ताज ताजातवाना झाला. काय बुवा! आज त्याला भेटायला ‘ओह मामा’ येणार. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांनी केलेली तयारी त्याने पाहिली आहे. बाजूचा त्याचा जुना दोस्त गेटवे हसत ‘ताज’ला बोलला ‘काय, झाली का रे तयारी तुझी?’. ताज ‘हो तर!, मलाही जगाच्या आणि विशेषतः अमेरीकांना मामा करणाऱ्या ओह मामाचे दर्शन घ्यायचे आहे’. ‘काय?’ गेटवे गडबडून बोलला. ताज म्हणाला ‘तुला कळेल तो आल्यावर’. मरीन गप्पा ऐकून हसू लागली. डीएन ने हे पाहून तोंडावर बोट ठेऊन शांत रहायची सूचना मरीनला केली. सीएसटी ‘टी’ घेत किलकिल्या नजरेने ताजला म्हणाला ‘ते तुझ्या डोक्यावर ती छत्री उलटी का लावली आहे?’. ताज ‘अरे ही त्या मामाने पाठवली आहे. मेड इन अमेरिका. त्या छत्रीला रडार म्हणतात. त्याच्या संरक्षणासाठी’. (more…)
आम्ही आणि ते
आम्ही त्यांना ‘विठ्ठल’ म्हणतो. आणि ते आम्हाला ‘घरफोड्या’. आम्ही ‘परप्रांतीयांना’ विरोध करतो. आणि ते ‘आम्हाला’. आम्ही ‘अबू’ची अब्रू काढतो. आणि ते ‘आमची’. ते ‘चिमण्यांनो घरी या’ अस आवाहन करतात. आम्ही त्यांच्या दर्शनाला जातो. आणि ते आम्हाला ‘बाटगे’ म्हणून गेटवरूनच हाकलतात. पण उपमुख्यमंत्री त्यांना ‘पाहुणे’. आम्ही अंबरनाथला त्यांना पाठींबा दिला तर, काहीच ‘नसे’. पण विधानपरिषदेत त्यांच्या विरोधात मतदान केल तर ‘धनसे’. त्यांचा तो ‘पॅटर्न’ आणि आमचा ‘चोखोबार’. त्यांचे ते मराठी ‘प्रेम’. आणि आमचे ते ‘लफडे’. आम्ही त्यांना ‘वाघ’ म्हणतो. आणि ते आम्हाला ‘पिल्लू’ म्हणतात. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले तर ‘साटेलोटे’. आणि त्यांनी कृषीमंत्र्यांना भेटले तर ‘सदिच्छा भेट’. ते स्वतः महाराष्ट्रातील मराठी लोकाची दयनीय अवस्था पाहून ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गरज काय?’ अशी भूमिका मांडतात. आम्ही त्यांच्या सुरात सूर मिसळतो. पण त्यांचाच पक्ष त्यांची ही भूमिका ‘व्यक्तिगत’ आहे अस म्हणतो. (more…)
पुन्हा विरह
कालचा दिवस इतका मस्त! सकाळी येतांना आईने घरून करून आणलेला फराळ आणला. खर तर फराळाला घरी ये अस तिला म्हणणार होतो. पण हे सांगायची हिम्मत करता करता पुढची दिवाळी यायची. आणि जरी हिम्मत केली असती तर, तिची आणि माझी इतकी कुठे मैत्री आहे? की ती माझ्या म्हणण्यावर येईल. आणि त्यात ती तिच्या घरी गेल्यावर दिवाळी नंतर येणार. त्यामुळे काल मी कंपनीत येतांना फराळ आणला. घरून निघाल्यावर तिला पिंग करू की इमेल हा विचार करण्यात कंपनी आली. मग शेवटी इमेल करू अस ठरवलं. एकटीलाच बोलावले असते तर, तिला शंका यायची. म्हणून सगळ्या मित्रांची नावे आणि तिचे नाव बीसीसी मध्ये टाकून मेल टाकला. (more…)
आहे पण नाही
काय यार, सगळ आहे पण वेळेवर काहीच नाही. काल आई इथे माझ्या घरी आली. आज मी कंपनीत येतांना दिवाळीचा फराळ आणला. खर तर तिच्यासाठी! ती आली सुद्धा. फराळ घेतल्यावर मला बोलली की, ‘नवीन मोबाईल कुठे आहे?’ काय सांगू? यार एकाच तर गोष्ट आमच्या दोघात कॉमन झाली असती. पण घर घेण्यासाठी रक्कम जमवाजमव केली. त्यामुळे मोबईलची इच्छा तूर्तास कंट्रोल करावी लागली. तिला घराचे बोलले तर पुन्हा ‘तुम्ही’ अस म्हणाली. काय यार, घर घेण्याची ताकद असलेले फक्त काय काका लोक असतात काय? असो, ते महत्वाचे नाही. मोबाईल घेणे फक्त निमित्त! तिच्या जवळ जाणे हे ‘ध्येय’. खर्चाला कधीच का अंत नसतो? (more…)
संतांची भूमी
खरोखर आपला देश म्हणजे संतांची भूमी आहे. सर्व महात्मा आणि संत लोक इथे वास करीत होते. आणि अजूनही करतात. प्रत्येक ठिकाणी त्या महान संस्कारांचा अनुभव येतो. म्हणूनच की काय ओबामाला इथे यावेसे वाटले. मुळी हा देशच संतमय झालेला आहे. उगाचंच नाही, इतक्या यातना असून देखील देश इतका शांत आहे. काय काय वैशिष्ठ्ये वर्णने करावी या भूमीबद्दल. कुठेही जा, अगदी हिमालयात लडाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत. लडाखमध्ये पाहिले तरी रस्ते असून नसल्याप्रमाणे. आणि कन्याकुमारीत देखील तीच परिस्थिती. आणि जिथे आहे, तिथे न चुकता एका किमीमध्ये दहा-बारा किमान अर्धा फुटांचे खड्डे असणार म्हणजे असणारच. कोण म्हणते देशात एकता नाही? आहे, रस्ते त्याचे प्रतिक आहे. (more…)
सोन्याचे दिवस
रोज येणारा दिवस म्हणजे मोत्याच्या माळेतील एक मोती. पण! हे मोती आता संपत आले आहेत. दोनच महिने पुरतील इतकेच मोती उरले आहेत. काल त्याचा छोटासा अनुभव आला. काय बोलू तिच्याबद्दल? देव दर्शनाला जातांना देवाच्या चरणातील चाफ्याचे फुल, ज्याच्या सुगंधाने वातावरण प्रफुल्लित होते. तिचे बोलणे, तिचे पहाणे. तिचे रूप, ती जशी सोन्याच्या भांड्यात रेशमी वस्त्रात ठेवलेला हिरा, आणि तिची कांती म्हणजे हिऱ्यावर पडलेलं सूर्याची किरणे. त्या झगमगाटात दिवस न्हाऊन निघाला. ते दोन बोलके नेत्र, अस वाटत ते क्षणात बोलायला लागतील. ते ओठ, तिचे हसणे, चालणे, तिची केशरचना. सगळ् पाहून मन क्षणा क्षणाला रोमांचित होते. (more…)
वजन
वजन हा गेल्या काही दिवसांपासून खुपंच जिव्हाळ्याचा विषय होऊन गेला आहे. खर तर पोटाचा वाढता ‘नगारा’ हा त्याहून अधिक जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पण सध्यातरी वजनावरच बोलू. आता वजन किती असावं यावर चर्चा करायला फार काही महान नाही. पण साधारणपणे जितके इंच उंची, तितके किलो वजन असायला हवं, अस वडील नेहमी बोलतात. तेवढे असेल तर सुधृढ. कमी असेल तर लुकडा, आणि जास्त असेल तर जाड. आता माझी उंची पाच फुट पाच इंच (१६५ सेंटीमीटर) आहे. तसा हिशोब पकडला तर माझे वजन साधारणपणे ६५ किलो हवे. दोन महिन्यांपूर्वी कंपनीत शारीरिक परीक्षण होते. त्यावेळी माझे वजन ७२.५ किलो भरलेले. खर तर आनंद झालेला. कारण त्याआधी एक महिन्यांपूर्वी पर्यंत माझे वजन ७५ किलो होते. खरंच मी खुपंच ‘वजनदार’ झालेलो आहे. (more…)
अशोक’राव’
चित्रपटाची सुरवात एका अतिरेकी भीषण हल्याने होते. मुंबईत हल्ल्याने सारा देश हादरून जातो. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होते. बेजबाबदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो. पक्षश्रेष्ठी नवा मुख्यमंत्री कोण करायचा याचा शोध घ्यायला सुरवात करतात. आणि नांदेडात त्यांना हवा तसा व्यक्ती भेटतो. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यावर तो कामाला सुरवात करतो. पण पक्षातील आणि विरोधक त्याला नावे ठेवायला सुरवात करतात. मंत्रिमंडळाची बैठकीला सुरवात होते. सर्व मंत्री नवा मुख्यमंत्री किती फंटूश आहे यावर गप्पा मारायला सुरवात करतात. तेवढ्यात, मुख्यमंत्र्याचे आगमन होते. सर्वजण शांत होतात. (more…)
राँग नंबर
काय बोलू अस झालं आहे. काय चालल आहे हे? आधी मैत्रिणीचे टेन्शन कमी होते की काय म्हणून आता तीच्या सिनिअरचे टेन्शन अजून आले आहे. यार ती तिची सिनिअर थोडीच ‘हेमंत’ आहे, की झुरत बसायला. मला तर आता, ती प्रपोज करील की काय अशी भीती वाटायला लागली आहे. तिचे वागणे एका आठवड्यापासून एकदमच बदलुन गेले आहे. सारखी माझ्याकडे पाहते. नुसती पहात नाही तर एकटक पाहते. साधे मी इकडून तिकडे जात असेल तर तिचे लक्ष माझ्याकडेच. काल दुपारी कॅन्टीनमध्ये तिला पाहून न पाहिल्यासारखे केल. तर ते पाहून तीचा एकदमच चेहरा उतरून गेला. नंतर मलाच खूप बेकार वाटलं. (more…)
का सतावते?
का सतावते आहे ती? चार दिवसांपासून हेच चालू आहे. तसं काल तिने मला दोन मेल पाठवले होते. पण पिंग करून गुड मोर्निंग केल तर, रीप्ल्याच दिला नाही. मी मुर्खासारखा दिवसभर तिने अस का केल म्हणून विचार करीत बसलो. आणि दुपारचा उपास तर आता रोजचाच झाला आहे. यार, रात्री जेवणाची इच्छा होत नाही. आणि सकाळी भूक असून त्या मिल्क शेकवर राहावे लागते. ती त्या जुन्या कॅन्टीनमध्ये जेवते. ती मस्तपैकी घरून डबा आणते. आणि ते जुन्या कॅन्टीनमध्ये ‘जेवण’ पाहून भूकच मारून टाकावी लागते. (more…)