पत्रकारिता एक धंदा!

काय बोलावं आणि किती बोलावं असा हा विषय! काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका गावात दोन मुलांना पाण्याच्या विहिरीत विनापरवानगी पोहले म्हणून नागडं करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ देखील बनवण्यात आला. पत्रकारांनी नेहमीप्रमाणे अत्याचारित कोण आहे याची माहिती काढली तर दोघेही मातंग समाजाचे! आणि आरोपी जोशी आडनावाचा. झालं भली मोठ्ठी बातमी मिळाल्याचा आव आला आणि प्रत्येक चॅनेल/वृत्तपत्राचे पत्रकार धपाधप बातम्या टाकू लागले. (more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला १९

तूंची खरा निश्चयी अविनाशी ।
कधीकाळांही न ढळशी ।
सर्व गुणज्ञान तुझेपाशी ।
हवे ते ते लाभती ॥१९॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

(more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला १८

तारकेवरि दृष्टि धरली ।
तीचि स्वयें क्षणांत उडाली ।
तैसी गति होईल आमुची भली ।
विशाल मार्गी ॥१८॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

(more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला १७

उजेडाकरितां काजवे धरावे ।
भुललिया मार्गी परतों जावें ।
तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावें ।
निर्भयपणे ? ॥१७॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

(more…)

व्यवसायातील कानगोष्टी

गेले अडीच वर्षांपासून मी वेबसाईट डिझायनिंगचा व्यवसाय करतो आहे. त्याआधी साधारण नऊ वर्षे ह्याच क्षेत्रात नोकरी केलेली. व्यवसायात सुरु करण्यापूर्वी साधारण कधीही व्यवसाय न केलेल्या कुटुंबात ज्या सगळ्या गोष्टी घडतात तेच घडलेलं. घरच्यांना खरं तर हा धक्का होता. व त्यांना तो निर्णय अजूनही अनाकलनीय वाटतो. लाखभराचा महिन्याला खात्यात जमा होणारी नोकरी सोडून सगळंच अनिश्चित असलेल्या गोष्टीत पडायचं कशासाठी हा त्यांचा प्रश्न होता! (more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला १६

दुजा कोणा शरण जावें ।
तरी सर्वांगीण शक्ति केंवि पावें ?
एकेकाचे चरण धरावे ।
तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

(more…)

राजकीय भूमिका आणि आपण

अनेकदा असं म्हटले जाते की राजकारण्यांनी ह्या देशाचे वाटोळे केले आहे. पण ते वस्तुतः सत्य नाही. कदाचित हे मी मान्यदेखील केले असते. परंतु मला आलेले अनुभव नेमके उलटे आहेत. मी फार तज्ञ वगैरे नाही. परंतु सद्विवेकबुद्धी प्रत्येकाजवळ असते. सध्यस्थितीत जे चालले आहे हे आपल्या उदासीनतेचा परिणाम आहे. (more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला १५

हें जेव्हां अनुभवा आलें ।
तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें ।
म्हणोनि तुझ्या नामी वेधलें ।
चित्त सर्वतोपरी ॥१५॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

(more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला १४

कष्टासाठी कोणी मरो ।
प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों ।
होतें ऐसें ॥१४॥

– संत तुकडोजी महाराज

(more…)

दिनक्रम

दिनक्रम ही अशी गोष्ट आहे की जी जीवन बदलून टाकते. काहीवेळा आयुष्य देखील उलथवून टाकू शकते. दिनक्रम खरं तर पाळणे खूपच अवघड गोष्ट आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडून पाळला जातो आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीपर्यंत मी जी गोष्ट ठरवायचो ती ठरल्याप्रमाणे होणार नाही अशीच परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी त्यावर मात केली आहे. (more…)