घासदारांस पत्र

अप्रिय घासदार यांस,
मतदारांचा डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत दंडवत.

पत्रास कारण की, कालचा आपला अतुलनीय पराक्रम दूरदर्शनवर पाहून डोळ्याचे पारणे फिटले. उगाचंच, आमच्या देशात एकी नाही अस म्हटले जाते. आता आम्ही नाही म्हणू शकलो तरी तुम्ही ‘हम सब एकच है’ हे म्हणू शकता. जगाच्या कुठल्याही देशात, घासदार आपला घास वाढवा म्हणून इतकी मोठी एकी किंवा साधी मागणीही केलेली नव्हती. पण तुम्ही तो रचून आपल्या देशाचे नव्हे तर सर्व घासादारांची नावे गिनीज बुकच्या नव्या बुकात नक्कीच जातील. अजून काय पाहिजे देशाला? तुम्ही घडवलेला इतिहास खरंच अतुलनीय आहे. (more…)

ते तीन क्षण..

कालचा दिवस कसा गेला काय सांगू! अप्सरा किती छान आहे. इतकी छान काल दिसत होती. आणि त्याहुने तिचे ते गोड हसणे. काल कंपनीत गेल्यावर तिला ‘हाय’ करण्यासाठी किती यार! पहिल्यांदाच जाणार त्यावेळी मित्र आला माझ्याकडे. नंतर कॅन्टीनमध्ये नाश्ता केल्यावर पुन्हा तीच्या डेस्कच्या बाजूने जाणार त्यावेळी तीच्या प्रोजेक्टमधील ती काकू तीच्या डेस्कवर. मग खूप वैताग आला. आणि तिने देखील लक्ष दिले नाही. मग काय त्या चातक पक्षाप्रमाणे तीच्या एका नजरेच्या चंद्रासाठी हा चातक आसुसलेला. काय सांगू दुसरे तिसरे काहीच सुचेना. खूप वेळ वाट पहिली. पण ती कामात. आणि माझे आजकाल तिला पहाणे हेच काम. मी तरी काय करू? माझे आजकाल हेच चालू आहे. डोक्यात दुसरा तिसरा विचार येतंच नाही. माझ ना! सोडा. (more…)

ताप

काल मी बर्याच दिवसांनी आजारी पडलो. त्याचे काय झाले, मी परवा आमच्या कंपनीत नवीन कॅन्टीनमध्ये दुपारी जेवण केले. जेवणातील भाजीने पोट खराब केले. मग काय, व्हायचे ते झाले. पोटात काहीच राहत नव्हते. आणि त्यामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे आजोबांच्या पेक्षा जास्त वाईट अवस्था. हात पाय गळून गेलेले. रात्री खूप थंडी वाजायला लागली. सकाळी लवकर उठून देखील अंग दुखत असल्यामुळे पळायला गेलो नाही. पण व्यायाम केला. व्यायाम करतांना घाम आलाच नाही. खूप त्रास झाला व्यायाम करतांना. आणि डोके इतके दुखायला लागले की बास! काही विचारूच नका. (more…)

आजींचे भाषण जसच्या तस्

माझ्या प्रिय देशवासीयांनो,
चौसष्ठाव्या स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्व संध्येला मी भारतात आणि विदेशात राहणाऱ्या तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. आणि मी विशेषतः आपल्या सीमांचे रक्षण करीत असलेल्या सशस्त्र सेनेचे आणि आणि अर्ध सैनिक दलाचे वीर जवानांसोबत केंद्रीय तसेच राज्य स्तर पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा बलाचे अभिनंदन करते. कारण मी हेच फक्त करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग. मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन करते, ज्यांच्या कठोर मेहनतीने, उत्पादन कौशल्याने आणि उद्यमशीलतेमुळे भारताला विश्वातील प्रमुख देशांत सामील केले आहे. सरकारमुळे नव्हे. मी मध्यंतरीच, लेहमध्ये घडलेल्या घटनेत प्रियजनांना गमावलेल्या, घायाळ झालेल्या तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना हार्दिक संवेदना व्यक्त करते. कारण मी हेच फक्त करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग. (more…)

भय इथले संपत नाही

काय रोज एक दिवस चालू आहे? एकदम झकास! रोजच काही ना काही अस घडते की सगळी गणित उलटी पूलटी. काल काही अप्सरा आली नाही. आणि दिवस एकदम बोर झाला होता. दुपारी जेवायची इच्छाच होत नव्हती. मग काय नाही जेवलो. दुपारी ‘चार’च्या दरम्यान आमच्या फ्लोरवर आमच्या कंपनीचे डॉक्टर आले. आणि या भल्या मोठ्या चोकोनातील सगळ्यांना एकत्र बोलावले. प्रॉजेक्ट मॅनेजरने सर्वांना आपल्या ब्लॉक मधील एका मुलीला स्वाइन फ्लू झाला आहे, अस सांगितले. त्यामुळे एकच गडबड सुरु झाली. डॉक्टरांनी काळजी घ्या, आणि त्यासाठी काय काय करायचे याच्या बर्याच गोष्टी सांगितल्या. अनेकांनी प्रश्न विचारले. आणि त्याची उत्तरे देखील त्यांना व्यवस्थित रित्या मिळाली. असो, याच दिवशी अप्सराला का सुट्टी घ्यावीशी वाटली? (more…)

माझिया प्रियाला..

काल दिवसभर एकदाही मला अप्सराने बघितले नाही. खूप राग आला होता. आणि डोके खूप दुखले. कधी कळणार यार तिला! ‘हाय’ सुद्धा नीट केले नाही. आणि आज आली सुद्धा नाही. आज मला खूप टेन्शन आले आहे. कदाचित तिलाही स्थळे बघत आहेत की काय याची शंका येते. की आज ती आजारी आहे? असले कसले सुद्धा विचार डोक्यात येत आहेत. आजच सकाळी मित्रांनी पुन्हा मला ‘तिचा नाद सोड’ या विषयावर तासाभराचे भाषण दिले आहे. मी खूप गोंधळून गेलो आहे. आज सकाळी लवकर उठून देखील वेड्यासारखा अंथरुणात पडून होतो. लेट मोर्निंगच्या बसने आलो. पण ती नाही. कशातच मूड लागत नाही आहे. तसं कालपासून अस होत आहे. (more…)

माझ्यासाठी

आला एकदाचा सोमवार. दोन दिवस दोन वर्षाप्रमाणे वाटले. अरे सांगायचे राहूनच गेले, रविवारी मला नेटवर अप्सराचा एक फोटो मिळाला. किती छान दिसते ती! रविवार दिवसभर तिच्या फोटोचाच अभ्यास केला. बस! बहिणाबाईला तो फोटो मेसेज केला. तिलाही ती खूप आवडली. उगाचंच बहिणाबाई, मला ‘नाय’ नाय करत होती. चला आता माझ्या घरून नकार होणार नाही. नाहीतरी अप्सरा इतकी छान आहे की, नकार होवूच शकत नाही. कालच मी माझ्या इमारतीच्या बिल्डरला फोन केला होता. आज संध्याकाळी जाणार आहे त्याच्या नवीन साईटवर. आता माझे घर आहे ना! ते दोन खोल्यांचे आहे. चारशे स्क़ेअर फुट. ठीक आहे. (more…)

या गोजिरवाण्या घरात

यार, अप्सरा आल्यापासून सगळंच बदलते आहे. आणि रोज काही ना काही नवीन घडतं आहे. परवा मी बीसीएच्या परीक्षेला एन्रोल केल. काल म्हटलं, अभ्यासाला सुरवात करावी. माळ्यावर ठेवलेले पुस्तकांचे खोके काढावे. काढायला गेलो तर, खोक्यातली अर्धी पुस्तके पुस्तके राहिलीच नव्हती. म्हणजे कचरा झालेला. ते खोके देखील अनेक ठिकाणी कुरतडलेले. मी स्टुलावरून उभा राहून काढतांचा त्या पुस्तकांच्या अस्थींची अंघोळ झाली. दोरीवर ठेवलेल्या कपड्यांची देखील अंघोळ. आणि खोके खाली काढतांनाच एक भला मोठा उंदीर ‘मामा’ त्या खोक्यातून उडी मारून पळाला. (more…)

गाडी चालली

कालचा दिवस, काय बोलू आणि काय नाही अस झाले आहे. काल ‘बोललो’ म्हणण्या इतके बोललो. सकाळी कॅन्टीनमध्ये मला ती दिसली. पण बोलण्याची हिम्मतच होईना. दुपारपर्यंत असेच. शेवटी कंपनीतून निघण्याची वेळ आली. माझे झालेल्या कामाचा इमेल मी माझ्या सहकारीला केला. आणि थोड्या वेळाने मेल मिळाला का म्हणून त्या सहकारीकडे गेलो. तर ती, त्यावर चर्चा करीत बसली. शेवटी तिला माझी पाचची बस आहे अस म्हणून निघालो. जातांना ‘अप्सरा’ डेस्कपासून गेलो. तर ती होती डेस्कवर. माझ्या डेस्कवर जाऊन तो संगणक झटपट बंद केला. आणि पुन्हा व्हायचं तेच! हिम्मतच होईना. तीच्या डेस्कजवळ जायची. पण मग वेळच नव्हता. चार वाजून पन्नास मिनिटे झालेली. तसाच निघालो. आणि तीच्या डेस्क जवळ जाऊन तिला ‘बाय’ म्हटलं. (more…)

माझी प्रतिक्रिया

मी माफी मागतो, मला येणाऱ्या प्रतिक्रियांना काहीच उत्तर देत नाही म्हणून. मी प्रतिक्रिया न देण्यामागे, मी फार मोठा किंवा वेळच नसतो अस काहीच नाही. उलट तुम्ही माझ्याशी बोलता. खूप चांगल वाटत. आनंद वाटतो. मलाही समजून घेणारे मित्र असल्याचा आनंद, निराळा आहे. मला येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आदर्श आणि मार्गदर्शक असतात. मी माझ्या मित्रांशी या विषयावर गप्पा मारल्या तर ते ‘बोर’ करू नको असे म्हणतात. (more…)