भयानक फिल्मी भक्ती आहे. सकाळची थंडीची वेळ. डोळे उघडले. धुक्यातून अंधुकसे प्रकाशाची किरणे दिसू लागली. आणि अशा रम्य सकाळी बाजूच्या ‘साई’ मंदिरातून ‘काटा लगा’ संगीतावर ‘साईबाबाचे’ गाणे कानावर ‘आदळले’. झोपेत तर नाही ना म्हणून डोळे चोळून ऐकतो तर तेच. कान साफ करून देखील तेच. पुढचे गाणे एकूण तर थक्कच झालो. (more…)
जोडधंदा
गेले काही दिवसांपासून विचार करतो आहे. किती दिवस असे दुसर्याच्या मळ्यात मजुरीची कामे करायची? दुसर्याची शेती कितीही कसली तरी, येणारे उत्पन्न त्याचे आणि मिळणारा मोबदला त्यामानाने पोटभर अन्न पुरवणारा. आणि समाधान नाही. त्यामुळे सोबत काहीतरी जोडधंदा करावा अस वाटते आहे. (more…)
वाघिणींनो
वाघिणींनो! गेले काही दिवस जे चाललंय ते पाहून बोलल्या वाचून रहात नाही. कसली ती आंदोलने आणि कसल्या मेणबत्या! ही काय न्याय मागायची पद्धत आहे? हे म्हणजे अस झालं की आपल्या घरात सुरक्षित राहता यावं म्हणून घराबाहेरील व्यक्तीकडून अपेक्षा करणे. आपल्या पूर्वजांनी काय हे केलेलं. ती झाशीची राणी, ती काय इंग्रजांपुढे झाशीसाठी आंदोलने किंवा मेणबत्त्या लावत बसली? (more…)
मुलगी झाली
एक गोड बातमी आहे. मुलगी झाली. उशिरा सांगतोय, याबद्दल क्षमस्व! गेल्या महिन्यात, म्हणजेच नोव्हेंबरच्या दोन तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास आमच्या घरी ‘कन्यारत्ना’चे आगमन झाले. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे दोन्ही आजी आजोबा जाम खुश आहेत. आणि बाळाचे बाबा बाळाच्या लीलात मग्न झाल्याने बोलायला उशीर झाला. (more…)
आता तरी देवा आम्हाला..
हे क्रिकेटच्या देवा! हे मनोहरा, हे गोलंदाज निर्दालक, हे संकटमोचक! आम्हा तुझ्या भक्तांना तू खेळपट्टीवर उभा राहून, तुझ्या फळी नामक वज्राची तीक्ष्ण धारेने गोलंदाजांची व समोरील उभा ठाकलेल्या संघाची दाणादाण उडव. तुझ्या लयबद्ध आणि एखादया गायकाच्या आवाजाचा खोलावा जाणावा आणि त्याने श्रोत्यांचे मन तृप्त व्हावेत. त्याप्रमाणे तुझ्या फलंदाजीची मनमोहक फटकेबाजीने आम्हाला तृप्त कर. (more…)
एक थी मांजर
एका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत. (more…)
बाळासाहेब ठाकरे
काय बोलू! अगदी असह्य होतंय. अगदी ती, बाळासाहेब नसण्याची बातमी आल्यापासून ते आतापर्यंत सगळंच.. माहिती नाही का, पण त्या महान व्यक्तीच्या नसण्याच्या गोष्टीने अगदी असुरक्षित वाटत आहे. खर तर एक गोड बातमी तुम्हाला सांगणार होतो. पण हे अस घडलंय की..घराचाच आधारस्तंभ कोसळल्याप्रमाणे वेदना होत आहेत. त्या महामानवाबद्दल काय बोलावं, काय सांगाव. (more…)
लिफ्ट
मला दोन गोष्टी बिलकुलही पटत नाहीत. एक म्हणजे ‘लिफ्ट मागणे’. आणि दुसरे ‘भीक मागणे’. दोन्हीही गोष्टी जरी वेगवेगळया असल्या तरीही साम्य आहे. रोज रस्त्याच्या कडेला हे ‘दीन’करराव हात दाखवत उभे असतात. का कुणास ठाऊक, मेहनतीचा कंटाळा येतो! की लागलेली सवय! दुसऱ्याच्या मदतीवर विसंबून राहतात. भीक मागणारे भिकारी जसे नशिबाच्या समोर गुढगे टेकून, आपला आत्मसन्मान गहाण टाकून दुसऱ्यांकडे ‘याचना’ करतात. तसे हे ‘लिफ्ट’वाले, आळसासमोर गुढगे टेकून, कोणी तरी लिफ्ट देईल या आशेने रस्त्यावर उभे. (more…)
इस्लाम खतरेमें
इस्लाम खतरेमे! आम्हाला सलमान आवडतो. आमीर आणि शारुख देखील आवडतो. आम्ही इरफान आणि सानियाच्या विजयावर आनंदीत देखील होतो. अब्दुल कलाम पुन्हा राष्ट्रपती व्हावे असे मनापासून वाटत होते. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. मुंबई हल्ल्यानंतर आम्ही शांतता भंग होईल अस कोणतेही कृत्य घडू दिले नाही. आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांना आम्ही आमच्या कुचकामी सरकारला जबाबदार धरले. (more…)
सुपर अचिव्हर
कोण म्हणते ‘अंडर अचिव्हर’? ‘टाईम’पास करू नका. तुम्ही तुमच्या एवढ्या टायमात जे करू नाही शकला ते, आमच्या एकट्या ‘सिंग’ने करून दाखवले. उद्या कदाचित जग ‘ओबामा’ला विसरेल पण ‘सिंग’ यांना विसरणे शक्य नाही. हो! खरंच.. काय केल काय त्या ओबामाने? एक लादेन.. बस्स. आणि म्हणे, गांधीजींचा ‘अवतार’. नावात सिंग असून देखील अजून कसाब आणि गुरु जिवंत आहेत. तस् म्हणाल तर ही सुद्धा एक अचिव्हमेंट नव्हे काय? (more…)