चाणक्य विचार :
कधी कुणा दुसऱ्या व्यक्तीसमोर चांगला बनण्याचा प्रयत्न करू नका! आपण एकटे आलो आहोत! जाणार सुद्धा एकटेच! जसे कर्म करू तसे फळ मिळेल! जे घडून गेलं त्याला विसरून जा! जे करत आहेत त्यावर विश्वास ठेवा! जे होईल त्याची चिंता सोडून द्या! बस तुम्हाला फक्त कर्म करायचे आहे! त्याला पुरस्कार देण्याचे कार्य भाग्याचे आहे! करेल ते! चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य
चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य
कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढे यांच्याबद्दल व त्यांचे कार्य आदर्शवतच! सोलापूर, पंढरपूर, नवी मुंबई, पुणे आणि आता नाशिक! त्यांच्याविरोधात केवळ कंत्राटातून आपली चैन भागवणारेच जाऊ शकतात. त्यांचे कार्य म्हणजे कायद्याचे पुस्तक! सगळीकडे हेच झाले. सोलापुरात दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेची जागा म्हणजे मोकळं मैदान! धुळीचे लोट उठायचे! श्वसनाचे त्रास मोठ्याप्रमाणात व्हायचा! आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मॅट टाकण्याचा आदेश दिला. अन अनेकांच्या नाजूक भावना दुखावल्या. (more…)
बोलणे आणि करणे
बोलणे आणि करणे! आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो. बऱ्याच कल्पना मांडत असतो. अनेक चुका दिसतात त्या दाखवत देखील असतो. परंतु अनेकदा आपण स्वतः त्याचे पालन करतो का हे पाहायचे विसरतो. खरं तर एक गोष्ट आठवते. मला जे सांगायचे ते त्या गोष्टीचे सार आहे.
सुधारणा
स्वतःमध्ये सुधारणा करणे म्हणजेच प्रगती करणे. अनेकदा आपण अनेक गोष्टी ठरवतो. त्यासाठी प्रयत्न करतो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी तर कधी त्या गोष्टी करणेच राहून जाते! असे होते कारण आपल्याला एकतर त्या गोष्टी करायच्या नसतात. किंवा आपल्याला त्यात फारसे काही जमत नसते. (more…)
विचारवंतांचे तांडव
आजकाल राजकारण म्हणजे वाईट असे म्हणणाऱ्या विचारवंतांची एक पिढी जन्माला आली आहे! ही प्रजाती सगळीकडेच आढळते. हे स्वतःला सकारात्मक समजतात. मी अन माझं घर हेच काय ते घोषवाक्य! बरं घोषवाक्याबद्दल काही म्हणणे नाही. परंतु ही जमात सर्वच राजकारण्यांना भोंदू, स्वार्थी व भ्रष्ट्राचार समजते. मुळात अशांना राजकारणाचा जाम तिटकारा आहे. (more…)
भारत महासत्ता व्हायचा असेल तर
भारत महासत्ता व्हायचा असेल तर तळागाळातला माणूस वर आणला पाहीजे! ~ हणमंतराव गायकवाड
ऑपरेटर हवा :: दोन जागा
पदाचे नाव: ऑपरेटर
आवश्यक: मराठी मंगल फॉन्टमध्ये टायपिंगचा अनुभव
स्थान: पुणे
संपर्क: punejobs007@gmail.com / 7447443198
साभार: @eSakalUpdate
जीमेल आयडी कसा तयार करावा?
जीमेल ही जगातील सर्वात मोठी इमेल सेवा आहे. व्हॅट्सऍप आणि स्कायपी/फेसबुक मेसेंजरच्या युगात ह्याबद्दल फारसे बोलावे असे नाही. परंतु आजही व्यावसायिक पातळीवर इमेलला महत्व आहे. १.४ अब्ज लोक जीमेलचा वापर करतात. १ एप्रिल २०१४ (चौदा वर्षांपूर्वी) साली याची सुरवात झाली. (more…)
ग्रामगीता – अध्याय पहिला २१
सुर्य जैसा नभी उगवला ।
अंधकाराचा नाश झाला ।
तैसा तूं हृदयीं प्रकटला ।
जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
ग्रामगीता – अध्याय पहिला २०
यासीच पाहिजे सूर्यकिरण ।
अनेक मार्ग दिसती दूरून ।
अनुभवया आपुलें चिंतन ।
ध्येय – प्राप्तिरूपाने ॥२०॥– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)