प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. म्हणजे कोणी वक्त्याने खूप मोठ तासाभराच भाषण द्याव. आणि लोकांनी भाषण संपल्यावर टाळ्या वाजू नयेत, त्याला अंडी देखील फेकून मारू नये. किंवा फोन केल्यावर पलीकडून कोणीच काही बोलू नये. मग त्या भाषणाला आणि आपल्या फोनला काय अर्थ राहील? प्रतिक्रिया जे जिवंतपणाचे लक्षण आहे. मी माझा ब्लॉग सुरु करण्यामागे देखील हेच कारण होत. रोज ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वेबसाईटवर जात होतो. त्यांच्या लेखांवर मी माझी प्रतिक्रिया पाठवायचो. पण मोजून दोन तीन प्रतिक्रिया प्रकाशित केल्या. ‘सकाळ’ आणि ‘लोकसत्ताचे’ ही हेच. लोकसत्ताच संपादक नेहमी नवीन नवीन अग्रलेखात ‘चमत्कार’ घडत असतात. सुरवातीला मी ताबडतोप प्रतिक्रिया पाठवायचो पण ते प्रतिक्रिया प्रकाशितच करत नाहीत. (more…)

यापुढे कर भरणार नाही

खरच बरोबर आहे. माझ्या नुसत्या बडबडीला काय अर्थ आहे? काल माझ्या एका नोंदीला आलेल्या प्रतिक्रियेत हेच होते. प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे. मी ज्या सरकारला नाव ठेवत आहे. तेच मुळात काहीही न करू शकणार आहे. शंभर कोटी प्रेतांच्या देशात अजून काय घडू शकते? पुण्यात बॉम्बस्फोट होणार हे ह्या नंदी बैल मुख्यमंत्र्याला आणि त्याच्या पोलिसी कुत्र्यांना माहिती होती. तरी देखील.. सोडा परत मी त्यांच्यावर सुरु झालो. ते काहीच करू शकत नाही. चार माणसांच्या बदल्यात इस्राईलने पेलेस्टांइनच्या राष्ट्रपतीला त्याच्या राजभवनात रणगाडे घालून त्याला ठार मारणारे आपण नाही आहोत. जर सरकार आपल्या लोकांना असच मरू देणार असेल आणि आपल्याच जीवावर स्वतः कायद्याचे उल्लंघन करणार असेल तर आपण का कायदे पाळायचे? या वेळेपासून मी सरकारचा कर भरणार नाही. (more…)

त्या

काल माझ्या जुन्या कंपनीतील मैत्रिणीचा वाढदिवस होता. मला खूप वाटल होत की तिला फोन करावा पण नाही केला. मेसेज देखील नाही पाठवला. त्यात कालचा दिवस म्हणजे आपल्या देशातील लोकांचा राष्ट्रीय सण. काल बऱ्याच जणांनी राष्ट्रीय सण मोठ्या आनंदात साजरा केला. आता माझा विरोध आहे असा नाही. पण राष्ट्रीय सण असा आहे की कधीही साजरा करता येईल. त्यासाठी उगाचच ठराविक दिवस का निवडायचा? मी तर रोज हा सण साजरा करायला तयार आहे. कदाचित माझ्या भविष्याला देखील तशीच इच्छा असेल. ही त्यावेळची गोष्ट. त्यावेळी मी नवीन संगणकाचा कोर्स सुरु केला होता. त्यावेळी मी एसटी महामंडळाच्या बसने जा ये करायचो. जिल्ह्याच्या गावी सकाळी जायचो आणि संध्याकाळी घरी. त्यावेळी तिथल वातावरण खूप वेगळ होत. मुलाने मुलीकडे नुसत बघितलं किंवा मुलीने मुलाकडे तरी सुद्धा ह्या दोघांच काही तरी आहे असा समज अख्खी बस करून घ्यायची. अस गावात देखील तसच. त्यामुळे मुलीकडे पाहण्याची कधी हिम्मत झालीच नाही. (more…)

कोरेगाव पार्क

आपण कोण आहोत? मुळात आपण आहोत का? काल जे घडल त्यावरून काय बोलाव तेच समजत नाही आहे. माझी यापूर्वीची कंपनी ज्या जर्मन बेकरीत घडला त्याच्या पुढच्या चौकात आहे. जा इमारतीत तो बॉम्ब फुटला, त्याच्या समोरच्या रस्त्याने मी अनेकदा गेलो आहे. खूप बेकार वाटत आहे. कोरेगावपार्क मधील माझ्या जुन्या कंपनीत मी दीडवर्ष होतो. जी लोक मारली गेली. जी जखमी झाली. ते आपले भाऊ होते. ज्या इमारतीत ती घटना घडली, म्हणजे ती जर्मन बेकारी पुण्यात खूप नावाजलेली आहे. आणि हेच कारण होत बॉम्ब स्फोट होण्याच. माझ्या मते ही घटना घडणार याचा पोलिसांना आणि आपल्या सरकारला पूर्ण माहिती होती. चार महिन्यापूर्वी तिथे पोलिसांनी एक चेकपोस्ट बनवले होते. आता तिथेच केले आणि आमचे पोलीस (‘पोलीस जवान’ शब्द आता पासून वापरणार नाही) पहारा देत होते. काय पहारा चालायचा हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे. (more…)

पेनचोरी

परवा मी रिलायन्सचे डेटाकार्ड खरेदी केले. काल दुपारी त्या रिलायन्सवाल्यांचा एक माणूस ते डेटाकार्ड द्यायला आला. सोबत एक फॉर्म देखील आणला. मी त्या फॉर्मवर सह्या केल्यावर मला रिसीट देण्यासाठी माझा पेन मागितला. आणि डेटाकार्ड देऊन निघून गेला. डेटाकार्ड घेऊन मी देखील जेवणासाठी कॅन्टीनमध्ये आलो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याच्याकडून पेन परत मागायचा राहूनच गेला. असो पाच रुपयांचा पेन होता. पेन जाण्याची महिन्याभरातील ही तिसरी वेळ आहे. माझ्या एका मित्राला एक आठवडा माझा लिहायला दिला. पुढच्या आठवड्यात पेन परत मागितला तर तो पेन माझाच आहे अस तो म्हणाला. आता अस म्हटल्यावर मी एका पेनसाठी का वाद घालत बसू म्हणून ‘ठीक आहे’ अस म्हणून दुसरा घेतला. (more…)

सवयीची गुलामी

मला गप्पा मारण्याची सवय आहे. दिवसातून एकदा तरी मी कोणाशी ना कोणाशी गप्पा मारल्या शिवाय राहावतच नाही. तसाच संगणकावर बसून काम कारण ही देखील सवय आहे. मागील वर्षी मी माझ्या कोकणातल्या काकाकडे तीन दिवस गेलो होतो. सगळ छान होत. पण तीन दिवस संगणक शिवाय कसे काढले देव जाणे. संगणक किती मोठा आणि जीवनातला घटक बनला आहे हे त्यावेळी मला कळले. आता सवय आणि व्यसन यातला फरक सांगण्याचे तत्वज्ञान मी सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. आणि मी काही तत्ववेत्ता देखील नाही. आणि मुळात जास्त पकवत पण नाही. (more…)

लग्न पहावे ठरवून

माझ्या आई वडिलांचे माझ्या लग्नासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. पण अजून काही त्यांना यश आलेल नाही. आता माझा काही त्यांच्या या मोहिमेला विरोध वगैरे नाही आहे. मध्यंतरी वडिलांना ‘आपण माझ्या लग्नाच दोन वर्षांनी बघितलं तर चालेल का?’ अस विचारलं होत. त्यांना पटेल अशी कारण देखील सांगितली होती. पण ते नाही म्हणाले. मागील दोन महिन्यात अनेक स्थळ त्यांना मिळाली. पहिल्या स्थळात सत्तावीस गुण येत होते. पण आमच्या दोघांची ग्रहमैत्री होत नव्हती. मग त्यामुळे ते आई वडिलांनी ते स्थळ नको म्हणाले. दुसऱ्या स्थळात बावीस गुण जमले. आणि आई वडिलांना ते स्थळ पटले देखील. रीतसर पाहण्याचा कार्यक्रम देखील झाला. (more…)

राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकार

राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकार मागील काही दिवसांपासून ह्या तीन गोष्टींनी खूप वैताग आणला आहे. काय कळत नाही, की आपण सगळे आणि मुख्य म्हणजे हे मिडीयावाले एवढा काय मोठेपणा देतात. काही दिवसांनी बहुतेक राजकारण्यांचे क्रिकेटर आणि कलाकार यांच्या प्रतिमा लावतील. आणि ह्या सगळ्यांचे वाढदिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतील. देशावर रोज पाक हल्ले करतो आहे. कधी नकली नोटा, कधी बॉम्ब हल्ले आणि कधी कधी आपल्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करतो आहे. आपले जवान त्यांच्याशी लढताना शहीद होत आहे. रोज नक्षलवादी देशात कोणाची ना कोणाची हत्या करतात. (more…)

प्रजासत्ताक दिन नवीन काय?

नेहमीच येतो पावसाळा.. तसं आहे या प्रजासत्ताक दिनाच. बोलाव का नको? अस मनात अजून येत आहे. बोलूच. प्रजासत्ताक दिनी सकाळमध्ये पंतप्रधान मध्यमवर्गीय मतदारांवर नाराज आहेत अशी बातमी वाचली. वाचून खर तर आश्चर्य वाटले. कारण त्या मध्यम वर्गीयांनी मतदान न केल्यामुळे पंतप्रधान पंतप्रधान बनले. आणि मुळात प्रजासत्ताक दिन हा सगळेच म्हणजे मी सुद्धा ‘हक्काची सुट्टी’ म्हणून पाळतो.  आणि मुळात आपला देश प्रजासत्ताक कधी होता? म्हणजे मला तरी वाटत नाही.  (more…)

विचार का करायचा?

या वर्षाच्या सुरवातीपासूनच सगळंच बदललं आहे. कंपनीतील कामापासून मित्र मैत्रिणीपर्यंत. पण ठीक आहे. खूप मजा चालू आहे माझी. कामाच्या ठिकाणी आता एवढ कंटाळा येत नाही. आणि मला काम सुद्धा आवडणार दिल आहे. आई वडिलांनी माझ्या लग्नाचं फारच मनावर घेतलं आहे. आणि त्यांनी सुचवलेली स्थळसुद्धा म्हणजे मुली सुद्धा खूप छान आहे. उद्यापासून आमच्या कंपनीतर्फे ‘संभाषण आणि लेखन’ वर्ग सुरु होत आहे. एकूणच खूप छान चाललं आहे. (more…)