आज खूपच जास्त उदास वाटत आहे. म्हणजे तसा मी ‘बोरकर’च आहे. पण आज जरा जास्तच बेकार वाटत आहे. कालचा दिवस आणि आजचा. थोडक्यात दोन टोक. म्हणजे धो धो पावसात चिंब भिजावं. सगळ शरीर रोमांचून निघावं. आणि अचानक कडक तळपत्या उन्हात शरीर भाजून निघावं. काल ती! यार खूप आठवण येते आहे. कस होणार कंपनी सोडल्यावर माझ? मी आलेल्या ऑफर नाकारू का? ‘तिच्याशिवाय’ कस राहू? तिचे येणे, तिचे बोलणे, तिचे पाहणे काय नाही अस विचारा. पण ती आज नाही. सकाळपासून ते खोट हास्य आणून वैताग आला आहे. ती नसते तर सगळाच एकदम उदास झाल्याप्रमाणे वाटते. (more…)
अगदी छान
अगदी छान, छान काय खूपच छान वाटत आहे. ती आता माझ्या डेस्कवर आली होती. काय करू आणि काय नाही अस झाल आहे. सर्वात सुंदर!!! नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान! अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. माझा मित्र मला नाश्ता करायला बोलावत होता. त्याला थोड्या वेळ थांब म्हणालो. ती जस जशी माझ्या डेस्ककडे येत होती. तसं तशी, माझी हालत खराब होत होती. तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. आज तिने इतक्यांदा पिंग केल आहे ना! मला मी हवेत असल्याप्रमाणे वाटत आहे. (more…)
किती कठीण..
किती कठीण! ती दुपारी ऑफिसात येते. तिचा आणि माझ्या ड्रेसचा रंग सारखा. मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा असते. पण कस? सुचत नाही. कॅन्टीनमध्ये मी मित्रांसोबत जेवायला बसतो. सर्वजण गप्पात रंगलेले असतात. मी तिच्या येण्याची वाट पाहत असतो. ती येते.. ती कोमल, ती सुंदर! ती गोड, ती छान! पाहून मी सुखावतो आणि हालहाल सुरु होतात. अगदी पहिल्यांदा पहिले त्यावेळी जस झाल होत तसं! तसं हे आता ‘नेहमीचेच’. मग तिच्याच आठवणी. जेवणानंतर, डेस्कवर बसल्यावर तिला पाहणे हाच ‘एक कलमी कार्यक्रम’ सुरु होतो. तिच्याशी कस बोलू? तिच्या डेस्कवर कसा जाऊ? काय कारण सांगू? सगळा विचार करतो. पण.. हा ‘पण’ मध्ये येतो. (more…)
प्रिय जिहादी यांस
प्रिय जिहादी यांस, वाकून सलाम! काय यार तुम्ही लोक. अस इंस्टालमेंट / हप्त्या हप्त्याने का? मी तर म्हणतो क्वाटर्ली किंवा हाफ इयरली कशाला? वेळ किती महत्वाची आहे. एकदाच काय ते करून टाका. हजार दहा हजार बॉम्बस्फोट देशात फोडून टाका. म्हणजे एकदाच काय ती तुमची ‘कयामत’ आमच्यावर येऊन जाईल. तुमचा खुदा देखील तुमची प्रमोशन ‘जन्नत’मध्ये करून टाकील. मग काय तुम्ही आणि तिथल्या छान छान पोरी!. नाहीतरी या देशावर पहिला हक्क तुम्हा ‘जिहादी’ आणि या आदर्शवादी सरकारचा आहे. तुम्ही कसे डायरेक्ट रिझल्ट. आमच्या सरकारचा सर्व्हर कायमच ‘डाऊन’ असतो. (more…)
वर्ष
वर्ष! काय दिवस होता कालचा! सही! मागील वर्षी म्हणजे सात डिसेंबर २००९ला ही कंपनी जॉईन केलेली. थोडक्यात वर्ष झाले. काय बोलू? हे एक वर्ष म्हणजे ‘पिकनिक’ होती. म्हणजे तशी अजूनही चालू आहे. ते म्हणतात ना ‘नाव मोठ आणि लक्षण खोट’ तसं अगदी. कंपनीच्या इमारती आणि इथल्या सुविधांबद्दल काहीच वाद नाही. अतिशय उत्तम आहे. परंतु इथली जत्रा पाहून अचंबा वाटतो. मागील सात डिसेंबर २००९ ला सकाळी सव्वा सातला आलेलो. आठ वाजता येण्याचे सांगितलेलं. मस्त धुक्यात टिवल्या पावल्या केलेल्या. पुढचा इतिहास उगाळत नाही. पण एकूणच छान अनुभव. तो दिवस आणि कालचा दिवस. खर तर कालच या विषयावर बोलणार होतो. परंतु, तो माझा सखा उर्फ लॅपटॉप कोमात असल्याने गेल्या काही दिवसांपासून इच्छा असून बोलता येत नाही. काल अप्सरा आणि मी ब्रेक आउट रूममध्ये जवळपास पंधरा एक मिनिटे बोलत होतो. (more…)
नोंद
नोंद! इतक्या उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. माझा संगणक गेल्या काही दिवसांपासून ‘कोमात’ गेला असल्याने बोलणे शक्य नाही झाले. पण सर्वांच्या प्रतिक्रिया मी माझ्या मोबाईलवरून नियमित वाचत होतो. सर्वांच्या प्रतिक्रिया मला मान्य आहे. माझ्याकडून खूपच गोंधळ आणि रटाळपणा चालू आहे. जवळपास गेल्या दीड वर्षात नोंद बाळ ३६३ पावले, म्हणजे ही नोंद पकडून ३६४ पावले दुडूदुडू धावला. त्यातील साठी पेक्षा अधिक नोंदी तिच्यावरच आहेत. गेल्या चार महिन्यात मी ‘अप्सरा’ सोडून इतर विषयावर खूपच कमी बोललो, हे खर आहे. प्रत्येक नोंदीत तेच तेच आणि तोच तोच पणा आला, हे देखील खर आहे. (more…)
हे क्षण
हे क्षण! काय बोलू अस झालं आहे. नुसतेच रोमांच सगळया शरीरभर उठत आहे. नुसते क्षण आठवून ही अवस्था आहे. प्रत्यक्ष असेल त्यावेळी! ऑफरसाठी एका कंपनीने फोन केला होता. म्हणजे थोडा जॉईनिंग डेटचा घोळ चालू आहे. काळजी नसावी दोन एक दिवसात त्याचा निकाल लागून जाईल. पण आता का कुणास ठाऊक तिची इतकी ओढ वाढली आहे ना! कालचा दिवस तिने इतका छान केला ना. तिचे ते इमेल. काय कळेनासे झाले आहे, ज्यावेळी ज्याची गरज असते ते तिला कळून जाते. गेले काही दिवसांपासून मी खुपच बैचेन झालो होतो. काल सकाळी सगळंच संपले अस वाटू लागलेलं. खुपंच मूड गेलेला. तीचा ते तीन इमेल आले. आणि सगळ् बदललं. (more…)
निराशाच
निराशाच! सगळ् अस घडतं आहे ना. बरोबर असून चूक. मी जी गोष्ट आजकाल करतो. म्हणजे योग्य करून देखील चुकते. म्हणजे का चुकते हेच समजत नाही आहे. खुपंच बेकार वाटत आहे. सगळीकडे निराशाच! आता वेळ जवळ जवळ संपल्यात जमा आहे. मोजून एक महिना. मागील एका महिन्यात सहा ठिकाणी इंटरव्यू दिले. तीन इंटरव्ह्यू मध्ये सपेशल तोंडावर पडलो. बाकी तीन इंटरव्ह्यू उत्तम गेले. पण काय फायदा. त्यातील एका कंपनीचा पुन्हा कॉल नाही. दुसऱ्या कंपनीचे अजून ऑफर लेटर आलेले नाही. आणि तिसऱ्या कंपनीने उदया अजून एक राउंडसाठी बोलावलं आहे. माझा हा प्रोजेक्ट ह्या माहिन्यात संपेल. निदान मला नवीन जॉबसाठी किमान एक महिना आधी नोटीस द्यावी लागेल. म्हणजे आज उदया मध्येच खेळ करवा लागेल. (more…)
मम्याव
मम्याव! काल मित्राशी बोलत होतो. मला म्हणाला माझ्या मुलीचे मी ‘इंग्लिश’ मिडीयममध्ये शिक्षण करील. ती अजून दहा दिवसाची सुद्धा नाही. तो खुश होता. ‘बाप’ माणसाचा आनंद. संध्याकाळी घरी आलो तर, बाजूची चिमुरडी तिच्या आईला आई न म्हणता ‘मम्याव’ म्हणून हाक मारीत होती. ऐकून हसू आले. परवापर्यंत ती आई म्हणून हाक मारायची. बहुतेक ही तो तिच्या ‘मम्मी’ची इच्छा! मी जिथे रहातो तिथे ही चिल्लर कंपनी खूप आहे. सगळेच ‘देड फुटे’. मजा येते. नुसतीच दंगामस्ती चालू असते. खेळ काहीही! मध्यंतरी पावसानंतर पाण्यात उड्या मारत बसलेली. त्याचे बोबडे बोल! हसू येते. (more…)
कोडे
काय बोलू यार! ती खूपच छान आहे. पण तिचे इमेल म्हणजे एक ‘कोडे’ च असते. प्रत्येक वेळी मी गोंधळून जातो. म्हणजे सगळ्याच इमेल नाही. आजकाल आमच्या दोघांचे रोज एक इमेल पाठवणे चालू असते. खूप छान वाटते, ज्यावेळी तिचा इमेल येतो. आणि त्याहून आनंद होतो, ज्यावेळी ‘टू’ फक्त मीच असतो. आज एक मस्त कोडे पाठवलेल तिने! पहा जमत आहे का? मी सोडवलेल, सोप आहे. तुमची आय क़्यु चेक करा..