आज मला मागे आधी बोललो होतो ना, एका कंपनीत मी मुलाखत दिली होती. त्यांची ऑफर आली. मी जेवढी अपेक्षा केली होती त्याच्या दुप्पट मला त्यांनी ऑफर केली आहे. थोडा इथ जॉइनिंग डेटचा गोंधळ चालू आहे. पण उद्यापर्यंत सुटून जाईल तो प्रश्न. आज सकाळी वातावरण खूपच छान होते. म्हणजे काल रात्री पासूनच पुण्यात भुरभूर चालू होती. आत्ताही पाऊस चालू आहे. आज माझे वडील बरोबर होते म्हणून. नाही तर मी नेहमी अशा पावसात भिजत असतो. बाकी खूप दिवसांनंतर आनंद झाला आहे. काल अबूच्या थोबाडात मारलेली बघितल्यापासून माझा मुडच बदलला आहे. असो, काल अनेकांचे त्यावर लेख वाचले. आणि अनेकांची प्रतिक्रिया वाचल्या. संमिश्र आहेत मत. आज सकाळच वातावरण असलं मस्त होत ना. कंपनीतील माझा मित्र या वातावरणामुळे उशिरा उठला. काल दिवसभर उन नव्हते. आणि आज दुपार पासून पाऊस. एकूणच खूप छान वातावरण होते. आज ऑफर बघून म्हटलं बॉसशी बोलून घ्यावं. (more…)
उखाणे
आज संध्याकाळी माझ्या एका जीवालग मित्राला ‘तू आजकाल भेटत का नाहीस?’ अस विचारल्यावर तो खोचकपणे ‘मी आजकाल सिंहगड, सारस बागेत जास्तवेळ असतो म्हणून’ उत्तर दिले. आता काही महिन्यापूर्वी म्हणजे मी घर विकत घेतल्यावर तो ‘लग्न कधी करतो आहेस?’ अस विचारायला सुरवात केली. सुरवातीला हसून टाळले. पण तो कधीही कुठेही भेटला की हाच प्रश्न. मग शेवटी त्याचा माझ्या लग्नाचा विषय बंद करण्यासाठी मी त्याला नेटवरून एका मुलीचा फोटो दाखवला आणि त्याला म्हटलं की ‘ह्या मुलीशी माझ लग्न ठरलं आहे’. आता ती मुलगी कुठल्याही चित्रपटातील किंवा मालिकेतील नटी नसल्याने त्याला माझी थाप पचली. मग कधीही माझ्याशी लग्नाचा विषय काढला की मी तिचा विषय काढायचो. (more…)
हिंदी राष्ट्रभाषा नाही
आता आत्तापर्यंत मी देखील हे मानत आलो होतो. पण आज डॉ. वि. भि. कोलते यांचा आजच्या ‘सामना’ मध्ये आलेला लेख वाचला. आता मी काही कायदे पंडित नाही. किंवा मी हिंदी भाषेचा विरोधक वगैरे नाही. मी हिंदी गाणी ऐकतो. हिंदी चित्रपट पाहतो. हिंदी चित्रपटातील नट आणि नट्या देखील आवडतात. याआधी मी सलील कुळकर्णी यांचे देखील लेख वाचले आहेत. ‘अमृतमंथन‘ हा ब्लॉग तर मी नेहमीच वाचतो. खूपच अभ्यासपूर्ण लेख असतात. कधी वेळ मिळाला तर नक्की वाचा. हिंदी भाषा ह्या बद्दल आपल्या देशाच्या संविधानात ‘राष्ट्रभाषा’ नव्हे तर कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारली आहे. आता संविधान देखील इंग्लिश मध्ये लिहिले आहे. आणि त्यात १७ वा भाग आणि अनुच्छेद ३४३ व ३५१ मध्ये ‘The Official Language of the Union shall be Hindi in Deonagari Script.’ म्हणजे ‘संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल’ अस स्पष्टपणे लिहील आहे. राजभाषा आणि राष्ट्रभाषा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. आणि अर्थही वेगवेगळा.
मत आणि मतांतर
खर तर आज यावर बोलणार नव्हतो, पण एका नोंदी वरील प्रतिक्रिया वाचून बोलावेसे वाटले. माझ स्पष्ट मत आहे की प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते. आता यावरून देखील मतांतर असू शकेल. अनेकांना महात्मा गांधीजी ह्यांच्या मुळे देश स्वतंत्र झाला असा दृढ विश्वास आहे. अनेकांना गांधीजी हा चेष्टेचा विषय आहे. प्रत्येकच मत तो ज्या परिस्थितीत जन्माला आला आणि वाढला. ज्या गोष्टी त्याला पटल्या यावरून बनत असते. यात अनुभव हा प्रत्येकाच्या मताला दृढ बनवतो. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाची गोष्ट. एकदा ‘राम मंदिर’ या विषयावरून माझा एक मित्र खूपच पेटला. मला त्याने राम मंदिर विषयाने देशात तणाव निर्माण होतो. दंगली होतात. तर जर राम मंदिर न बांधता तिथे एखादा सगळ्या धर्मासाठी दवाखाना बांधावा अस त्याच मत होत. मी त्याला माझ मत सांगितलं की, राम मंदिर ह्या विषयात बोलायचं ठरलं तर हा मुद्दा राजकारण्यांनी वाढवला. सगळे पुरावे आहेत की तिथे आधी राम मंदिर होत. आणि ते नंतर पाडलं गेल. त्याला म्हटलं मला एक सांग की जर उद्या तुझ घर कोणी जबरदस्तीने बळकावलं आणि नंतर कोणी तुला तुझ्या घराऐवजी एखादा दवाखाना किंवा सार्वजनिक मुतारी बांध म्हटलं. तर तुला ते पटेल का? तरी देखील त्याला माझ मत पटलं नाही. शेवटी त्याला आपल्या इथ लोकशाही आहे. प्रत्येकाला मत ठेवण्याचा अधिकार आहे अस म्हणून विषय बंद करावा लागला. (more…)
१००
आज फ्लूने शतक केल पुण्यात. आता सचिनने देखील केल म्हणा. कदाचित शंभर म्हटलं की क्रिकेटच आठवेल. पण पुण्यात सावळा गोंधळ चालू आहे. आता मी काही त्या हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांचा प्रतिनिधी नाही, की ‘फ्लू का आतंक’ म्हणायला. पण सुरवात आणि शतक पुण्यातच घडल. मुळात त्या स्वाइन फ्लू बद्दल काय बोलाव तेच कळत नाही. ना त्यावर योग्य उपाय ना लोकात जागरुकता. प्रत्येक जण तोंडाला रुमाल बांधून फिरतो. पण रुमाल बांधल्याने फ्लू होणारच नाही अस नाही. सरकारला तर काही बोलून फायदाच नाही. पालिका फ़क़्त आम्ही हे केल आणि ते केल्याच्या गप्पा. निष्पन्न काहीच नाही. लोक आपली मरतच आहे. बर गेलेल्यांपैकी काही कधीही घराबाहेर न पडलेल्या आहेत. (more…)
खेद
संध्याकाळची सात वाजताची पुणे लोणावळा लोकल नेहमी प्रमाणे उशिरा आली. पण आनंदाची गोष्ट अशी कि ह्यावेळी गाडी उशिरा येणार याची सूचना दिली गेली. तीच रटाळ ‘हमे खेद है’ ची आकाशवाणी. पुण्यात लोकल उशाराची सवय सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे कोणीही आजकाल चिडत नाही. घरी आल्यावर पंतप्रधानांनी ‘खेद’ व्यक्त केल्याची बातमी म.टा वर वाचली. चंडीगड येथील पीजीआयएमईआर या हॉस्पिटलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पदवीदान समारंभ मंगळवारी झाला. त्यावेळी हॉस्पिटलच्या आवाराभोवती पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेचे कडे उभारण्यात आले होते. सुमीत वर्मा या किडनी पेशंटला या सुरक्षाव्यवस्थेमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होता आले नाही. पेशंट व त्याच्या नातेवाईकांना दोन तास ताटकळत रहावे लागले. परिणामी वर्मा यांचा गाडीतच मृत्यू झाला. मग पंतप्रधानांनी पत्र पाठवून ‘खेद’ व्यक्त केला आहे. (more…)
आळसले
परवा एका मोठ्या मल्टी नेशनल कंपनीत मुलाखतीसाठी गेलो होतो. कंपनीत जत्राच भरली होती. मी ज्या पदासाठी मुलाखत द्यायला गेलो होतो, त्याच पदासाठी जवळपास तीन अंकी उमेदवार आलेले. बघून वाटल आत्ताच मागे फिरावं. पण थांबलो. माझ्या कंपनीतील काम आणि कंपनी दोन्हीही छान आहेत. पण आपण किती पाण्यात आहोत याची परीक्षा आपण स्वतः घेऊन उपयोग नसतो. त्याकरिता दुसऱ्याने तपासावे लागते. मुलाखत हा एकदम उत्तम मार्ग आहे. कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास गेलो होतो. माझी मुलाखत दुपारी अडीचच्या सुमारास सुरु झाली. तोपर्यंत इतर उमेदवारांनाची तोंड बघण्या वाचून दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. मुलाखत तीन पद्धतीत होणार होती. पहिला माझ्या कामाविषयी प्रशोनात्तर पद्धतीने, दुसरी पद्धत लेखी आणि तिसरी प्रक्टिकल. नेहमी माझा प्रश्नोत्तरात म्हणजे पहिल्याच पद्धतीत बोंब असते. कारण माझ इंग्लिश फारच सुमार. त्यामुळे मला प्रश्न कळतो पण उत्तर नीट आणि दुसऱ्याला समजेल अशा भाषेत सांगता येत नाहीत. यावेळी पहिला राउंड सुरु होण्याआधी थोडी धाकधूक होती. पण प्रत्यक्ष मुलाखतीत माझा युवराज झाला होता. त्याने जवळपास तीस प्रश्न विचारले असतील. मोजून दोन सोडली तर इतर प्रश्न माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक उत्तम आणि अचूक आली होती. (more…)
डाळ
परवा चिंचवड गावात एका दुकानदाराला मसूर डाळीला पॉलिश करून ‘तुरडाळ’ म्हणून विकताना आरोग्य खात्याने पकडले. आता कारवाई होईल याची खात्री नाही. आता तुरडाळ किती महत्वाची हे सांगायला नको. एका बाईने ती तुरडाळ खरेदी करून घरी आली. धुतल्यावर त्याची पॉलिश निघून गेली. मग हा सारा प्रकार उघडकीस आला. असो, असं चिंचवडमध्ये सर्रास चालू आहे. याच आठवड्यात चिंचवड रेल्वेस्टेशनच्या समोर असलेल्या पुलाखाली एका तरुणाला ठेचून मारले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह पहिला. सोडा, आता बघून काही वाटत नाही. महिन्यात एक घटना पुण्यात घडतीच. काल ‘पोलीस तपास करीत आहेत’ अशी बातमी वर्तमानपत्रात आली होती. सगळ्याच ठिकाणी असं घडत असत. त्यामुळे कोणालाच काही वाटत नाही. काल सकाळी रेल्वे स्टेशनवर येत असताना इथ निवडून आलेल्या बंडखोर उमेदवाराच्या अभिनंदनाच्या पोस्टरवर चक्क दादांचा फोटो. (more…)
हिंदू अतिरेकी
आज रात्री गच्चीतून फटाके बघताना खूप मजा वाटत होती. काकाच्या मोबाईलचा रिचार्ज आणायाला जाताना काही विचारायलाच नको, कुठे कधी फटका फुटेल काही सांगता येत नव्हते. दोन मिनिटांच्या रस्त्याला दहा मिनिटे लागली. अस वाटत होत की कुठे तरी युद्ध भूमीवरून जातो आहे की काय. चिल्लर पार्टी फारच जोरात होती. परत घरी आल्यावर टीव्हीवर गोवा बॉम्बस्फोटाची बातमी बघितली. ऐन दिवाळीच्या सुरवातीला झालेला बॉम्बस्फोट. आज काही जणांना पकडलं आहे. ते सनातन संस्थेशी सहभाग आहे अस म्हटलं आहे. बघून खरचं खूप छान वाटल. नरक चतुर्दशीचा मुहूर्त फार छान निवडला. निदान आपल्या देशात, आता तो आपला कशावरून हा देखील एक प्रश्नच आहे. नाही मी राजकारणाचा विषय काढत नाही आहे. पण मला तुम्ही सांगा आपला देश सर्वधर्म समभाव बाळगणारा आहे ना. जर हज यात्रेला जाणार्याचा खर्च आपला देश उचलतो. मग अमरनाथला जाताना स्टैंप पेपरवर अस का लिहून द्याव लागत की ‘तिथे जाताना होणाऱ्या अपघात, मृत्यूला फ़क़्त मीच(यात्रेकरू) जबाबदार आहे’. (more…)
दिवाळी आणि फटाके
आजपासून कंपनीची दिवाळी सुट्टी सुरु झाली. दोन दिवसापूर्वी माझ्या मित्राला डोळ्या खाली भाजल होत. त्याला विचारलं ‘काय झाल? कशामुळे भाजल?’ त्यावर तो म्हणाला ‘काल फटाके उडवताना फटका ठिणगी माझ्या डोळ्याखाली आली. त्यामुळे भाजल’. काल घरी येत असताना एका ठिकाणी बरीच चिल्लर पार्टी जमा झाली होती. त्यांचे काही तरी बोलणे चालले होते. मग त्यातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणाला ‘तुम्ही कोणी येऊ नका, मी जाऊन त्याला मागतो’. अस म्हटल्यावर इतरांनी मान डोलावली. मग तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फटाके उडवत असलेल्या त्याच्यापेक्षाही मोठ्या मुलाकडे गेला. हा काही बोलणार तेवढ्यात हे चिल्ले पिल्ले मागून रस्ता ओलांडून त्याच्या मागे उभे. हा त्या फटका वाजवणाऱ्या मुलाला म्हटला ‘ए आम्हालाही फटाके दे ना राव’. ऐकून हसू आले. पण त्याहून अधिक हसू त्या मुलाने फटाका लावला की ही सगळी पार्टी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळून जायची. आणि दुसरा फटाक्याची वात पेटवताना फार जवळ जाऊन जणू काही आता त्यावर संशोधनच करत आहे असा आविर्भाव आणून बघायची. आणि पेटला की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळायची. अस चालू होत. बघून हसू की रडू अस झाल होत. (more…)