दुरावा

माफ करा, मी स्वतःला नाही ‘आवरू’ शकत. आजकाल रोजच नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. कालपासून तिची जागा बदलली. आता ती तिच्या मैत्रिणीच्या आणि त्या तिच्या सिनिअरच्या क्यूबमध्ये बसते. मला ना, काहीच सुचत नाही आहे. आता मी तिच्या सोबत कसा बोलू. म्हणजे आधी ती माझ्या डेस्कच्या जवळच तिचा डेस्क होता. त्यामुळे येता जाता तिच्याशी बोलायची आणि तिला पाहण्याची संधी मिळत होती. पाणी आणायला जातांना सुद्धा जायची. पण आता ते सुद्धा नाही. (more…)

सामना

वेलकम, आजच्या इंडिया आणि कश्मीर (जम्मू नाही) यात क्रिकेटचा एक लंगोटी सामना होत आहे. माझ्यासोबत, कॉमेंट्री बंकरमध्ये आहे ‘चंद्र’ शास्त्री. सामन्याच्या आधी आपण खेळपट्टीची पाहणी करूयात. काय वाटत चंद्रा? चंद्रा ‘वेल, इफ यु सी इन पीच, देअर आर सो मेनी घाटी अन् स्टोन्स’. ‘थांक्स, चंद्रा’. आता आपण डायरेक्ट मैदानात पाहुयात कोण टॉस जिंकते आहे. टीम इंडियाचा कॅप्टन ‘ओमर दुल्हा’ (छापा) आणि काश्मीरचा कॅप्टन पाकलानी (काटा) यांच्यात टॉस होत आहे. पाकलानी ने चारणे हवेत फेकले आहेत. आणि ‘काटा’. सामन्याचे (पोपट)पंच जनाब नापाक यांना पाकलानी यांनी गोलंदाजी घेण्याचा निर्णय कानात सांगितला आहे. अरे हे काय, ओमर दुल्हा काही तरी बडबड करीत आहेत. त्यांचे मत जाणून घेऊयात. ओमर दुल्हा ‘हा अन्याय आहे. हे चारणे बच्चन छाप आहेत’. (more…)

येजा वू

काय करू यार? देवाने माझ्या चित्रपटात तेच तेच सीन का टाकले तेच कळत नाही. बर ह्या विषयावर, मी खूप बोलायचे टाळत होतो. पण आज इतक्यांदा घडलं ना! सकाळी लवकर उठायचे ठरवून देखील आज मी उशिरा उठलो. आधीच खूप गोरा होता. दोन दिवस उन्हात भटकल्यामुळे आणखीन गोरा झालो. लेट मॉर्निंगची बससाठी सुद्धा धावपळ झाली. देवपूजा नाही झाली आज. बस स्टॉप गेलो तर ‘परीवहिनी’. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून रोज कुठे ना कुठे दिसतातच. त्यांना विचारलं ‘बस गेली नाही ना अजून’. तर त्यांनी हसून ‘नाही’ म्हणाल्या. त्या गप्पा मारायच्या रंगात होत्या. असो, मी ‘टाळले’. मग पुन्हा एकदा, त्यांना पहिले तर त्या आपल्या हसरा चेहरा करून माझ्याकडे पहात होत्या. मग हे आधी कुठे तरी पहिले अस वाटायला लागले. बसमध्ये बसल्यावर, मी मुंबईला असतांना हे असल् ‘अर्धवट’, ‘अर्थहीन’ स्वप्न पडलेलं आठवलं. (more…)

पीएम बोले तो..

गाण्याला सुरवात होते. फोनची रिंग वाजते.. ट्रिंग ट्रिंग. ‘हाल्लो.. सार्क परिषदेला आ रेला हू| दहा जनपथ जा रे ला हू| जे जे टाटा आ रेला हू मेरे बाप’. मागे सगळे पंटर लोक गोंधळून हिरोकडे एकटक नजरेने पहात असतात. इकडे फोनवर हीरो ‘अरे अमेरिका आ रे ला हू| अरे किधर किधर.. सुप्रीम कोर्ट होल्ड मॅन होल्ड आय एम बिझी..अं’. मागे सर्किट काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि हातातील आदेशाची फाईल घेऊन हिरोकडे पहात असतो. हीरो मागे वळून दाढी कुरवाळतो. आणि चष्मा सावरून आपली नेहमीचीच स्माईल देतो. त्याचा आनंदी चेहरा बघताच सर्व पंटर लोक आनंदाने उद्या मारीत हिरोच्या दिशेने धावत सुटतात. आणि हिरोच्या अंगावर पडतात. हीरो आणि त्याची पंटरची टीम राजघाटावर जाते. जातांना पंटर लोक हातात फुगे घेऊन आणि हिरोच्या मागे अगदी स्टाईलमध्ये जातात. (more…)

प्रेम

खर सांगतो. अजूनही मला हाच प्रश्न पडलेला आहे. प्रेम म्हणजे नेमक काय? याच उत्तरच सापडत नाही आहे. मी संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. म्हणजे आमची दोघांचे खूप वाद आणि मस्ती चालायची. एकमेकांना खेचाखेची सोडून काहीच नाही चालायचे. ती इन्स्टिट्यूटमध्ये आली की तीचा पहिला प्रश्न हाच असायचा की ‘हेमंत कुठे आहे?’. आणि मी गेलो तरी हेच. अस थोडे थोडके नाही दीड एक वर्ष चाललेलं. ती गोष्ट वेगळी की माझ्या मित्राला ती खूप आवडायची. त्याला नंतर नंतर आमच्या दोघात काही तरी. म्हणजे त्याच्या चित्रपटाचा मीच ‘व्हिलन’ वाटायला लागलो. म्हणून मग मी तिच्याशी बोलायचे बंद केले. (more…)

फक्त अप्सराच

कालचा दिवस. आहाहा! काल ती त्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. आणि तिची ती निळ्या रंगाची ओढणी. आणि माझ्या ड्रेसचा रंग निळा. खूप छान वाटलं. काल देखील शेवटीच तिनेच ‘हाय’ केले. ती माझ्या डेस्कजवळून जातांना माझ्याकडे पहात जाते. आणि इतकी छान स्माईल देते. काल अस, दोन तीनदा घडलेलं. परवा तिची मीटिंग संपली. आणि मी त्या मीटिंगरूम च्या जवळून चाललेलो. खर सांगायचे झाले तर मुद्दामच. तिने मला पाहून इतकी छान स्माईल दिली. आजकाल आम्ही दोघेही एकमेकांसमोर आलो की हेच चालते. ती इतकी छान स्माईल देते. आणि लाजल्यासारखं हसतो. पण हालत खराब होते. काल मला तिच्याशी बोलायची खूप इच्छा होती. पण तिचे स्टेटस बिझी होत. म्हटलं ती कामातून फ्री होईल त्यावेळी बोलू. पण दिवसभर असंच. (more…)

चिंटू

आज चिंटू सकाळी लवकर उठला. आजचा दिवस त्यासाठी विशेष आहे. पटापट आवरून चिंटूने लुंगी ‘नेसली’. आणि डोक्याचे उरले सुरलेले केसांची वेणी घातली. काही नसलेल्या कपाळावर हळद कुंकू केल. निघण्यापूर्वी हारवाल्याला फोन लावला. पायात चपला टाकून ‘विनोदमुर्ती’ गाडीत बसल्या. गाडी निघाली ती थेट पुण्याकडे. ड्रायव्हरने गाडी चालवता चालवता चिंटूला विचारले ‘साब, आज तो बहुत खुश होंगे आप.’. पण चिंटू तर विचारात मग्न. पुन्हा ड्रायव्हर ‘साब’. चिंटू लक्षात येताच चिंटू खेकसला ‘एंड रास्कला, नो हिंदी’. ड्रायव्हर गडबडून ‘येस येस, साब’. चिंटू पुन्हा विचारात मग्न. जस जस पुणे जवळ येत होते, तसं तसं चिंटू अजूनच हर्शोल्हासित होत होता. अखेर एकदाचे पुणे आले. गाडी पोलीस मुख्यालयात वळली. चिंटू गाडीतून उतरून कोठडीच्या दिशेने धावत निघाला. अगदी एसआरके स्टाईल. (more…)

बाबा

मॉम बाबाचे नाक पुसत बोलली, ‘बाबा, उठ लवकर! आज शाळेत नाही जायचे का?’. बाबा रडक्या आवाजात ‘मॉमsss, आधी माझे लगीन’. मॉम ‘कशाला? मी असले तुझे चोचले पुरवणार नाही. चल उठ पटापट आवरून घे’. ‘ते काही नाही. आता बोल. नाहीतर मी नाही जात चिंचवडला’ बाबा चिडून बोलला. मॉमने हसत ‘अरे त्यासाठीच तर तुला तिथे पाठवते आहे ना’. बाबा ‘काय? पण तू तर म्हटलीस तिथे भाषण द्यायला जायचे ना’. मॉम ‘माझ्या राजा, अरे पुण्यातल्या मुली येतील की, मग एखादी तरी पटव’. बाबा त्रासलेल्या चेहऱ्याने ‘ते त्या ओरिसा प्रमाणे तर पोरी नसतील ना??’. मॉम ‘चल वेडा कुठला.. आवर लवकर पीयू येईलच इतक्यात. आणि जरा दाढी करून जा’. ‘अरे मनमोहना, बेड टी झाला का रे बाबाचा’ मॉम ओरडली. (more…)

इमेल

आता दुपारी मी तिला असाच एक मेल पाठवला होता. आणि तिने त्याचा रिप्लाय देखील केला. आणि पिंग देखील केल. काय सांगू, नाचावस वाटत आहे. आजही दुपारपर्यंत दिवस जाम टेन्शनमध्ये गेला. म्हणजे अस काहीच कारण नव्हते. ती आज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असली छान दिसते आहे ना! तिला ‘हाय’ करणार होतो. सोडा, मी पुन्हा तेच रिपीट करतो आहे. आज दुपारी जेवायला त्या नव्या कॅन्टीनमध्ये गेलो होतो. पण तीच माझ्याकडे लक्षच नव्हत. म्हणजे तिला कळल सुद्धा नाही, की मी होतो तिथे. यार माझ्या मनाचा ‘रिमोट’ तिच्याकडे गेल्याप्रमाणे वाटत आहे. (more…)

गुड मॉर्निंग

कालची रात्र बद्दल बोलायलाच नको. कालचा दिवस देखील तसाच. अगदी सगळ संपल इथपर्यंत या डोक्याने आणून सोडलं होते. काल तिला ‘बाय’ करतांना किंवा ‘हाय’ करतांना खुपंच वेगळे वाटत होते. म्हणजे अस की, तिला माझा त्रासाच होतो आहे, अस. खूप डोक दुखायला लागलं होत. काल दुपारी देखील माझे मित्र मला, अप्सराच्या विषयावर आम्हाला बोर करू नको अस बोलले. आणि त्यात मी जातांना तिने अगदी त्रासलेल ‘बाय’ केल. खूपच डोक दुखायला लागलं होते. रात्री जेवायची इच्छाच होत नव्हती. पण गेलो. रात्री झोपच नाही आली. मागील शनिवारी देखील असंच. झोपच नाही आली. रात्रभर तिचाच विचार. काल देखील तेच. फरक फक्त इतकाच यावेळी डोके इतके दुखले ना! की रात्री दोन तासाचा शास्त्रीय (रड) संगीताचा कार्यक्रम केला. तरीही तीचा विचार कमी झाले नाही. डोक्याने विचार केल की ती मला मिळणेच शक्य नाही अस वाटायला लागलेलं. पण शेवटी मुर्ख मन सगळ पुन्हा जैसे थे, करून टाकते. कामातही लक्षच लागलं नाही. (more…)