परवाच्या गोष्टीनंतर आता मित्र कोणाला म्हणावे असा प्रश्न पडला. परवा माझ्या चार मित्रांना रविवारी भेटू म्हणून फोन केला. त्यापैकी एक गावी गेलेला होता. म्हणून त्याला यायला जमणार नव्हते. तसे त्याने मला फोनवर सांगितले. दुसर्याला फोन केला तर तो ‘बायको भक्त’ दुपारी दोननंतर भेटलं तर चालेल का अस विचारले. त्याला हो म्हणालो. तिसर्याला फोन केले तर तो चालेल म्हणाला. आणि चौथ्याला फोन केला तर तो ‘बहिण भक्त’ बहिणीला भेटायचे आहे. त्याची बहिण आजारी होती. मग त्याला म्हणालो आपण दोघेही भेटायला जाऊ संध्याकाळी. तर तो ठीक आहे म्हणाला. तो मला निघण्याआधी फोन करेल असा वायदा केला. (more…)
कला
काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय पाण्यावर रात्र काढावी लागली. माझी जी मैत्रीण आहे ना तिला घर डेकोरेशनची आवड आहे. आणि तीच्या घरातील सगळे असे आहेत ना! थोडक्यात जी वस्तू तिथे न ठेवणारे. मग काय हिने केलेलं दोन दिवस सुद्धा नीट रहात नाही. पण छान करते. (more…)
लाच
मागील शुक्रवारी मी माझ्या कॉलेजच्या कामानिमित्ताने संगमनेरला गेलो होतो. अकराला शिवाजीनगर मधून बस पकडली. खडकी चौकाच्या सिग्नला बस थांबली. मी आपला सहजच बाहेर बघत होतो. तर एक आर.टी.ओ पोलीस एका कारवाल्याशी काही तरी बोलत होता. बहुतेक त्याने सिग्नल तोडला असावा. अंतर जास्त आवाज तर काही ऐकू येत नव्हता. पण थोड्यावेळाने त्या कारवाल्याने त्याच्या पाकिटातील शंभर रुपयांची एक नोट काढली आणि त्या पोलिसाला दिली. पोलिसाने पैसे खिशात टाकले. मला वाटलं की, आता पोलीस त्याला पावती देईल. पण नाही. (more…)
राजकारणातील क ख ग घ
बाळांनो, ‘राजकारण सोपे नोव्हे’ अस कोणी तरी म्हणून गेले. राजकारण शिकायचे आणि एक उत्तम राजकारणी बनायचे असेल. तर राजकारणाची बाराखडी यायलाच हवी. नाहीतर निवडणुकीच्या परीक्षेत नापास व्हाल. चला तर मग सुरु करूयात का?.. माझ्या मागे मोठ्याने म्हणा. प्रत्येकाने प्रत्येक अक्षराचा नीट अभ्यास करायचा बर का! त्यांचा अभ्यास केला तर परीक्षेनंतर चांगल्या ‘मंत्री’पदांनी खूप मोठे व्हाल. चला म्हणा.. ‘क’ रे ‘करप्शन’चा. बाळांनो, ‘करप्शन’चा अर्थ माहिती आहे ना? करप्शन म्हणजे भ्रष्टाचार. ते यायलाच हवं. नाहीतर राजकारणी बनू शकत नाही. ज्यांना अजूनही कळला नसेल त्यांनी लालू गुरुजींना मधल्या सुट्टीत भेटा. (more…)
आकारमान
काय सांगू गेल्या वर्षभरात स्वतःकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे माझे वस्तुमान आणि आकारमान खुपंच वाढले. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मित्रांचा ‘माझे आकारमान’ हा आवडता विषय होऊन गेला आहे. माझी मैत्रीण देखील माझी याच विषयावरून खेचायची. आणि खेचता खेचता तीचे देखील ‘आकारमान’ वाढले होते. पण ती पाहिल्या प्रमाणे झाली आहे. मी मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये वजन केले तेव्हा ६४ किलो होते. या एप्रिलमध्ये केले तेव्हा ७५ किलो झाले. माझे मित्र वस्तुमान बघून दिसत नसलेले पोट धरून हसत होते. (more…)
अ आ ई
आजकाल रोज सकाळी जाग मला तीच्या पैंजणांच्या आवाजाने येते. काय सांगू तिचे ते हसणे! स्वच्छ आणि सुंदर दात. हसतांना पडणारी गालावरची खळी पाहून मनात उठणारे आनंदाचे तुषार पूर्ण भिजवून टाकतात. तिचे बागडणे, हसण्याने रोज माझी सकाळ हसरी असते. ती माझ्या शेजारी रहाते. दिसायला किती छान आहे म्हणून सांगू? त्या दिवशी तिने घातलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस. तिच्यापुढे ऐश्वर्या काय आणि सोनाली काय सगळेच फिके. नेहमी मला तीचा नवीन ड्रेस, नेलपॉलिश किंवा जे काही नवीन घेतले असेल ते दाखवते. नेहमी मी कंपनीत जातांना मला तिचे मान एका बाजूला झुकवून उजव्या हाताने ‘टाटा’ करण्याची पद्धत खूप आवडते. (more…)
वशिला
कोणी तरी सोडवा या ‘वशिल्या’च्या लफड्यातून. यार हे मित्र ना! ह्यांच्यापेक्षा नसलेले परवडले. काय करू, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आणि ‘थोडा वशिला’ लाव म्हणतात. मागील आठवड्यात गावी चाललो होतो. बसमध्ये भेटलाच एक मित्र. घरापर्यंत माझ्या मागे जॉब लावून दे म्हणून. बर ह्याचे शिक्षण माझ्यापेक्षा जास्त. हातपाय हलवायला नको. मला म्हणाला ‘मी पुण्यात आलो की तुझ्याकडे येतो. मला तू सॉफ्टवेअर शिकव. मी तुझ्याकडे राहतो. कारण पैश्यांचा अडचण आहे. आणि तूच तुझ्या कंपनीत माझ्यासाठी जॉब बघ’. कसाबसा पिच्छा सोडवला. (more…)
पंतप्रधानांची विशेष मुलाखत
नमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का?
पंतप्रधान– सोनियांना विचारलंस ना?
मी– हो, त्या हो म्हणाल्यात!
पंतप्रधान– (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु! जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल??
मी– आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल?
पंतप्रधान– बर. (more…)
दाखला
दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत त्याच्या कॉलेजात गेलो होतो. त्याने एम.बी.ए करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याला हरवलेल्या दाखल्याची नक्कल हवी होती. जातांना मला त्याचा प्राचार्याने आदल्या दिवशीच्या दिलेल्या ‘दाखला का हरवला?’ याविषयावरील व्याख्यानाचा सारांश सांगत होता. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याच्या जुन्या आठवणी धरणाचा बांध फुटून वेगाने पाणी पसरावे. तसे याच्या आठवणी आणि किस्से मला सांगत सुटला. मस्त! सगळे इथून तिथून सारखेच असतात. प्राचार्यांनी त्याला आधल्या दिवशी दाखला हरवला म्हणून पोलिसात एफ.आई.आर करायला लावली. आता ह्याच्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांची अख्खी फाईलच हरवली. त्यात तो दाखला देखील गेला. प्राचार्यांच्या केबिनमध्ये आधीच कोणी तरी होते. म्हणून अर्धा तास वाट पहावी लागली. (more…)
‘क’ची एकता
सकाळी कंपनीत जाण्यासाठी आवरत होतो. तेवढ्यात शेजारी भांडणाचा आवाज येत होता. काय झाल म्हणून मी बाहेर आलो. आणि पहिले तर शेजारी मोठ्या आवाजात टीव्हीवरील मालिका. अस दोन तीन वेळेस घडल आहे. एकदा रडण्याचा आवाज आला होता. म्हणून त्यावेळी देखील मी शेजारी पाहतो तर टीव्हीची मालिका. या एकता बाईनी सगळ्यांना त्या कौटुंबिक मालिकांनी वेड लावलं आहे. एक संपली की दुसरी. ती संपली की तिसरी मालिका. मालिका संपतच नाही. कुठे शेवटच नाही. मी टीव्ही पहातच नाही. पण हे शेजारी आहेत ना!! आवाज एवढा असतो की जणू काही माझ्याच घरात टीव्ही चालू असल्याचा आभास होतो. (more…)