चिंब पावसानं

काल दुपारीपासूनच पावसानं पुणे झोडपायला सुरवात केली आहे. काल सकाळी सकाळी आकुर्डी स्टेशनवर जात असताना एका दुधाच्या गाडीचा झालेला अपघात बघितला. आता ड्रायव्हर जागीच ठार झाला. अपघात परवा रात्री झाला असावा. आता मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी मोडलेली गाडी पाहायला मिळाली. स्टेशनवर आलो तर कोल्हापूर एक्स्प्रेस थांबलेली. लोकलमध्ये चढलो तर चिंचवडला ‘प्रगती’ आणि ‘डेक्कन’ एक्स्प्रेस उभ्या. मग लोकलमध्ये समजलं की देहूरोडला एका मुलीला एक्स्प्रेसने उडविले म्हणून. आजकाल अपघात काही नवीन गोष्ट राहिली नाही माझ्यासाठी. महिन्यातून एक – दोन हमखास पाहायला मिळतात. (more…)

स्वरूप पहा

काल माझ्या एका परम मित्राने मला एक इमेल पाठवला. त्यात दोन छायाचित्र आहेत. एकात मनसेचे उर्दूत पोस्टर आहे. आणि दुसऱ्यात मनसेचा एक उमेदवार युपी भैय्याकडे मतासाठी हिंदीत बोलत आहे. इमेलच्या सुरवातीलाच ‘फ़क्त मुस्लिमांच्या मतांसाठी उर्दू भाषेत पोस्टर लावले. मुस्लिमाना मराठी समजते मग कशाला ही नाटके….? हेच का तुमचे मराठी प्रेम………?‘ अस लिहिलं आहे. बघून खरच दुख झाले. पण आपण त्या विषयावर नंतर बोलू. माझा जो मित्र आहे. म्हणजे ज्याने हा इमेल पाठवला. याचा इतिहास आपण आधी बघू. याने अजूनपर्यंत कधी मतदान केलेलं नाही. मागील लोकसभेच्या निवडनुकीच्या वेळी त्याला विचारलं मतदान करणार का? तर साहेब नाही म्हणाले. ह्या आधीही कोणत्याच निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावला नाही आहे. हा मराठीचा दाता आपल्या मुस्लीम रूममेटशी हिंदीत बोलतो. (more…)

लोन घ्या आणि आयुष्यभर फेडा

परवा ‘ती’ च्या आई सोबत गप्पा मारत असताना सहजच माझ्या घरासाठी काढलेल्या लोन विषयी चर्चा सुरु झाली. आता माझ लोन फार नाही. त्यामुळे लोन फेडण्याचा कालावधी देखील कमी आहे. काकू म्हणाल्या ‘तुझ बर आहे, चार वर्षात तू लोन मधून मोकळा होशील.’ काकूंचा मुलगा म्हणजे ‘ती’ चा मोठा भाऊ. त्याने मागील महिन्यात डांगे चौकात टू बीएचके घेतला आहे. काकू सांगत होत्या त्याला वीस वर्षे आता कर्ज फेडावे लागणार. आमच्या कंपनीतील बहुतेक सर्वांनीच घरासाठी विविध बँकामधून कर्जे काढली आहेत. बर कर्जे पण अशी न की, वीस – तीस लाखांच्या घरात. आता सगळेच महिन्याच्या महिन्याला पगारातील एक मोठा हिस्सा बँकेला देत असतात. म्हणजे मी पण तसा देतो. (more…)

राज इज बुलशेट

परवा म्हणजे बुधवारी कंपनीत जेवणाच्या वेळी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना मी राज ठाकरे दसऱ्याला नगरला आला होता. त्याची सभा मस्त झाली अस म्हटलं. आमच्यातील एकाला काय झाले कुणास ठाऊक. मला त्याने विचारले की तुला राज ठाकरे आवडतो ना. मी त्याला म्हणालो माझा त्याच्या कृतीला पाठींबा आहे. तो जे बोलतो तो ते करतो म्हणून मला तो आवडतो. बाकी उद्या मराठीचा मुद्धा घेऊन सोनिया जरी उतरली तरी मी तिला आणि तिच्या पक्षाला चांगले म्हणेन. बहुतेक त्याला माझे म्हणणे पटले नाही. तो मला म्हणाला की ‘म्हणजे मराठी बोलणार्याने महाराष्ट्रात राहायचं, बाकीच्यांनी नाही. नाही तर तुम्ही त्याला मारणार’. त्याचा आवाज आणि त्याच्या एकूण राग रंगावरून तो बहुतेक जाम चिडला होता. मला म्हटला ‘सगळे भारतीय आहेत. पण तुम्ही मराठीच्या मुद्द्यावरून वाद घालता. मारहाण करता. ते नेते लोक हिंदू मुस्लीम यात वाद वाढवतात. ते सगळ मतासाठी करतात. मतासाठी आणि सत्तेसाठी मराठी मराठी करतात’. (more…)

चंपी जयंती

काल रात्री जेवताना माझ्या लहान भावाला मी उद्या सुट्टी आहे का म्हणून विचारलं तर तो नाही म्हणाला. मग त्याने मागील वर्षीचा घडलेला किस्सा सांगितला. तो म्हणाला मागच्या वर्षी दोन ऑक्टोबरला सकाळी रिक्षावाले काका एका मुलाला न्यायला गेले तर त्याचे वडील त्यांना म्हणाले ‘आज चंपी जयंतीची तुम्हाला सुट्टी नाही का?’ असं लहान बंधूराजांनी सांगितल्यावर घरातील सगळेच हसू लागले. काल माझा मित्र म्हणाला उद्या ‘पापा डे’ ला काय करणार? त्याला म्हणालो ‘काय?’ तो म्हणाला की ‘उद्या दोन ऑक्टोबर आहे, आता महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत ना. म्हणून उद्या पापा डे असं म्हणालो’. मला ऐकून हसू फुटले. (more…)

शी इज द मेनचा हडीप्पा

परवा ‘दिल बोले हडीप्पा’ बघितला. खर सांगायचं झाल तर गाणी सोडून काही खास आवडल नाही. पण एक गोष्ट नक्की काही महिन्यांपूर्वी मी ‘शी इज द मेन’ ह्या इंग्लिश चित्रपटाची कथा चोरली आहे हे नक्की. दोन्ही चित्रपटात मूळ कथा सारखीच. आता तिकडे फुटबॉल प्रसिद्ध म्हणून त्यात फुटबॉलचा सामना दाखवला आहे. आणि यात आपल्या इकडे क्रिकेट प्रसिद्ध म्हणून क्रिकेटचा सामना. शी इज द मेन मध्ये नटी जशी मुलाचा वेश धारण करून फुटबॉल सामना खेळते तसंच इथ राणी मुखर्जी एका सरदाराचा वेश धारण करून क्रिकेटचा सामना खेळते. दोन्हीही ठिकाणी नटीच सामना विजयी करून देते. (more…)

इलेक्शन कार्ड

यावेळचा दसरा मी गावी साजरा केला. काल नगरमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. परवाच वडिलांनी मला माझे निवडणुकीचे आलेले ओळखपत्र दिले. ते बघून असे वाटले की, फोटो कॉपी करून दिले असावे. लेमिनेशन तर एकदम फालतू. थोड ओढलं कि, निघून येईल. बर त्यातलं छायाचित्र ब्लाक अन्ड व्हाईट. मी तर रंगीत छायाचित्र जोडलं होत त्या फॉर्मला. माझ नाव, वडिलांचं नाव ठीक. पत्ता देखील बरोबर. पण जन्म वर्ष चुकीचे. बर वडिलांचे ओळखपत्र तर काही विचारूच नका. नावात गोंधळ. आडनाव ‘आठल्ये’ च्या एवजी ‘आढळले’. बाकी पत्ता ठीक होता. आईच जुनंच कार्ड असल्याने ते ठीक होत. वडिलांनी थोड्या चुका दुरुस्त करण्यासाठी दिलं होत. ते अधिक चुका होऊन आल होत. (more…)

लग्न का करावे?

काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे मला फोन कर’. काही तरी खूपच महत्वाच काम आहे बहुतेक म्हणून मी तीच्या लहान बहिणीला फोन केला. तर ती म्हणाली की मला नवीन नोकरी लागली आहे. आणि मला संगणकाच्या प्रक्टिससाठी तुझा संगणक हवा आहे. तिला मी म्हणालो की मला आज गावी जायचं आहे. कंपनीतून मी डायरेक्ट निघेन. आणि मंगळवारी येईल. ती म्हणाली पण मला खूप आवश्यक आहे. तू काही तरी मार्ग काढ ना. तीला म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी तुला संगणक देतो. बर म्हणून तिने फोन ठेवला. (more…)

टीसी

आज सकाळी लोकल चुकली. येताना लोकल वेळेवर आली. पण नेहमीप्रमाणे उशिरा निघाली. पुणे स्टेशन वरून निघायची वेळ सातची आणि निघाली सव्वा सातला. मी नेहमी येताना शेवटून दुसऱ्या डब्याच्या पहिल्या गेटवर असतो. महिन्याच्या अखेरच्या काही दिवस टीसी (तिकीट चेकर) आमच्या डब्यात तिकीट चेक करायला नक्की येतो. आता नक्की यासाठी म्हणतो कारण मी त्या डब्यात रोज असल्याने मला पक्क माहित झाल आहे. आणि कोण कोण टीसी आहे हे देखील माहित झाल आहे. त्यातील एक पंजाबी टीसी आहे. तो नेहमी डब्यात येत असतो. गोल चेहरा आणि चेहऱ्याप्रमाणेच शरीरयष्टी, पण धष्टपुष्ट.काळा रंगाचा कोट, भरदार दाढी- मिश्या आणि डोक्यावर पगडी. खर तर त्याच वर्णन करावा असाच आहे तो. एक वर्षापासून त्याला मी बघतो आहे. अनेक वेळा माझा लोकलचा पास चेक केला आहे. पण कधी बोलण वगैरे झाल नाही. (more…)

बोलावे तसे चालावे

मध्यंतरी टाइम्स नाऊवरची राज ठाकरेंची मुलाखत बघितली. ते म्हणतात ना ‘बोलवे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले’. तस आहे अगदी. देशभरात सिगारेटवर बंदी आहे. पण अजून देखील अनेक ठिकाणी ‘धुम्रपान बंदी’ असे फलक लावलेले आहेत. कारण सरकारच्या बंदीवर कोणाचा विश्वास नाही. शरद पवार खूप काही बोलतात. पण ते जे बोलतात ते किती पाळतात? विदेशीचा मुद्धा घेऊन पक्ष स्थापन केला. आणि आता त्याच कॉंग्रेस सरकारच्या सरकारेत मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबई मध्ये पंतप्रधान आले होते. ७६५ कोटींची घोषणा वगैरे झाली. अजून पर्यंत एक रुपया देखील आला नाही दिल्लीतून. (more…)