पुन्हा एकदा सगळ फूस

आता ना, माझा माझ्यावरच माझा विश्वास राहिलेला नाही. आजही ती कॅन्टीनमध्ये माझ्या जवळच्या बाजूच्या सीटवर, म्हणजे दोन सीट सोडून बसली होती. ती नाश्ता आणायला गेली. आणि माझी हिम्मतच होत नव्हती तिथे बसायची. काय करू, मी तिच्याशी बोलायची आरशासमोर खूप सराव केलेला होता. या शनिवार रविवार हेच तर केल. तिची खूप आठवण यायची. कोणी मुलगी दिसली तीच वाटायची. आणि आज मी लवकर उठून देखील आलो. पण सगळ फूस. (more…)

हंग्रेज अध्यक्षांची मुलाखत

सुरवातीला अभिनंदन करतो, आपण सलग चौथ्यांदा अध्यक्ष झालात त्याबद्दल. आणि आभार मानतो आपण मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल. तर सुरवात करूयात?
अध्यक्ष– इश्श..
मी– काय झालं?
अध्यक्ष– काय झालं काय, भारतीय महिला अस खूप आनंदी झाल्यावर असंच करतात ना?
मी– हो, पण..
अध्यक्ष– पण काय? मला तर आजी नेहमी भारतीय महिलांचे वागण्याच्या पद्धती सांगत असतात.
मी– अच्छा.
अध्यक्ष– माझी साडी कशी आहे?
मी– काय? म्हणजे तुम्ही अस का विचारलंत? हे देखील आजींनी सांगितलं?
अध्यक्ष– माझ्या सासूबाईंनी मला घेतली होती. आज तिची घडी मोडली. त्या अहमदला विचारलं तर तो बोलला की, आमच्यात बायका बुरखेच घालतात. त्यामुळे मी कसं सांगू शकतो. म्हणून तुला विचारलं.
मी– आपण हे नंतर बोलुयात? माझीच मुलाखत चालू असल्याचा मला भास होतो आहे.
अध्यक्ष (हसून)- बर, कर सुरु.. (more…)

प्रश्न सुटला

कालची ती दुपार. किती मस्त गेली म्हणून सांगू. काल सकाळी काकू टपकल्या. डायरेक्ट डेस्कवर. काकू आलेल्या पाहून खर तर खूप आनंद झाला. म्हणजे मला वाटलं आता ती नक्की येईल. असो, पण ती आली नाही. काकू खूप वेळ होत्या डेस्कवर पण शेवटपर्यंत ती आली नाही. असो, एक प्रश्न अडला होता ना मला. तो इमेज मधील टेक्स्ट रीड करायचा. तो सुटला. माझ्या दाजींनी मला एक टिफ फोर्मेटची इमेज मेल केली होती. आणि ती इमेज मधील टेक्स्ट मला रीड करून राईट करायचे होते. कुठेही वर्ड किंवा नोटपॅडमध्ये. एक मायक्रोसॉफ्टचे एक बंडल सॉफ्टवेअर आहे. नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस डॉक्युमेंट इमेजिंग. (more…)

द्वंद्व

म्हणजे अगदी सुरवातीपासून, हे डोक्यात द्वंद्व चालू आहे. कधी वाटत ती माझी होईल. तिलाही मी आवडत असेल. पण नंतर तो शेपट्या किंवा तो शेंड्या तिच्यासोबत असला की, म्हणजे तेव्हाही काही नाही वाटत इतकं. पण ती हसून वगैरे बोलतांना पहिले तर. मग मात्र अस वाटायला लागते की, कधीच शक्य नाही. काल संध्याकाळी देखील असेच. मी जातांना ‘बाय’ करावं म्हटलं. आणि पीसी बंद करून निघणार तेवढ्यात ती समोर. तिचा चेहरा लाल झालेला. म्हणजे मी देखील खूप हसलो तर माझाही चेहरा असाच लाल होतो. ती हसत चाललेली. तिच्या डेस्ककडे पहिले ते ते दोन हिरो होतेच. शेंड्या आणि शेपट्या. मग मुडच गेला. ती मान खाली घालून माझ्या समोरून गेली. तरीही ‘बाय’ करायची इच्छा होती. पण नाही झाली हिम्मत. (more…)

आज मी बोललो

खूप मस्त वाटत आहे. काय सांगू, खरच नाचावस वाटत आहे. आज मी तिच्याशी बोललो. आणि सकाळी ‘हाय’ सुद्धा म्हटलं. सकाळी खर तर डोक खूप दुखत होत. पण तिला पाहिलं आणि कमी झाल दुखायचं. काल असंच, रात्री उपास झाला. सर्दी, खोकला त्यामुळे आणखीन डोकेदुखी वाढली. आज सकाळी कंपनीत यायला मग उशीर झाला. आलो तर शेंड्या तिच्या डेस्कवर पहिला. मग काल प्रमाणे. पण हिम्मत केली. आणि बोललो. यार आता माझ्या डेस्कच्या बाजूने गेली. एक दिवशी नक्की ही हार्टअटॅकने मारणार. ती इतकी छान आहे ना! आणि आज किती छान दिसत आहे. बस पाहताच रहावस वाटत. (more…)

आणि शेवटी ‘बाय’

काय छान सुरवात झाली होती. पण पुढे ना! खूप बेकार दिवस गेला आज. म्हणजे तो ‘शेंड्या’. तीच्या बाजूला बसतो. ती किती वेळ त्याच्याशी बोलली. ती डेस्कवरून गेल्यावर ना! अगदी नाचावसं वाटत होते. आणि मी खूप खुश सुद्धा. पण ती तीच्या डेस्कवर जाऊन बसली. मग झालाच तो सुरु. आता हिने सुरवात केल्यावर तो कसला सोडतो आहे. आता मला माहिती आहे, शेंड्या कंपनीच्या कामासाठी दोन एक वेळा जर्मनी वगैरे फिरून आला आहे. आणि मी जामनेर सुद्धा नाही. पण त्या शेंड्याला दुसरी कोण नाही भेटत का? खूप राग आला होता, त्याचा नाही ‘अप्सराचा’. ती खूप छान आहे. म्हणजे कोणीही फिदा होईल तिच्यावर. पण हा जर्मनी रिटर्न, नाकावरची माशी सुद्धा उठली तर शपथ. मला ना, गंगा यमुनेचा महापूर येण्याची शक्यता बळावली होती. अगदी दुपारपर्यंत चालू गप्पा. अस वाटायला लागलं होत की, तीला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल. जे काही वाटत ते त्या शेंद्याबद्दल. खरंच नाही सहन झालं. मग मी माझ्या डेस्कवरून उठून गेलो. मला माहिती आहे, माझा तिच्यावर काहीच हक्क नाही. आणि दाखवायला सुद्धा नको. तीच्या आयुष्यात मी लुडबुड करणारा कोण? (more…)

स्वप्न

आज मी स्वप्नात आहे बहुतेक. खरंच स्वप्न की सत्य आहे हेच कळत नाही आहे. काय सकाळ आहे. जाम जबरदस्त. आज सकाळी सकाळी तिने ‘हाय’ केले. काय बोलू यार मी. काहीच सुचत नाही आहे. तीने स्वतःहून ‘हाय’. यार स्वप्नंच तर नाही ना. आणि हे तर काहीच नाही माझ्याशी येऊन गप्पा देखील मारल्या. किती छान आहे ती. सगळ स्वप्नंच वाटत आहे. अस कधी होईल, अशी इच्छा होत होती. सकाळी येतांना तो पडणारा पाऊस, ते थेंब. ते कंपनीच्या बाजूचे हिरवेगार डोंगर आणि त्यावर उतरलेले पांढरे शुभ्र ढग. (more…)

काकूंची कृपा

आज दुपारपर्यंत तिला एक मिनिट सुद्धा मला ढुंकून बघायला वेळ नव्हता. आणि मी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे. तडफडत होतो. काही नाही. एकदाचं माझ्या बाजूने गेली. पण मला न बघता. आज माझ्या मित्रांसोबत मी कंपनीच्या नवीन कॅन्टीनमध्ये गेलेलो. ती नेहमी तिथे जेवण करते. वाटलं ती तिथे असेल. पण गेल्यावर खूप शोधलं पण ती नव्हती. मग जागा शोधून एका ठिकाणी बसलो. माझ्या एका मित्राने ती आजकाल जुन्याच कॅन्टीनमध्ये जेवते अस सांगितले. मग माझाच मला राग आला. कशाला इकडे तडफडलो अस झालेलं. पण काही उपयोग नव्हता. कारण माझ्या सोबत असलेले दोन मित्र कुपन घेऊन रांगेत उभे होते. (more…)

पुन्हा तेच..

पुन्हा तेच. कस बोलू? यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का?’ तर ‘नाही’ बोलला. तीन वाजता पुन्हा जाग आली. त्यावेळी मग मी मित्राला फोन केला. तर माझ्याशी ते टाईमपास करत बसलेले. मला म्हणाले ती आज टेन्शन मध्ये आहे. एक सेकंदसाठी खूप विचारांचे काहूर माजले, पण नंतर स्वतःला सावरले. (more…)

चीड

मी शाळेत असतांना मला शाळेतील मित्र खूप चिडवायचे. अगदी दहावी पर्यंत. आणि मी चिडून देखील जायचो. मला ‘आठल्या पिठल्या’ म्हणायचे. आता हसू येत. पण त्यावेळी खूप राग यायचा. चौथी पर्यंत मी मग कोणी चिडवले की त्यांच्याशी भांडायचो. म्हणजे हाणामारी. तोंडाने काहीच नाही बोलायचो. आणि मग मी रडत आणि ते हसत घरी यायचो. अस चौथी पर्यंत चालले. मग वडिलांनी ‘कोणी चिडवले की त्याला मारायचे. पण त्याने एक ठोसा मारला की त्याला दोन ठोसे द्यायचे’ अस सांगितले. (more…)