कर वाचवण्याचे सोपे पर्याय

कर वाचवण्याचे अनेक पर्याय सध्याला उपलब्ध आहेत. कर वाचवणे पेक्षा ‘स्वतःची कमाई’ वाचवणे जास्त संयुक्तिक राहील. त्यातील काही सोपे पर्याय. ‘पीपीएफ अकाऊंट’ बद्दल कदाचित जाणत असाल. ‘पब्लिक प्रोव्हिडंट फंड’ कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेतून ‘पीपीएफ अकाऊंट’ उघडून सध्याच्या नियमानुसार प्रत्येक वर्षाला सत्तर हजारापर्यंत रक्कम करमुक्त केली जावू शकते. आणि नवीन नियमानुसार. जो येत्या आर्थिक वर्षानुसार त्याची मर्यादा एक लाखापर्यंत वाढवली गेलेली आहे. (more…)

स्वतःवर ताबा

स्वतःवर ताबा ठेवणे, कदाचित जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणजे, सकाळी साखर झोपेतून उठतांना ते रात्री विचार चक्रे थांबवून शांत झोपण्यापर्यंत स्वतःवर ताबा ठेवण्याची कसरत करणे फारच जिकीरीचे काम असते. कदाचित, काही गोष्टीत ठेवणे काहींना सहज शक्य असेल. पण, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा असून देखील एखाद्या विशिष्ट कारणामुळे ती गोष्ट न करण्याचे बंधन घालणे खुपच कठीण असते. आता फक्त स्वतःवर बंधन घालणे, याचाच अर्थ स्वतःवर ताबा असणे असा नव्हे. (more…)

माथेफिरू

हे सर्टीफिकेशन खुपंच कमी लोकांना मिळते. आणि हे टिकवणे त्याहून अवघड. कोणी संताने नमूद म्हटले आहे नां ‘जया अंगी माथेफिरूपण| तया यातना कठीण||’ खर आहे म्हणा. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. दोनशे बळी घेऊन देखील कसाबला ‘आरोपी’ आणि ‘दहशतवादी’वरच समाधान मानावे लागले. कसाब काय आणि राजा काय. आणि राजू काय आरोपीच्याच सर्टीफिकेशन पर्यंत जाऊ शकतात. एवढेच काय नक्षलवादी देखील फार फार तर ‘दहशतवादी’ सर्टिफिकेट मिळवू शकतील. कारण, ‘माथेफिरू’ची परीक्षा तितकी अवघड आहे. ‘गुरु’जी सुद्धा संसदेत केलेल्या हल्ल्यानंतर जेमतेम ‘गुन्हेगार’ सर्टिफाईड होवू शकले. (more…)

क्षमा असावी.. महाराज

राजे आम्हाला क्षमा करा! खरच आमच चुकल. महाराज तुमचा २०२० मध्ये इतिहास कसा असेल? कसा बदलला जाईल. यावर हा बापडा बोलला. राजे आता काय बोलायचं? वर्तमान काय वर्णावा. आपले मावळे, आपल्याच मावळ्यांची उणीदुणी काढत बसले आहे. कुणा मावळ्याला वाटत माझीच जात ‘लय भारी’. आणि दुसऱ्याची जात ‘राक्षसाची’. बर राजे तुम्हीच सांगा. (more…)

बेगरफिशर

कसला गहजब चाललाय? अस काय झालं की, ढग कोसळल्याप्रमाणे सगळीकडून आरडाओरड चालू झाली? आम्ही त्या बिचाऱ्या ‘बेगरफिशर’ ला मदत करायची काय ठरवली की, सर्वच उठून बोलायला लागले. बघा कस आहे की, आधी सरकार काही करत नाही म्हणून ओरडायच.. आणि करतो म्हटलं की, तरीही टाहो फोडायचा. दुसरा काम धंदा नाही काय? तो गरीब ‘विजय ढोल्या’ आमच्या दरबारी शरण आला. शरण आलेल्याच रक्षण करणे हा आमचा धर्मच आहे. तसं आम्ही ‘निधर्मी’ आहोतच. (more…)

का?

प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी कशासाठी म्हणत तो येतो. या विचाराने मन खजील होते. (more…)

आयटीतील म्हणी

आयटीतील म्हणी 🙂

  • मायक्रोसॉफ्ट तिथ बग.
  • पीएम आला आणि लेक्चर देवून गेला.
  • आपला तो टास्क दुसऱ्याचा तो टाईमपास.
  • रात्र थोडी टास्क फार. (more…)

अण्णा यांस

‘प्रौढ’ प्रताप पारनेर, एनजीओ कुलावतंस, राळेगण प्रतिपालक, उपोषणाधीश्वर, अण्णां ना हजारदा दंडवत.

इनंती इशेष, आपली ती परवाची पत्रकार परिषद ऐकली. ऐकून काळजाचा ठोका चुकला. म्हणून पत्राचा खटाटोप केलाय. तुम्ही बाळासाह्यबास्नी लई वंगाळ बोललात. म्हंजी कस हाय माउली, त्या रामलीला मैदानावरचा तो तुमच्यातला अचल, निश्चल सूर्य पाहिल्यावर. अख्खा देश त्या सूर्याच्या प्रकाशाने न्हाहून गेला. दहा-बारा दिवस का असेना. तुमच्यामुळ आम्हाला खरी ‘लोकशाही’ पाहायला मिळाली. माउली, तुमच्या उपोषणान त्या संसदेला नमवल. एक देशाची वज्रमूठ बनली. आणि या सरकार, प्रसासन आणि भ्रष्टाचाराबद्दल मनातील चीड, राग मोकळा करायचा मार्ग मिळाला. तुम्ही म्हटलं अगदी तसाच्या तस देशान केल. आणि म्या सुद्धा. (more…)

पुन: हरी ब्लॉग

कशी सुरवात करू तेच समजत नाही आहे. अनेक दिवसांनी, पुन्हा: एकदा ब्लॉग सुरु करतो आहे. खर तर काय बोलावं, आणि कशी वाक्यरचना करावी यातच घोळ होतो आहे. खूप दिवसांनी बोलतोय म्हणून कदाचित अस घडत असेल. पण, मनात आनंद मात्र नक्की होतोय. मध्यंतरी मी, एक-दोन ब्लॉग सुरु करून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात मन नाही रमलं. आजकाल कामामुळे वेळ काढणे म्हणजे फारच अवघड बाब बनली आहे. पण, ब्लॉग सुरु करण्याची ‘इच्छा’ फार डोकावत होती. चला, आतापासून पुन्हा हरी ब्लॉग.
(more…)

जय महाराष्ट्र!

जय महाराष्ट्र! आज मी या ब्लॉग मधील शेवटची नोंद ‘खरडतो’ आहे. मला समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. ब्लॉग ‘मी’ विषया भोवती फिरत होता. मुळात ‘मी’ हाच एक विषय होता. प्रत्येक वेळी ‘मी’ विषय माझ्याबद्दल होता. माझ्या प्रत्येक गोष्टी माझ्या पुरत्याच होत्या. थोडक्यात, एकटाच ‘ओनर’ होतो. परंतु, आता ‘भागीदारी’ झाली आहे. ‘मी’ चे पन्नास टक्के शेअर परवा मी एका व्यक्तीला दिले आहेत. त्यामुळे आता ‘मी’ माझा राहिलेलो नाही. थोडक्यात स्टेटस ‘सिंगल’चे ‘एंगेज्ड’ झाले आहे. त्यामुळे आता इथेच थांबणे योग्य राहील. (more…)