मोदी भक्तांची लक्षणे

मोदी भक्त कोण हे ओळखणे अतिशय सोपे व साधे आहे! भक्तांचे पहिले लक्षण! ते ‘अति सकारात्मक’ असतात. मग नोटबंदी असो वा अन्य कोणतेही प्रश्न! त्यांच्याकडे प्रत्येकाचे उत्तर असते! आणि तुम्ही जोपर्यंत निरुत्तर होणार नाही तोपर्यंत हे स्वतःचा वेळ खर्च करून तुमचे मत बदलण्यासाठी ते प्रयत्न करतात. (more…)

कोणता व्यवसाय करू?

व्यवसाय हा कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळा हे शिकण्याचे माध्यम असेल. परंतु शाळेत विद्येच्या बदल्यात मिळणारे वेतन हे शिक्षकांसाठी व्यवसायरूपी साधन असते. चहाची टपरी ते हॉटेलपर्यंतच्या गोष्टी व्यवसायात मोडतात. तेच काय आजकाल फेसबुक, ट्विटर हे देखील व्यावसायिक साधने झाले आहे. (more…)

सरकार आणि आपण

सरकार म्हणजे कोण? हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते. (more…)

योग्य क्षेत्र

जीवनाच्या प्रवासात मागे वळून पाहिले की अनेक टप्पे दिसतात. शालेय जीवन व त्यापुढील ध्येयाचा/क्षेत्र कडे प्रवास! आयुष्यात काय करायचं आहे हे ठरवावं अस म्हणतात. परंतु माझ्या बाबतीत हे कधी घडलं नाही. (more…)

व्यायाम

अनेकदा अनेक कल्पना आपल्या डोक्यात येतात. पण कधी वेळेअभावी तर कधी आळसामुळे ठरवलेली गोष्ट पूर्ण करता येत नाही. खरं तर या विषयावर खूप आधीच बोलणार होतो. पण अशाच एका गोष्टीला वाव देऊ शकत नव्हतो म्हणून थांबलेलो! गेले चार दिवसांपासून व्यायाम सुरु केला आहे. खूप दिवसांनंतर ही इच्छा पूर्ण होते आहे. (more…)

इंधन दर जास्ती कशासाठी?

इंधन दरात भाववाढ होणे याचाच अर्थ महागाई वाढणे. कारण, इंधनाचा थेट परिणाम वाहतुकीवर व पर्यायाने दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवर होतो. वाहतूक खर्च वाढला तर उत्पादनाच्या निर्मितीचा खर्च वाढतो. जो वस्तूची किंमत वाढून वसूल केला जातो. हा सामान्यांना जितका त्रासदायक आहे तितकाच सरकारी पातळीवर आनंद देणारा आहे. (more…)

सिंहाच्या बछड्यांची गोष्ट

एक गोष्ट! कोणे एके काळी भरत खंडात गुजराच्या सिंहाचे राज्य होते! त्याचे अनेक बछडे होते. प्रत्येक बछड्याचे सिंहावर फार प्रेम. त्याची डरकाळी भरतखंडाला हादरे देत असे. बाकीचे प्राणी विशेषतः वाघ, हत्तीनां त्याचा विशेष राग होता. सुरवातीला सगळं ठीक चाललेलं. पण पुढे जाऊन सिंह मनात आलेल्या गोष्टी सर्वांना अंमलात आणावयास लावी. कधी नोटाबंदी तर कधी प्राणी गणना! (more…)

भेदभावाचे अर्थकारण

भारत माझा देश आहे व सर्व भारतीय माझे बांधव आहे हा शुद्ध गैरसमज वाटावा अशा गोष्टी घडत आहेत. अर्थकारण देखील तेच! जेव्हा व्हिडीओकॉनचे धूत नियमाप्रमाणे कर्ज काढतात आणि त्याचे हप्ते देखील वेळेवर भरतात. तरीही इन्कम टॅक्स विभाग त्यांना समन्स पाठवतो व चौकशीला बोलावतो! पन्नास कोटीसाठी डीएसकेनां कारागृहात जावे लागते. त्याउलट नऊ हजार कोटींचे कर्ज फेडू न शकलेल्या अनिल अंबानींना ना कारागृहात जावे लागते न इन्कम टॅक्सकडून साधे पत्र जाते. ह्याला भेदभाव नाही तर काय म्हणायचे? (more…)

काय महत्वाचे?

महत्वाचे काय? आपण कुठे चाललो आहोत ह्याच भान राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फालतू नगरसेवकाच्या पोटनिवडणुकीत मुर्दे पाडले जातात. गुन्हेगार चक्क राज्यातील आमदार! गुन्हेगारांना पोलीस चौक्यातून सहीसलामत सुटका करणारे देखील राज्याचे आमदार! पाणी पडल्याच्या कारणावरून खून आणि अनधिकृत नळजोडणी मनपाने तोडली म्हणून दंगल केली जाते. (more…)

दिशा आणि दशा

दैनंदिन कामाच्या गराड्यात आपण आपल्यालाच विसरून जातो! दिशा नसतेच! आपल्याला काय करायला हवे वा आपल्याला जे करायचे असते ते न होताच आपण गुंतून पडतो. कधीकधी कामाचा व्याप एवढा वाढतो की आपण जे ठरवलेलं असत ते देखील विसरून जातो! अगदी आठवीपासून न चुकता अर्थर्वशीर्ष, रामरक्षा व मारुतीस्तोत्र म्हणायचो! गेल्या वर्षभरापासून ते कामामुळे रोजच राहून जायचं. पुन्हा सातत्य यायला वर्ष गेलेलं. (more…)