारा महिने दुष्काळी जिल्हा.

तिथं आजही दोन चार दिवसाआड तासभर पाणी आलं तरी लोक दिवाळी साजरी करतात. मुळात पाणीप्रश्नाशी आपापल्या परीने प्रत्येकाने मार्ग काढला आहे. कुणी साठवण क्षमता वाढवलेली तर कुणी वापरावर नियंत्रण. मुळात ह्या विषयाने इतके गांजले आहेत की त्यांनी तशी सवयच लागलेली आहे.

लोकसंख्या, पाण्याचा वापर हे विषय बोलून किती दिवस आपण पाण्याच्या स्रोतांना दुर्लक्ष करणार आहोत देव जाणे. पाऊस पडतो आणि वाहून जातो. धरणं आहेत म्हणून आठ एक महिने पाणी मिळते. पुढे कपात व राजकारण सुरु होते.

नीती आयोगच्या मते २०३० सालापर्यंत भारतातील ४०% जनतेला पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध राहणार नाही.

पाणी हवेतून निर्माण करण्याचे शोध काही शास्त्रज्ञानी लावला देखील. भारतही अशाप्रकारचे मशीन बनवले गेले आहेत. पण आजही या परिकल्पना वाटतात. पाणी वाचवणे हे उत्तम पर्याय आहेत. पण ते आम्हाला अन सरकारला कृतीत आणणे अशक्य झाले.

पाणीप्रश्न हा सोडवला जाऊ शकतो. प्रश्न इतकाच आहे की कृतीशिवाय सगळंच अशक्य आहे. एकट्या पुण्यात मनपाची ४०% इतके पाणीगळती होते. सगळी साधन असतांना केवळ निष्क्रियतेमुळे पाणीप्रश्न अस्तित्वात आहे. टीका करण्याचा विषय नाही. पण माहिती असूनही जर आपण हालचाल करायला तयार नाही आहोत.

मी स्वतःला माझ्यापरीने हा प्रश्नाशी लढतो आहे. तीन वर्षात एकदाही टँकर सोसायटीत आलेला नाही. मी माझी सोसायटी टँकरमुक्त ठेवली आहे. उद्देश इतकाच पाण्याचे महत्व सभासदांना लक्षात यावं. यापुढे देखील हाच पायंडा राहील!

त्यामुळे जोपर्यंत आपण स्वतःला तयार करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सोडवला जाणार नाही. आपल्याकडून पाण्याचा शंभर टक्के योग्य वापर व्हायला हवा. नाहीतर जगात यावर चाललेले शोधांचा पर्याय वापरायला हवा. ह्याकडे दुर्लक्ष केवळ राज्यासाठी वा देशासाठीच नाही तर मनुष्य जातीसाठी धोकादायक आहे. सध्याला जिल्हा, राज्य अन देशपातळीवर वाद आहेत.

भविष्यात यातून युद्ध होणार नाही कशावरून? मग आपण आतापासूनच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे!

मुलाखत देण्याआधी

नोकरीची मुलाखत देण्याआधी पुढील काही सोप्या गोष्टी. त्याचा नक्कीच आपल्याला मुलाखत देतांना फायदा होईल. मुलाखतीच्या स्थानाचे जाण्याचे पर्याय जाणून घ्या. जेणेकरून वेळेत जाऊ शकाल.

(more…)

जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत – नेल्सन मंडेला

नेल्सन मंडेला विचार!

जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते नेहमी अशक्य वाटतं! – नेल्सन मंडेला

बेरोजगारी आणि वास्तव

बेरोजगारी हा सध्याच्या एक प्रमुख विषय. शिक्षण झाल्यावर नोकऱ्या नाहीत. व्यवसायाच्या संधी कुठे आहेत. अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. साधारण एक तपापूर्वीची गोष्ट. एक छोटासा कोर्स करून मी नोकरीच्या शोधात पुण्यात आलो. त्याही वेळी आता सरकारी नोकऱ्या कुठे आहेत. वगैरे गप्पा चालायच्या. (more…)