आभार महाराष्ट्र टाईम्सचे

आभार महाराष्ट्र टाईम्सचे! दिनांक १५ जानेवारी २०११ला ‘पुणे टाईम्स’ पुरवणीत माझी ‘पहिला दिवस’ ही नोंद छापल्याबद्दल मी, महाराष्ट्र टाईम्सचे आभार मानतो. खर तर, खूप आनंद होत आहे. यामुळे माझ्या संक्रांतीच्या दिवसाची सुरवात खरच खूप गोड झाली. यावर उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमस्व! ब्लॉग सुरु करतांना किंवा आताही अस कोणते वर्तमानपत्र माझ्या ब्लॉगची दाखल घेईल अस वाटलेलं नव्हते. आणि मध्यंतरीचे काही दिवस खरच खूप तणावाखाली गेलेले. (more…)

प्यार किया तो..

म्हणजे आधीच म्हणणार होतो. पण.. राहू द्या. आता मी कंपनीत येतांना बाजूच्या इमारतीसमोर दोन कबुतरांना गुटर्गू करतांना पहिले. ही गोष्ट मला आता नवीन राहिलेली नाही आहे. पुण्यातच काय सगळीकडे अस चालते. काय करणार? कंपनीच्या डाव्याबाजूला थोड्याच अंतरावर कावळ्यांचे कॉलेज आहे. त्याच्या थोड पुढे गेले की, ब्रिगेडीयरांनी केलेल्या भीम पराक्रमाने पावन झालेली एक वास्तू. त्याही थोड पुढे गेले की, एक नावाजलेलं इन्स्टिट्यूट. इकडे कंपनीच्या उजव्या बाजूला खोक्यातील हिरो हिरोईनचे इन्स्टिट्यूट. त्याच्या आणखीन थोड पुढे गेल की चिमण्यांचे कॉलेज. (more…)

आई ग

किती सतावते यार ही आई! गेले किती वर्षांपासून हे चालू आहे. प्रत्येक रुपात ती त्रास देते. आतापर्यंत नऊ अवतार झाले तिचे. बाबा ‘बिल्लू’ गेटच्या बाहेर का नाही हाकलून देत? गेले एक आठवड्यापासून एक पिल्लुसा टास्क करतो आहे. तरीही त्या आईच्या बाळ ‘बग’मुळे तो लांबतच चालला आहे. प्रत्येक डिझायनर आणि डेव्हलपर आयुष्यातील सर्वात जास्त वेळ आईच्या मस्तीखोर ‘बग’ सुधारण्यात घालवतो. बाकीचे कसे, म्हणजे फायरफॉक्स उर्फ मोझीला किंवा बाळ क्रोम. हव तर सफारी, ऑपेरा घ्या. कस समजुदारपणे आणि नीटनेटके काम करतात. (more…)

इंग्रजी भाषा

मी आज एक इंग्रजी भाषेत नवीन ब्लॉग बनवला आहे. ‘इज इट करेक्ट?‘ नावाचा. मुळात माझ आणि इंग्लिशच कधी जमलंच नाही. अगदी शाळेत असल्यापासून. तसं यावेळची बीसीएची परीक्षा सोडली. तर याआधी कधी ह्या इंग्लिश विषयात कधी गटांगळी देखील खाल्ली नाही. पण कधीच इंग्लिश विषय आवडला नाही. गणिताशी अस काही नव्हत. कारण, बर्यापैकी मार्क्स मिळून जायचे. पण आता इंग्लिश सुधारावे अस खूप वाटत आहे. (more…)

‘न’कला

‘न’कला. आज दुपारी एका चित्रकलेच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो. तिथल्या एका कोर्सला अडमिशन घ्यायचे ठरवले आहे. एकतर माझ्यात नाही कला! नुसत्याच ‘न’कला. बर, मी जे काम करतो. हे खर तर आर्टिस्ट लोकांनी करावयाची कामे. मी त्यात घुसखोरी केली आहे. वेब डिझायनिंगसाठी किंवा कुठल्याही ‘डिझायनिंग’साठी ‘डिझाईन’ बॅकग्राउंड असलेला हवा असतो. माझ तसं काहीच नाही. बर मी जे कोडींग करतो, त्यातही ‘घुसखोरीच’. त्यामुळे फार दिवस घुसखोर म्हणून राहायचे नाही. एक चित्रकलेचा तीन महिन्याचा बेसिक कोर्स करतो आहे. शाळेत जेवढी चित्र-विचित्र काढली तेवढीच! आणि त्यानंतर साधी पेन्सिल देखील हाती घेतली नाही. (more…)

खड्डास्थान

हा देश खड्डास्थान आहे. किती ते खड्डे! आणि काय तो देश! आपला देश खरोखर धर्मनिरपेक्ष आहे. जगाने धर्मनिरपेक्षता काय असते हे आपल्या देशाकडून शिकले पाहिजे. आज मला आपल्या सरकार आणि प्रशासनाचा अभिमान वाटत आहे. ते जे म्हणायचे ना की, हा देश हिंदूंचा नाही. तेच खर आहे. हा देश आहे खड्ड्यांचा. इथे अनेक जाती, पंथ आणि धर्म आहे. खूप विविधता आहे. पण ते प्रतिज्ञेत आहे ना ‘विविधतेत एकता’, त्याचा अर्थ आता समजतो आहे. (more…)

बाकी शून्य

शून्य नेहमी विचार करतो की मी ‘शून्य’च का? माझे मूल्यही शून्य का? गणिताच्या ह्या विश्वात, मला कधीच का कोणी नाही मिळणार, ज्याच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तो अंक सर्व काही असेल. एके दिवशी अपघाताने शून्याला दहा अंक मिळाला. त्याच्या सोबत राहून शून्याची किंमत वाढली आणि त्या दहा अंकाची देखील. पण थोड्याच क्षणात गणिताचे नियम बनले आणि तो ते नऊ हेच अंक मुलांक म्हणून ग्राह्य  धरले गेले. आणि त्यामुळे बाकी शून्य राहिला. (more…)

संकल्प

संकल्प ही जगातील सर्वात विनोदी गोष्ट आहे. हो! पण मी हा विनोद करीत नाही आहे. प्रत्येक जण हा विनोद दरवर्षी करीत असतो. दरवर्षाच्या सुरवातीला संकल्पांचा ऋतू सुरु होतो. साधारण जानेवारी महिन्यात सुरु झालेला हा ऋतू याच महिन्यात संपून देखील जातो. त्यामुळे मला, संकल्पाला काही अर्थ नाही अस पटलेलं आहे. आता सरकार नाही का करीत हा विनोद दर पाच वर्षाला! त्या ‘अर्थसंकल्पाला’ काही ‘अर्थ’ असतो? नुसत्या गप्पा. (more…)

पहिला दिवस

काल या नव्या कंपनीचा पहिला दिवस होता. आता दिवस म्हणू की रात्र? म्हणजे नाईटशिप होती. दिवसच मस्त होता. खर तर त्या कंपनीत जायची इच्छाच नव्हती. आणि मी काही आनंदी वगैरे नव्हतो. सकाळी लवकर उठून आवराआवर करायला सुरवात केली. मग लक्षात आले, आज पासून आपली कंपनी बदलली. मग मुडच गेला. पण नंतर ज्यावेळी जाग आली त्यावेळी तिचा ‘ऑल द बेस्ट’चा एसएमएस. त्यानंतर खूप मस्त! (more…)

प्रायश्चित्त

प्रायश्चित्त! बस झाली रे! ही रडारड. ब्लॉग भिजला आता. फार नको, आता नक्कीच ‘ओव्हर डोस’ झाल आहे. गेले तीन दिवसांपासून म्हणजे ३१ डिसेंबर पासूनच किती ते फोन, आणि किती ते मेसेज! खरच आता हे सगळ पाहून घरात कोणीतरी गेल्याप्रमाणे वाटत आहे. उगाच फार झाले तर ब्लॉग उघडल्यावर तुमच्या संगणकाच्या मॉनिटरला त्रास होईल. चला ठीक आहे. ह्या जन्मात नाही जमल! पण पुढच्या, काय म्हणतात ते ‘पुनर्जन्मात’ मी जीवन नावाच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला उर्फ देवाला मला हेमंतचा ‘रोल’ नको म्हणेन. (more…)