संध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर घरी येत असताना चिंचवडमधील चाफेकर चौकात एक भले मोठे पोस्टर लावले होते. त्यावर प्रत्येक तासाला ‘फ्री गिफ्ट’ जिंका अस लिहिलेलं होते. पोस्टर छान होत पण ‘फ्री गिफ्ट’ म्हणजे काय?. गिफ्ट नेहमी ‘फ्री’ च असत ना, जर गिफ्ट विकत असेल तर त्याला कोणी गिफ्ट कसे म्हणेल? पोस्टर मधील ‘फ्री गिफ्ट’ शब्द वाचून हसू आले. आज दुपारी जेवण करत असताना माझ्या सहकारणीला सहजच विचारल की ‘तू दिवाळीत फटाके उडवतीस का?’ तर त्यावर ती म्हणाली ‘मी फटाके फोडते आणि पतंग उडवते’. यावर सगळेच हसू लागले. पण या वाक्यावरून तीने माझी उडवली होती. पण छान कोटी केली होती. (more…)
गाणी
आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवड्याला गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच, एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का रेडीओ बजने दे जरा’ अस म्हटल्या म्हटल्या माझ्या बॉसने त्याला थांबून म्हटला ‘बस्स’. हे ऐकून सगळेच हसू लागले. परवा देखील असंच चिंचवडच्या बसमध्ये बसलो तर त्यात गाणी चालू. आता पीएमपीएल मध्ये गाणे ऐकण्याची ही माझी दुसरी वेळ. बर गाणी सुद्धा निवडून काढलेली. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ ऐकून ताबडतोप माझ्या मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. बहुतेक यावेळी बोनस न मिळाल्याच्या दुख उफाळून आले असावे त्या बस चालकाला. बर गाणी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे की काय अस वाटत आहे. (more…)
धावता प्रवास
सकाळी सव्वादहाची लोकल पकडून शिवाजीनगरला आलो. पण नगरच्या गाड्यांना गर्दी फार. मग काय थोड्या वेळ थांबव लागल. सव्वा अकरा वाजता एक बस मिळाली. ती नगरमध्ये पोचायला सव्वा दोन वाजता आली. पण तिथून आमच्या गावी जाणारी सव्वा दोनची गाडी ‘इलेक्शन ड्युटीला’. तीन वाजता पुढची गाडी होती. मित्रासोबत गप्पा मारताना एका जणाचा मोबाईल चोरून एक चोर पळाला. लोकांनी आणि त्याने पाठलाख केला, पण तो काही सापडला नाही. बस स्थानकातील पोलीस चौकीत नेहमीप्रमाणे गायब. तीन वाजताची बस आली, साडेतीन वाजता. बर गावात जायला पुढे एक तास. मतदान चुकू नये म्हणून आटापिटा. शेवटी मतदान झाल माझ. गावात अंदाजे नव्वदीच्या घरात यावेळी मतदान झाल. बर ह्या सगळ्या मधल्या काळात वडिलांचे दोन, लहान भावाचा एकदा, आईचा एकदा आणि मित्रांचे दोनदा फोन येऊन गेले. माझ्या मतदानाला गल्ली सेना हजर होती. (more…)
कत्तलीची रात्र
कदाचित तुम्ही हा शब्द एकाला असेल किंवा नसेलही. पण मी लहानपणापासून आमच्या गावात ही रात्र बघितली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला ‘कत्तलीची रात्र’ म्हणतात. मग ती निवडणूक साधी ग्रामपंचायतीची देखील असली तरी. मी शाळेत असताना नेहमी आमच्या गावाच्या सुरवातीला असणारी झोपडपट्टीत आधी निवडणुकी आदल्या दिवशी होणारी कत्तलीची रात्र माहिती होती. तिथे निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांना एका मतासाठी पन्नास रुपये दिले जायचे. आता हा आकडा निवडणूक आणि तो उमेदवार यावरून कमी जास्त व्हायचा. आता १९९५ साली पन्नास रुपये आकडा खूप मोठा होता. काही पक्षाचे लोक दारू, कोणाला घरासाठी पैसा, जमीन, काहीना कपडे तर काहींना घरांसाठी सिमेंट आणि काहीना रेशनकार्ड अस बरंच काही द्यायचे. आता मत मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला झोपडपट्टीत हे वाटावेच लागतात. हे मी माझ्या मनाच किंवा कुठल्या वर्तमानपत्रात वाचून सांगत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. ह्या गोष्टी घडतात. (more…)
कोणी तरी असावी
आता कशी सुरवात करावी हेच कळत नाही. मागील एका महिन्यापासून एक गोष्ट मला सारखी खटकत आहे. काय करावं तेच कळत नाही. मला ना आजकाल जी मुलगी दिसेल ती आवडते. बर इथपर्यंत ठीक आहे. पण दुसरी पहिल्या मुलीपेक्षा सुंदर दिसली मग ती आवडते. म्हणजे दर पाच दहा मिनिटांनी दुसरी. ‘ती’चा विषय कसा बसा कमी झाला आहे. ‘ती’च्या विचारांनी आधी डोक दुखवल, आता ह्या गोष्टींनी डोक पकल आहे. दुसरे कसले विचारच येत नाहीत मनात. नेहमी वाटत कोणी तरी असावी की जी फ़क़्त माझीच असावी. आणि तीलाही मीच असावा. जीला बघितलं की दुसऱ्या कोणत्या मुलीचे विचार मनात डोकाऊ देखील नये. आणि तीने मला बघितलं की तीच्याही मनात माझाच विचार यावा. म्हणजे रंगाने फार गोरी असली पाहिजे अशी काही किंवा फार काळी हवी अस काही नाही. फ़क़्त तिच्यावर विश्वास ठेवता यावा. (more…)
बोनस
आमच्या कंपनीत यावेळी बोनस काही होणार नाही. दिवाळी आणि दसरा हे सण जसे धार्मिक महत्व असते तसे आर्थिक देखील असते. दसऱ्याला घरी गेलो होतो. माझ्या लहान भावाला दसऱ्याला बोनस मिळाला. त्याबरोबर मिठाईचा बॉक्स देखील. स्वारी भलतीच खुश होती. आल्या आल्या विचारलं आईने ‘बोनस कधी मिळणार?’. आता हा प्रश्न याआधी काका, काकू, ‘ती’ ची आई, बहिण अशा सगळ्यांनीच विचारला होता. आणि सगळ्यांना दिलं तेच उत्तर मी आईला दिलं ‘यावेळी मिळल अस काही वाटत नाही’. मित्राचा आज इमेल आला होता. त्यात ‘हे सगळे बोनसची वाट पाहत आहेत, आणि तुम्ही?’, आणि खाली दहा पंधरा लाल रंगाच्या माकडांचा ग्रुप फोटो होता. पाहून त्याच्या देखील कंपनीत यावेळी बोनस नाही हे मी समजलो. (more…)
मामा तुपाशी आणि भाचा उपाशी
सध्याला पुण्यात सभाच सभा होत आहे. सगळ्यांनाच पुण्याला यायला आणि भाषणाला वेळ मिळतो आहे. राहुल गांधी सोडून. राहुल गांधी आले. पुढे काय झाले तर ‘हाय आणि बाय’. जाऊ द्या ‘बडे लोग बडी बाते’. नंतर बोलू त्या विषयावर. नासाने चंद्रावर स्फोट घडवून आणले आहेत. चंद्रावर पाणी कुठे आहे, ते शोधण्यासाठी. आता नासाचा निर्णय घेण्यामागे काही ना काही तथ्य असेलच. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला. खूप मोठी कामगिरी केली. आपला भारतपण ना एक प्रश्नचिन्ह आहे. एका महिन्या आधीपर्यंत पुण्यात पाणी कपात चालू होती. एक वेळ तर अशी आली होती की पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उरला होता. कोल्हापुरात तर पाऊस पडावा यासाठी काही लोकांनी यज्ञ देखील केले. शेवटी पाऊस पडला. आता ठीक आहे. पाणी पूर्वीसारखे येते आहे. (more…)
चिल्लर पार्टी
संध्याकाळी घरी येताना रस्त्याच्या बाजूला एक बाई उभी होती. तिने एका छोट्याशा बाळाला बरोबर घेतलं होत. ते बाळ बहुतेक नवीनच चालायला शिकलं होत. अगदी मस्त, ‘गोर गोर पान फुलासारखं छान’. त्याची आई त्याला विचारात होती ‘कुठे जायचं?’. मी त्याला बघत चाललो होतो. त्याने माझ्याकडे बोट केले. बघून खूप हसू आले. मध्यंतरी मी माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलो होतो. आता तिचा मुलगा तीन वर्षाचा. पण त्याच्या वर्तनाने वाटणार नाही. त्याने मला त्याच्या खोलीतील संगणक कसा चालू करायचा ते सांगितले. नंतर गेमची सीडी कशी टाकायची आणि त्याचे ते रंग भरण्याचे खेळ कसे खेळायचे हे दाखवले. बर त्याच असं, मी एक गेम खेळणार आणि मग तू एक गेम खेळायलाच हवा. मग काय ते रंग भरण्याचे खेळ मलाही त्याने खेळायला लावले. (more…)
माझी बडबड
मी बडबडा आहे. खूप गप्पा करतो. बहुतेक सगळे मला बघून पकाऊ आला अस मनात म्हणत असतील अस वाटतं. काल कंपनीत दुपारी माझ्या काही सहकारींशी मी बोलत होतो. पण त्यांचे माझ्याशी गप्पा मारण्यात काही रस आहे अस दिसलं नाही. त्या आपल्या पीसीत डोक घालून आपआपल काम करत होत्या. संध्याकाळी लोकलमध्ये माझ्या मित्राशी बोलायला गेलो तर त्याने लगेचच दुसरीकडे तोंड केल. नंतर तो स्वतहून बोलला. पण त्याच्या वागण्याने माझा अडवाणी झाला होता. अस माझ्याबरोबर आधी खूप वेळा घडल आहे. पण आज प्रथमच मला जाणवलं. नंतर मी काही परत त्यांच्याशी गप्पा मारल्या नाहीत. (more…)
म्हणे मी अकौंट चेक करतो
सहकारणी उवाच. काल नेहमीप्रमाणे कंपनीत मी काम करत होतो. बाईसाहेब दहा दिवसांनी उगवल्या. आल्या आल्या माझ्या एका सहकारणीला जाऊन माझ्याबद्दल आपल्या मनातील बरच काही बोलल्या. बर मला समजल्यावर मी तीला (बाईसाहेबांना) विचारलं. मी तुझ्या संगणकावर एकदाच बसलो होतो. आणि मी कधीच तुझ जीमेल उघडले नाही. बाईसाहेबांची नवीनच कथा. मला तुझ्या सिनिअरने फोन करून सांगितले. तीच्या म्हणण्यानुसार त्याने मी तीच्या पीसीवर बसून तीचे जीमेलचे अकौंट चेक करताना बघितले. आता माझा सिनिअर गेला आहे ममताला भेटायला. बहुतेक ‘कोलकाता ते पुणे’ अशी नवी एक्स्प्रेस सुरु करा म्हणतो की काय देव जाणे. त्याच्यावर आपण नंतर बोलू. बर माझी पायलीची पन्नास अकौंट आहेत. बर तीच चेक करायला मला जमत नाही. आणि ही सांगते मी तीच चेक करत बसलो होतो. (more…)