घराणेशाही

‘नारायण! नारायण!’ करीत नारदमुनी भाषणाला उभे राहिले. आराध्य विष्णूला वंदन करून बोलायला सुरवात केली. माझ्या विठ्ठलाने ‘घराणेशाही’ सुरु केली आहे. दहा एक वर्षापूर्वी उद्धवा उद्धवा असा धावा केला. म्हणून मला स्वर्गलोक सोडून नरकात यावे लागले. इथे ‘नारायण’ ऐवजी आता मला ‘गांधारी’ म्हणावे लागते आहे. आणि तिकडे माझ्याप्रमाणेच युवराजला देखील ते सोडून पृथ्वीलोकवर यावे लागले. हे स्वर्गात घडले. नरकात तर हेच चालते. महात्मा गंधर्वांनी सुरु केलेली परंपरा अजूनही चालू आहे. आता नवा राहुल गंधर्व. (more…)

मुकामार

आता रात्री जेवायला हॉटेलात गेलो होतो. जेवण यायला वेळ लागेल म्हणून तिथला एक वेटर सांगून गेला. खर तर खुपंच भूक लागलेली. माझ्या समोरच्या बाजूच्या एका टेबलवर एक कपल बसलेले. तसे दोघेही छान होते. अंतर फारसे लांब नव्हते. दोघांच्या गप्पा स्पष्ट ऐकू येत होत्या. ती मुलगी त्याला सांगत होती की मी तुझा फोटो घरच्यांना दाखवून लगेच डिलीट करील. आणि तोही हसून तीचा आणि त्याचा मोबाईल घेऊन काहीतरी करीत होता. बहुतेक फोटो तीच्या मोबाईलमध्ये पाठवत होता. नंतर मी लक्ष दुसरीकडे दिले तर एक मुलगी फोनवर. खाता खाता तीच्या फोनवर एकदम बारीक आवाजात गप्पा चालू होत्या. हे दोघे फारच गुंग झालेले. मी ऐकायचे टाळून सुद्धा, त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. आणि त्यात तो वेटरही लवकर जेवण घेऊन येईना. शेवटी वैतागून मी, तिथून निघून घरी आलो. येतांना दुध आणि आम्रखंड आणले. (more…)

सीमोल्लंघन

नाक भलतंच जाम झालं आहे. खर तर इथून घरी जातांनाच झालं होते. असो, खूप दिवसांनी, नाही जवळपास एका वर्षांनी ‘तीच्या’ सोबत होतो. सगळे जुने आठवले. तिची स्टेशनवर वाट पहात होतो. रात्री दहाची वेळ. दहा दहाला येते बोललेली. पण नेहमीप्रमाणे ती उशिरा नखरे करीत, नाजुकशी चालतांना नागमोडी वळणे घेत आली. एक वर्ष आधी जशी होती अगदी तशीच. तिची ती धडधड, तीचा तो आवाज. जुन्या कंपनीत असतांना नेहमी आम्ही सोबत जायचो. रोजचं हेच ठरलेलं. ती मला नेहमी पुणे स्टेशनला ‘ड्रॉप’ करायची. तसे आमची ‘अमर प्रेम कहाणी’ मुंबईत देखील होती. मुंबईत तर तीच तर होती सोबत. निम्मा दिवस तिच्याच सोबत गेलेत. पण पुण्यात आलो तर वेगळे. तिची चाल, नखरे वेगळे. (more…)

मन, मेंदू आणि मी

मी सकाळी उठतो. उशीर झालेला असतो. मी पटापट आवरण्याचा प्रयत्न करीत असतो. पण मन मात्र भलतीकडेच. मी दाढी करायला आरशात पाहतो. आणि मन आरशात तिला. ‘बस’ला उशीर होत असतो. आणि मन मात्र तिला कोणता ड्रेस आवडेल ते सांगत असते. पण लगेच मेंदू हटकतो. मी आवरून धावपळ करीत बससाठी स्टॉपवर जातो. तिथे ‘परीवहिनी’ येतात. मी ‘परीवहिनी’कडे पाहतो त्याही हसून माझ्याकडे. पण मन तीच्या स्वप्नात. तिथेही तीच असल्याचा भास होतो. मी हरखून पहात असतो. बसमध्ये बसतो. मोबाईलचे हेडफोन कानाला लावून गाणी सुरु करतो. मन प्रत्येक गाण्यात तिचाच भास करते. मला तिची आठवण येत असते. कंपनीत उतरतांना मन प्रश्न विचारते ‘ती आजारी तर नाही ना? मग ती का नसेल आली दोन दिवस? की घरी गेली’. मेंदू उत्तरतो ‘तुला काय गरज नसत्या चौकशा’. मी खिन्नपणे इमारतीच्या जिन्यातून चाललेलो असतो. (more…)

अजून एक परीक्षा

आज ती ऑफिसला आलेली आहे. इतकी मस्त ना! सगळच छान वाटत आहे. दोन दिवसाचं जेवण आज दुपारी केल. तेही निम्म्या वेळेत. आज ती खूपच छान दिसते आहे. आज सकाळी तीच्या आनंदात माझ्या पीएमला बिनधास्त पिंग करून ‘भेटायचे आहे’ म्हटले. त्याने दुपारी फोन कर असे बोलला. दुपारी फोन केल्यावर, अरे मी कशाबद्दल तेच सांगायचे राहून गेले. मी इथे कंत्राटदार म्हणून आहे ना. तर मला याच कंपनीच्या पे रोल येण्यासाठी काही करता येईल का ते पाहत होतो. आता तो माझा पीएम आणि माझे आधी घडले बिघडले झाले आहे. (more…)

का हा दुरावा?

कसं बोलावं? ती गेले दोन दिवसांपासून ऑफिसमध्ये आलेली नाही. बहुतेक सुट्टी घेऊन घरी गेली असावी. मला खूप आठवण येते आहे. दोन दिवसांपासून तिने पाठवलेले सगळे मेल, तिच्याबरोबर झालेली चॅटची दोन पारायणे झाली आहेत. आणि वाचतांना तीचा तो छानसा चेहरा आठवतो. तो दोन ऑगस्ट आठवतो. ज्या दिवशी मी तिच्याशी पहिल्यांदा बोललो तो दिवस. आणि तिचे तीन ऑगस्टचे ‘हाय’. आणि परवाचे ‘हाय डियर’.. अगदी भरून आल होत मन. दोन दिवसांपासून मी नॉर्मल असल्याचा खूप खूप प्रयत्न केला. पण आता खरंच कंट्रोल नाही होत. (more…)

गांधीगिरी

आता गांधीगिरी कशाला म्हणतात हे सांगायला हवं का? तुम्ही पण काय थट्टा करत आहात. अहो, जसे प्रत्येक पुणेकराला ‘दादागिरी’ आणि ‘भाईगीरी’ माहिती आहे. तसे प्रत्येक भारतीयाला गांधीगिरी म्हणजे काय हे माहिती आहे. बर, तुम्हाला लवासाची ‘पॉवरगिरी’ नक्की माहिती असेल? ते सुद्धा नाही. आता मात्र कमाल झाली. बर मुंबईतली ‘गोळीबार गिरी’ तरी माहिती असेल ना. ते सुद्धा नाही, बर ठीक आहे. मी सांगतो. ‘बंबई को किसने बचाया?? एनएसजी के लडकोने| एनएसजी के लडके कहा के?? उपी बेकार के|’. समजलं ना!! नाही? काय आता देवाशपथ! बर ठीक आहे. ‘मी देशाचा आणि देश माझा’. आता तरी लक्षात आल असेल ना. वाक्य अगदी बरोबर आहे. देश ह्या ‘राहू’चाच तर आहे. तर याला गांधीगिरी म्हणतात. (more…)

काय करू काय नाही

काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, पण मी तिला प्रपोज करू शकतो. फक्त तीच्या नकाराची भीती वाटते. ती नाराज होईल याची भीती वाटते. (more…)

डियर

नाचावस वाटत आहे. काहीच सुचत नाही आहे. कालचा तो दिवस ‘वाळवंट’. आणि आज काय बोलू ‘धबधबा’. आज तिने मला गुड मोर्निंगचा मेल केला. आणि मी पिंग करून गुड मोर्निंग केल्यावर ‘हाय डियर, गुड मोर्निंग’ केल. बस अजून विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे ती मित्र म्हणून म्हटली असेल कदाचित. पण काही का असेना. आज ती इतकी छान दिसते आहे म्हणू सांगू. बस तिलाच पहाव अस वाटत आहे. काल कसला गेला. रात्र देखील बेकार. विचारांनी डोके पकवून टाकलेले. त्यात हे सल्ले. काय म्हणतात त्याला ‘वॉट अन् आयडिया’. (more…)

झोप

आज कामाच्या दिवशी साडेनऊला उठण्याचा भीम पराक्रम केला. त्यामुळे कंपनीची लेट मोर्निंगची बस देखील चुकली. आता रात्री तीन वाजता झोपल्यावर लवकर कशी जाग येणार? मला खरंच काहीच सुचेनासे झाले आहे. गेल्या महिन्यापासून मला तीन वाजेच्या आत झोपच येत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर खूप आळस येतो. आणि आता माझा चेहरा काळवंडून गेला आहे. ओठ देखील तसेच. दिवसा मी झोपत नाही. तरी सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत झोपच येत नाही. (more…)