भयकथा

भूत असते की नाही माहित नाही. पण भूतावर अनेक दंतकथा आहेत. या चिंचवडमध्ये पूर्वी चिंचेची आणि वडाची खूप झाडे होती. पवना नदीच्या दुसऱ्या बाजूला बाजूला, म्हणजे थेरगावमध्ये एका चिंचेच्या रात्री भुते असतात. असे लोक म्हणायचे. त्यावेळी एल्प्रो कंपनीची सेकंडशिप चार ते रात्री बारावाजेपर्यंत असायची. एकदा काही कामगार सेकंडशिप करून कंपनीतून सुटल्यावर अशाच गप्पा मारत सायकलीवर घरी जात असतांना एका नवीन कामगाराला इतर कामगारांनी त्या चिंचेच्या झाडाजवळ भूत असल्याची गोष्ट सांगितली. त्याने या सगळया खोट्या गोष्टी असतात, भूत वगैरे नसतात. असे त्या बाकीच्या कामगारांना म्हटले. त्यावर त्या कामगारांनी ‘मग हिम्मत असेल तर त्या झाडापाशी रात्रीच्या वेळी जाऊन दाखव’ अशी अट घातली. त्या नवीन कामगाराने देखील ताबडतोप ताबडतोप ती अट स्वीकारली. (more…)

मन भटकंती

काल कंपनीच्या बसमधून कंपनीत जात असतांना एक मुलगी माझ्याकडे बघत होती. असो, आधी मी तिच्याकडे बघायचो. काल चक्क ती माझ्याकडे बघत होती. तसे आम्ही रोज एकमेकांकडे बघतो. पण कधीच बोलत वगैरे नाही. तिच्याही घरी माझ्याप्रमाणे तीच्या लग्नाची बोलणी वगैरे चालू आहे. आता हे कळायला मला फारसे श्रम करावे लागले नाहीत. परवा मी, माझी मैत्रीण संध्याकाळी फिरायला गेलो होतो. काही तरी खावे म्हणून ‘बर्गर’ घेतला. मी खात असतांना सहज लक्ष गेल तर एक छानशी मुलगी माझ्याकडे एकटक नजरेने बघत होती. बहुतेक तिचेही मन माझ्याप्रमाणे भटकत असावे. थोड्या वेळाने आमच्या दोघांच्या बाजूला ती आणि तिचा तो येऊन कच्ची दाबेली खात होते. तर तो माझ्या मैत्रिणीकडे बघत होता. बहुतेक त्या दोघांचेही मन अजून जुळलेली नाहीत. (more…)

माऊवादी

आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. सर्वात जास्त बायका करणारा हाच तो नरश्रेष्ठ. नुसत्याच केल्या नाहीत तर नंतर त्यांना मारून टाकले. बघा! नाहीतर तो तुमचा श्रीराम. आत्ताच दोन दिवसांपूर्वी ते लिंबूसरबतंम् येऊन गेले. आम्हाला लाल कपड्यात बघितल्यावर, ते लिंबूसरबतंम् लूंगी सोडण्याची भाषा करायला लागले. (more…)

मोबाईल

सकाळी मोबाईलची रिंग वाजली. आजकाल रिंग वाजली तरच सुट्टीच्या दिवशी जाग येते. नाहीतर सूर्यदेव डोक्यावर आल्यावर माझी पहाट होते. आवरून बँकेच्या कामासाठी बँकेत गेलो. तिथे दारातच एक भीमरूपी फोनवर बोलत उभा. कसाबसा बँकेत शिरलो. चेक भरण्याची स्लीप भरत असतांना एकजण फोनवर अकाऊंट नंबर घेत होता. बर, पैसे जमा करायचे एका बँकेत आणि हा पठ्या आला दुसऱ्या बँकेत. बर झालं स्लीप भरल्यावर निदान मला विचारलं. नाहीतर चेक ड्रॉपबॉक्स टाकल्यावर विचारले असते तर जाम पंचाईत झाली असते. काय हुशार लोक असतात. (more…)

मी कोण?

परवा आमच्या चिंचवडमधील एका मुलीवर झालेल्या बलात्काराची बातमी वाचली. आता तर खुपंच बेकार वाटत आहे. हिंजवडीच्या घटनेनंतर मुळात मन उदास झालं आहे. त्यात ह्या घटनेने अजूनच मन गोंधळून गेल आहे. सगळी आपली माणस. जिच्यावर तो प्रकार घडला ती आणि तीच्या आई वडिल काय परिस्थितीत असतील. असा विचार मनात सारखा येतो. आणि मग आपणच याला जबाबदार आहोत असे वाटते. त्या ‘भोसले’ला ‘चौरंगे’ करावं अस सारखं मनात येत आहे. फार फार काय होईल? पण निदान समाज चिडू शकतो ही तर कळेल. असो, जर सरकारने त्याचा ‘चौरंगे’ केला नाही आणि मोकळा सोडला तर मी देखील ‘चाफेकर’ बंधूंच्या शहरात राहतो हे नक्की दाखवून देईल. रामाच्या, शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या आणि गप्प बसायचं, हे कोणी सांगितलं? रक्त खवळते, मन जागरण गोंधळ घालते. डोके प्रतीहल्याच्या योजना बनवते. मग अजून किती वेळ ‘निर्जीव’ असल्याचे नाटक करायचे. माझ्या शहरातील मुलींवर कोणीही कधीही आपली हौस भागवायची. आणि सगळ्यांनीच बघ्याची भूमिका घ्यायची. (more…)

काय बोलावं ‘र’ बद्दल. नावात ‘र’ म्हणजे इंग्लिशमध्ये ‘आर’ असलेल्या लोकांनी या देशात नव्हे तर जगात नावलौकिक कमावला आहे. आताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील , शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपतींचे संपूर्ण नाव ‘अवुल पकिर जलालुद्दीन अब्दुल कलाम’. आता यांच्या नावात योगायोग वाटत असेल तर आपल्या देशात नावात ‘र’ असलेल्या पंतप्रधानांची कमी नाही. भारताचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’. दुसरे ‘गुलझारीलाल नंदा’, तिसरे ‘लाल बहादूर शास्त्री’, चौथ्या ‘इंदिरा गांधी’, पाचवे ‘मोरारजी देसाई’, सहावे ‘चरण सिंग’, सातवे ‘राजीव गांधी’, आठवे ‘विश्वनाथ प्रताप सिंग’, नववे ‘चंद्रशेखर सिंग’, दहावे ‘पीव्ही नरसिंहराव’, अकरावे ‘अटलबिहारी वाजपेयी’ हुशः काय यादी आहे. अजूनही एक नाव राहिलेच ‘इंद्रकुमार गुजराल’. आता नावात ‘र’ असलेला भारताचा पंतप्रधान होऊ शकतो असा नियम नाही. पण एक दोन सोडले तर बाकीच्या पंतप्रधानांच्या नावात ‘र’ आहेच. (more…)

टोपणनाव

काल दुपारी कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत गप्पा मारतांना जाम मज्जा आली. मित्राला दुपारी फोन आला. त्याने उचलला आणि म्हणाला ‘बोल छुर्या’. बापरे ते नाव एकून माझे आणि माझ्या बाकीच्या मित्रांचे हसणेच थांबेना. त्याला मी म्हटलं अस काय नाव असत का? ‘छुर्या’. मग त्याने त्या नावामागील इतिहास सांगितला. मजेदार होता तो इतिहास. त्याचा मोबाईल माझ्या दुसऱ्या मित्राने घेतला. मग तर काही विचारूच नका. एकाचं नाव ‘काळा’. त्यावर माझा मित्र म्हणाला ‘तो रंगाने खूप काळा आहे म्हणून त्याला गावाकडे सगळे याच नावाने हाका मारतात’. पुढे बघितलं तर, ‘बाजीगर’. आता बाजीगर नाव ह्यासाठी की माझ्या मित्राचे चार मित्र एकाचं मुलीच्या प्रेमात पडले होते. आणि तिला पटवण्यासाठी चौघेही प्रयत्न करत होते. पण ह्याच्या मित्राने नंतर येऊन तिला पटवल. म्हणून त्यावेळी पासून त्या ह्याच्या मित्राला ‘बाजीगर’ असे म्हणायला लागले. काय पण ह्याची फिलॉसॉफी. (more…)

पांढऱ्या पेशी

आम्ही पांढरपेशी जमात. आम्ही कधीच कुठेच दिसत नसतो. पण असतो. आमची डरकाळी घराच्या बाहेर कधी ऐकू जात नाही. आम्ही सल्ले देण्यात सर्वात पुढे असतो. टीव्ही नामक राजाचे आम्ही गुलाम. आम्ही काय विचार करायचा, हे तो राजा ठरवतो. आम्ही कधीच कोणत्या लफड्यात पडायचे टाळतो. सरकारने भाववाढ करावी, आणि ती आम्ही निमुटपणे स्वीकारावी. हेच काय ते आमच्या माथी लिहिलेलं. देश आमचा म्हणायला. आणि न चुकता झेंडावंदन करणे हे आमचे कर्तव्य. असे आम्ही पांढरपेशी जमात आहोत. आम्ही स्वतःला जगात सर्वात क्षुद्र आहोत, असे समजतो. या शरीरातील लालपेशी खाकी वर्दी घालून आम्हा पांढरपेशीना सतत कायद्याच्या लसी देत असतात. आणि आम्ही ते ऐकतो देखील. कितीही मोठी दुर्घटना घडो. पण आम्ही कायमचं शांत. आता याला आम्ही आमचा पळपुटेपणा किंवा भित्रेपणा न समजता, याला आमचा मोठेपणा समजतो. (more…)

वडिलांची जागा

आज वडिलांच्या रोजच्या बसण्याच्या जागी बसून बोलत आहे. असो, ही माझी पहिलीच वेळ आहे. काय करणार गावी नेटला रेंजच्या खूप अडचणी आहेत. आता घराबाहेर रेंज मिळते. आणि घरात फक्त पहिल्या खोलीत. वडील ज्या ठिकाणी बसून त्यांची रोजची काम करीत असतात. त्याजागी आणि त्यांच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नव्हती. आज प्रसंगच तसा आहे. आणि आई वडील पहिल्याच खोलीत झोपतात. दुसरीकडे बसलो तर माझे पाय त्यांच्या तोंडाच्या दिशेने येतात. म्हणून आज हिम्मत केली आहे. म्हणजे ते अस कधीच जागेवर बसायचं अस म्हणाले नाही. पण या जागेचा दराराच एवढा की, अंगात विजेचा संचार होतो आहे. बोलायचं खूप काही आहे. पण बोटे मनाच्या ताब्यातच राहत नाही आहे. या ओळी लिहायलाच मला दहा पंधरावेळा खाडाखोड करावी लागली. आणि त्यामुळे मनात देखील खुपंच काहूर माजलं आहे. (more…)

अप्सरा आली

आहाहाहा! काय दिसते ती. खरंच ‘अप्सरा’ आहे. काय काया आहे. या कंपनीत आल्यावर तिला पाहिलं आणि कंपनीत आहे की इंद्रपुरीत काय कळत नव्हत. रोजचं तिचे ते शृंगाररूप. वा! तीच वर्णन करतांना शब्द फारच बापडे वाटतात. खूप दिवसांपासूनची बोलायची इच्छा होती. दर शुक्रवारी तर ती जेव्हा येते, त्यावेळी माझे हृदयाचे ठोके सेकंदाला हजार किमीच्या वेगाने पडतात. ‘हिरकणीच’, ‘नटरंग’ मधील सोनाली जशी आहे ना तशी ही आमच्या कंपनीतील ही आहे. आज हिम्मत केलीच. वा! कोमल, रत्नप्रभा. स्वच्छ, निर्मल काया. तिचा आज चुकून मला धक्का बसला. काय सांगू! अंगात चारशे की चार हजार किलो व्होल्टेजचा धक्का बसल्या प्रमाणे. ती किती कोमल आहे. अगदी रेशमी वस्त्राप्रमाणे. (more…)