आदर्श देशा

देशाने आदर्श घ्यावा अस ‘महान’ राज्य. राष्ट्रीय नेत्यांना लाजवेल असे या राज्याचे ‘आदर्शवादी’ नेते. मी तर म्हणतो, या आदर्शवत राज्याचा कारभार हाकणाऱ्या नेत्यांना, या सरकारला आणि विशेषतः सरकारी कर्मचारी, नाही चूक झाली. या सरकारी ‘जावई’बापूंना ‘भारतरत्न’ कमी पडेल म्हणून, ‘आदर्शरत्न’ पुरस्काराने सन्मानित करायला हवे. खर तर, या महान आणि अनमोल नेते, जावई बापूं मंडळींचा महीमा माझ्यासारख्या बापुड्या ‘आम आदमी’ काय वर्णावा?

(more…)

अनुभव

खर तर ‘केलेल्या चुका’चे गोंडस समानार्थी शब्द कोणता असेल तर तो ‘अनुभव’. म्हणजे, जसे एखाद्या औषधाच्या गोळीला बाहेरील आवरण साखरेप्रमाणे गोड असते तसे. प्रत्येक जण आयुष्यात नित्यनियमाने ‘चुका’ ह्या करीतच असतो. त्यातूनच तो शिकतो. काय ‘नाही’ केल्यावर गोष्ट ‘अचूक’ बनते. हे कळल्यावर तो ‘अनुभवी’, ‘कुशल’ वगैरे बनतो. (more…)

भ्रष्टमेव जयते

भ्रष्टमेव जयते! हाईला! तू तू.. तुम्ही नाव पाहून गडबडला? नाही नाही.. ‘शो’च नाव नाही बदललं. तो कार्यक्रम असणार. रविवारी! होता है! होता है! आणि होणार. हा त्याच पद्धतीचा, पण थोडा, वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा. चिंता करू नका अरेs ‘आल ईझ हेल’. मला ओळखले ना? मी आपल्या सर्वांचा लाडका ‘गरीब खान’. या कार्यक्रमाचा होस्ट. या निर्दयी, निष्ठुर आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस जनतेच्या त्रासाने त्रासलेल्या नेत्यांच्या ‘मन’मध्ये काय चाललेलं. त्यांच्या ‘महान’ आणि ‘आदर्श’ कृत्यांच्या आढावा त्यांच्याच तोंडून. त्यांनी केलेल्या  विकासाच्या (स्वतःच्या) आणि त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी. मला खात्री आहे, हा माझा नवीन ‘शो’ तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. चला, एका ब्रेकची वेळ झाली. (more…)

चाकरी

‘चाकरी’ आणि ‘गुलामी’ हे दोन समानार्थी शब्द आहेत. आश्चर्य वाटेल! परंतु सत्य हेच आहे. पूर्वीच्या काळी धनाढ्य लोक त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी ‘गुलाम’ खरेदी केले जात. खरेदी केलेला ‘गुलाम’ हा माणूसच असे. परंतु त्याने आपला ‘मालकाची’ सर्व कामे. त्याच्या इच्छेनुसार कराव्या लागे. मालकाची वर्तणूक कशीही असो. त्याने कितीही अत्याचार, अन्याय किंवा अपमान करो. ‘गुलाम’ माणसाला त्या सोसावेच लागे. मालक जे देईल (देईलच अशी शाश्वती नाही) ते खायचे. मालक म्हणेल तीच ‘पूर्व’. (more…)

कलाम का लांब?

कलाम काय बोलावं? सांगा आता कुणाला सांगाव? आता ‘अपेक्षा’ कुणाकडून करावी? ‘सोनिया’च्या सरकारने महागाईचा नांगर फिरवला. घोटाळे, करवाढ, भाववाढ!! त्यात आमच्या ‘ताई’ची प्रतिभा काय वर्णावी? स्वतःच्या पोराबाळांनापासून नातवंडांनापर्यंत सगळ्यांकडून ‘जगाचा भूगोलाचा’ अभ्यास गिरवून घेतला. परवाच्या निवडणुकीत पुत्ररत्न कोटींचा दानधर्म करतांना पोलिसांना ‘घावले’ म्हणे! काय महिमा म्हणावा घराण्याचा! कुमारी ‘मीरा’ आपल्या लाडक्या ‘कान्हाला’ शोधण्यात कोटी दस कोटी अर्पण केलेत. कुणास ठाऊक ‘कान्हाचे’ दर्शन घडले की नाही! आता याच्यापुढे कुणी किती आणि कसे उपकार केलेत याच वर्णन करू?? (more…)

परीक्षांचा निकाल

दर वर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर ‘परीक्षांचा’ उन्हाळा सुरु होतो. या उन्हाळ्याच्या झळा जवळपास सर्वांनाच बसतात. छोट्या छोट्या बालांपासून ते त्यांच्या मोठ मोठ्या आई बाबांना. काहींच्या तर आजी आजोबांना देखील. जून महिन्यात मग सुरु होतो पावसाळा ‘परीक्षेच्या निकालांचा’. काहींचा पुरता ‘निकाल’ लागतो. काही हा पावसाळा आनंदाने साजरा करतात. परंतु, काही मात्र जाम ‘आजारी’ पडतात. (more…)

व्यसन

विश्वातील बहुतांश लोकांना कोणते न कोणते व्यसन जडलेले असतेच. कदाचित आश्चर्य वाटेल! परंतु, खरे आहे. साधारणतः ज्या सवयीचा, मग ती कोणतेही असो, त्या सवयीचा अतिरेक झाला की त्याला ‘व्यसन’ असे संबोधतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो. (more…)

साठी

काल परवाच आपल्या देशातील सरदारांची नव्हे तर आपल्या देशाच्या एकमेव लोकसभेची ‘साठी’ साठा उत्तरे ‘सं’पूर्ण झाली. पाच एकशे सरदार लोकसभेत आणि काही ‘तिहारातून’ या ‘सुवर्ण’क्षण अनुभवला. ठरल्याप्रमाणे लोकशाहीचा आणि पर्यायाने लोकसभेचा उदो उदो केला. आमच्या विशेष प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहिती नुसार अनेक सरदारांनी गेल्या ‘साठ’ वर्षात देशात कशी ‘साठमारी’ केली याचे यथोचित आणि सुखासुखे वर्णन केले. (more…)

विश्व

प्रत्येकाचे वेगवेगळे विश्व. विश्व नेमके कोणते हाच प्रश्न पडावा इतके भिन्न भिन्न. कुणाला संगीताची आवड. तर त्याला जिकडे तिकडे सुरांच्या मैफिली दिसतात. तर कुणी, ‘राजकारण’ पाहून त्यात रमलेले. प्रत्येकाला, आपआपल्या विश्वात आणि त्यात असणाऱ्या/जाणवणाऱ्या गोष्टींचे अप्रुफ. आणि प्रत्येकाला त्या विश्वातून डोके काढून बाहेर पाहायला वेळच नाही. प्रत्येकाची ‘जीवनाची’ समीकरणे वेगवेगळी. आणि प्रत्येकाच्या ‘सूत्रांनी’ आणि त्यांच्या अनुभवाच्या प्रमेयांनी जीवनाची गणिते सोडवून बाकी शून्य आलेली. (more…)

कोंबडी कोणी पळवली…

नेत्यांच्या स्टाईलने…

महात्मा गांधी – कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.

लोकमान्य टिळक – कोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय? (more…)