ग्रामगीता – अध्याय पहिला १३

ग्रामगीता:

दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें ।
दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें ।
होतें ऐसें ॥१३॥

– संत तुकडोजी महाराज

(more…)

निष्पाप सलमान

खरंच किती अन्याय ह्या निष्पाप सलमान खानवर! न्यायसंस्था खंबीर आहे म्हणून बरं, नाहीतर ह्या क्रूर लोकांनी दयावान व भारताचा ब्लॅक डायमंड व आमच्या लाडक्या सलमानला त्रासून मारले असते. नाही मला तुम्ही सांगाच आता! फुटपाथवर गाडी घातली मग काय असं मोठं केलं. मान्य आहे आमच्या भाईने दारू ढोसलेली. बरं गाडी खाली कशाला यायचं लोकांनी? चूक त्या गरिबांची आहे. उलट आमच्या भाईनीं देश हिताचेच काम केलं. आता फुटपाथवर झोपायला काय बसायलाही लोक घाबरतात. आणि कुणी बसलेच तर झोपेतही सलमाची स्वप्न पडतात. देशकार्य केलं म्हणून पुरस्कार द्यायचा सोडून केस टाकली? (more…)

भाषा

भाषा /बोलण्याची पद्धत महत्त्वाचीच! थोड्या वेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा! सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं होत!). मला खरं तर हसावं की रडावं तेच समजेना. साहेबांना ‘सेक्रेटरीशी बोला’ असं म्हणून मी फोन कट केला. (more…)

कायदा आणि आपण

खरं तर कायदा बद्दल काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे? (more…)

आधारकार्ड : माझा विरोध कशासाठी?

काही बोलण्याआधी काही स्पष्ट करावेसे वाटते. आधारकार्ड एक चांगली योजना आहे. परंतु ज्या प्रकारे तिचा आवाका वाढवला त्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना अशी योजना असावी ही त्यावेळचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी चाचपणी झाली. त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंह यांच्या काळात याला मूर्त स्वरूप आले. रेशन व अन्य काही गोष्टीपुरता याचा आवाका होता. २००९ साली निलेकेणी या इन्फोसिस संस्थापकांचा मार्गदर्शनाखाली एक कंपनी सुरु करण्यात आली. मला युआयडीएआयच्या इतिहासात जायचं नाही. थोडक्यात, सरकारने एका भागीदार झाले. मग काय नियम असतील. कायदा कसा असेल यातही निलेकेणी यांच्या सौ. कंपनीने सरकारला सल्ले दिले! (more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला १२

ग्रामगीता: 

परि आम्ही वंचित दर्शनासि ।
परसुखें आनंद कुठला आम्हांसि?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी ।
मानतो स्वर्ग ॥१२॥
– संत तुकडोजी महाराज

(more…)

ग्रामगीता – अध्याय पहिला ११

ग्रामगीता :

ज्यासि तुझें दर्शन घडलें ।
त्यास कैंचे परके राहिले? ।
सर्व विश्वचि झालें आपुलें ।
दिव्यपणीं ॥११॥
– संत तुकडोजी महाराज

 

अर्थ: ज्याला तुझे दर्शन झाले त्याच्यासाठी कोणी अनोळखी आणि अज्ञात असू शकते? संपूर्ण विश्वाची आपले असे जिवंतपणी वाटू लागते!

ग्रामगीता – अध्याय पहिला १०

ग्रामगीता – अध्याय पहिला १०

जेव्हां तुझे दर्शन घडे ।
उघडतीं विशाल ज्ञानाची कवडें ।
मग मी – तूं – पणाचे पोवाडे । कोठचे तेथे? ॥१०॥
– संत तुकडोजी महाराज

अर्थ: हे सद्गुरु भगवंता जेव्हा तुझे दर्शन घडते तेव्हा सर्व अज्ञानांचा मुळापासून नाश होतो आणि आमचे मि तु पणाचे, अहंपणा चे पोवाडे सर्व नष्ट होतात तेथे फक्त करता आणि करविता भगवंतच आहे अशी भावना होते.

तुझ्या परिपूर्णतेची ही शक्ती :: अध्याय पहिला ९

अर्थ: हे देवा, तुझ्या परिपूर्णतेची ही शक्ती अद्याप आमच्यात नाही, त्यामुळे अज्ञान अद्याप प्रचलित आहे.

तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि ।
अजूनि नाही जीवाभावांत शिरली ।
म्हणोनीच अज्ञानदशा उरली ।
आम्हांपाशी ॥९॥
– संत तुकडोजी महाराज

ज्ञानाचे भांडार

आंतरजाल खरेखुरे भांडार आहे. हे आंतरजाल भलतंच अफाट आहे. इथे काय नाही! जितकी माहिती हवी तितकी उपलब्ध आहे. फक्त विचार करण्याची गरज आहे. गुगल महाराज आपल्या समोर हजारो लेख/तत्सबंधी माहिती आपल्या समोर एका चुटकी सरशी दाखवते. माहितीच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे आपल्याला माहिती होऊ शकतात. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामुळे सुटू शकतात. त्यातील काही महाकाय भंडारी माहिती आपल्याला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे! (more…)