आयुष्य

आजकाल मनात हे रोज विचार येतात की, जगून काय फायदा? म्हणजे हे आयुष्य कशासाठी? जन्माला येतो. पण कशासाठी? प्रत्येक धडपड, प्रत्येक गोष्ट करतो. प्रत्येक गोष्टीची अपेक्षा आणि त्यासाठी चाललेली धडपड. आणि ती गोष्ट मिळवली की, दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी धडपड. ह्यालाच आयुष्य म्हणतात? बर ते सुख. कोणताही सुख क्षणिकच असते. दुख देखील क्षणिक. पण प्रश्न सुख किंवा दुःखाचा नाही आहे. प्रश्न आहे आयुष्याचा. म्हणजे जन्माचा उद्येश काय हेच कळत नाही. (more…)

बाईक घेतली

एक आनंदाची बातमी द्यायची आहे. शेवटी दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तिची ‘चाक’ माझ्या घराकडे वळली. तिची म्हणजे बाईक ची. मी मागील डिसेंबरच्या सोळा तारखेला तिला म्हणजे हिरो होंडा पॅशन प्रो बुक केलेली. आज माझा मित्र आणि मी तिला आणायला गेलेलो. आकाशी रंगाची, ती सकाळी आकाराच्या सुमारास शोरूम मधून घेतली. घरी आल्यावर तिची पूजा केली. या कार्यक्रमाला ‘प्रमुख पाहुणे’ ‘अआई’ होती. इमारतीच्या गच्चीत बसून त्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली. माझ्या मित्राने पूजा सांगितली. तसे दोन देडफुटे या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे स्थळ माझ्या इमारतीच्या बाजूला जोडून असलेले साई मंदिरा समोरील जागा. (more…)

जय बिहार

बस अजून काही दिवस, मग हेच ‘जय बिहार’ म्हणावे लागेल. नाहीतरी ‘जय’ बिहारकडेच उरला आहे. आमच्याकडील ‘यशवंतांना’ जिवंत जाळले जाते. एका व्यक्तीला भर दिवसा जिवंत जाळले जाते. मारणारा कोण? ज्याला तडीपार केले आहे तो. पुण्यात महिन्याकाठी एक तरी रेप केस होते. तिथेही गुन्हेगाराची बाजू कोण घेत? तर आमचे माननीय आमदार साहेब. तडीपारी रद्द करायला डायरेक्ट मंत्रालयापर्यंत मजल. आमचे मुख्यमंत्री ‘आदर्श’ निर्माण करतात. कृषिमंत्री वाईन गाळत बसतात. ‘जातिवंत’ उपमुख्यमंत्री जमिनींचे व्यवहार करतात. नदीत आणि ओढ्यात भर टाकून जमिनी विकतात. (more…)

जय बंदी

बोला, जय बंदी! आजींचा कालचा लाल किल्ल्यावरील तो सोहळा पाहिला आणि डोळ्याचे पारणे फिटले. आता मला जाम विश्वास बसला आहे की, कायदा कोणीही ‘हातात’ घेऊ शकत नाही. काय ते भाषण आणि काय ते संचलन. आजींचे भाषण मी मन लावून नेहमीच ऐकतो. काय गडकरी साहेब? तुम्ही काय फडतूस विषय घेता. म्हणे तिरंगा फडकवणार लाल चौकात. कळल न! आता पुन्हा असला वेडेपणा करू नका. तस् म्हटलं तर मी तुमच्या पक्षाला कधीच मतदान करीत नाही. परंतु, यावेळी मात्र मुद्दा चुकीचा होता, म्हणून बोलतो आहे. काय गरज होती तिरंगा फडकावयाची? आणि फडकून काय मिळणार होत? (more…)

योगायोग?

योगायोग आहे का काय चालले आहे हेच कळेनास झाल आहे. अस नेहमी नेहमी का घडते तेच कळत नाही. म्हणजे मागील आठवड्यात शुक्रवारी, एक कावळीण माझ्याकडे पहात चालली असते. माझ्या लक्षात आल्यावर मी तिच्याकडे पाहतो. ती मान खाली घालून निघून जाते. ती माझ्याकडे अशी का पहात होती याचा मी विचार करीत चाललो असतांना, पुन्हा एकदा ती तशीच माझ्या समोरून जाते. थोडक्यात ‘एक्शन रिप्ले’. आता हा जो ‘एक्शन रिप्ले’ घडला ना, तो इथे जॉईन होण्याच्या खूप आधी म्हणजे बहुतेक जून वगैरे महिन्यात स्वप्नात पाहिलेला. त्यावेळेसही मी स्वप्नात हाच विचार करीत होतो. (more…)

दिल्ली दरबार

महाराज दिल्ली च्या दिशेने निघाले. महाराज दिल्ली मधील बडी बेगमच्या दरबारी निघाले ही बातमी अख्ख्या बारामतीच्या गडावर वार्यासारखी पसरली. दिल्लीला सोबती म्हणून महाराजांनी ‘उ’पटेल आणि बाळ राजांना सोबत घेतलं. ‘स्व’राज्याचा कारभार करण्याच्या सूचना सरदारांना केल्या. महाराज दिल्ली दरबारी निघाले. महाराजांवरील प्रेमाची पावती म्हणून, कोणी धान्यापासून तयार केलेली वाईन, कोणी ‘सकाळ’ वर्तमानपत्र, तर कोणी क्रिकेटची बॅट. महाराजांनी दिल्लीला कूच केली. महाराजांचे विमान दिल्ली मध्ये उतरले. सकाळचा गारठ्यात महाराज दहा जनपथच्या दरबाराच्या बाहेर पोहचले. बाळ राजे आनंदून ‘महाराज, हा पथ दहा लोकांसाठीच आहे का?’. (more…)

प्रेम रोग

आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. (more…)

हे काय आहे?

हे काय आहे? आज सकाळी सकाळी डोळे उघडले तर, ‘अआई’ माझ्याकडे पाहून ती तिच्या ठरलेल्या स्टाईलमध्ये, म्हणजे मान उजव्या बाजूला झुकवून हसत होती. एकदम मस्त! विसरला नाहीत ना! ‘अआई’ला? खूप दिवसानंतर आज एकदम मस्त वाटत होत. नंतर पुन्हा डुलकी लागलेली. म्हणजे धड झोपेतही नाही आणि जागा आहे असही नाही. मला माझ्या आईच्या आणि तिच्या गप्पा ऐकू येत होत्या. मागील महिन्यात वडिलांनी मला एक ‘टी-पॉय’ घेऊन दिलेला. तो ‘टी-पॉय’ स्टीलचा आहे. आणि वरच्या बाजूला एक जाड काच. तो मी बाहेरच्या खोलीत ठेवला आहे, त्यावर माझी मी बीसीएची आणि माझ्या कोर्सच्या वेळी मिळालेली पुस्तके ठेवलेली आहे. म्हटलं कोणी घरी आल्यावर तेवढंच आपल इम्प्रेशन! (more…)

फ्लेक्स

मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते. ‘तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय बॅनर/भित्तीपत्रके असतात. एका बिल्डरची जाहिरातीत संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या बॅनरवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन मुलांसोबत गोट्या खेळतांना. बाजूला लिहिले असते ‘कंट्रीयार्ड’. बस पुढे निघते. (more…)

रेशन ते स्टेशन

माझ्या घराजवळील सरकारी ‘रेशन’ दुकानाच्या दुकानदाराला पोलिसांनी मागील महिन्यात पकडले. आता तोच नाही तर पिंपरी चिंचवड मधील अजून दोन सरकारी ‘रेशन’ दुकानदारांना पकडले आहे. ते तिघे ‘रेशन’वरील वस्तू रेशनकार्ड वाल्यांना न विकता बाहेर इतर दुकानदारांना विकायचे. परवा त्या निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसच्या ‘महाराणी’ला पकडले. आता महाराणी यासाठी की तिचा रुबाब तसाच होता. आठवतो का मी रेशनकार्ड काढले तो किस्सा? सोडा, मी सांगतो. बहुतेक, हो! ८ मे २००९ मध्ये मी त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तो नवीन रेशनकार्डसाठी फॉर्म भरला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून! त्या तिथल्या दोन कर्मचाऱ्यांनी तो व्यवस्थित तपासला. आणि पंधरा जून नंतर या अस सांगितले. (more…)