नवीनपणा काहीच नाही

मागील काही दिवसांपासून नवीन काही घडतच नाही आहे. तीच सकाळ, तीच लोकल, तीच कंपनी, तेच काम. सगळ्या गोष्टीत तोच तोचपणा आलेला आहे. काही नवीन घडतच नाही आहे. दिवसाचा एक असा ठरलेला दिनक्रम (साचा) बनून गेला आहे. लोकल – कंपनी – घर. बस हेच सगळ. वर्तमानपत्रात त्याच त्याच बातम्या. कंपनीत येताना आणि घरी जाताना नेहमी मी काही तरी नवीन घडल अशी अपेक्षा करतो. पण काही नवीन घडत नाही. सकाळी उठून आवरा, लोकल पकडा, कंपनीत जाऊन तेच काम करा. घरी येऊन तेच. वर्तमानपत्रात काही नवीन बातम्या नाही. टीव्हीचे कार्यक्रम तेच. वर्डप्रेसवर पण त्याच पद्धतीच्या नोंदी. बर ज्यांच्या बोलण्याने पान देखील हलत नाही. अशी लोक देशपातळीच्या विषयावर आपली मत मांडतात. राष्ट्रीय नेते मूर्ख म्हणतात.

(more…)

रेशनकार्ड

रेशनकार्डसाठी आज सकाळी मी निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये गेलो होतो. तसं म्हणायला गेल तर मी मे महिन्यापासून चकरा मारतो आहे. आधी महानगरपालिकेत. आणि आता निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये. सगळा गोंधळ ऑफिसमध्ये चालू होता. कोणाला कशाचा काही मेळ नाही. एकच कर्मचारी काम करीत होती. बाकीच्या टेबलावरचे निवडणुकीसाठी बाहेर गेलेले. आणखीन एक बाई होती. पण ती मी ‘इलेक्शन ड्युटीवर’ आहे अस सांगून प्रत्येकाला टाळत होती. बर जी काम करत होती. ती काम करण्यापेक्षा अधिक चीड चीड करत होती. मी तिला माझ्याकडील पावती दाखवली आणि विचारलं की ‘इथ कोणाला विचारायचं नवीन रेशनकार्ड बद्दल?’ ती न नुसताच पाच एक मिनिट ती पावती पाहत राहिली. काही उत्तर न देता परत ती पावती परत दिले. (more…)

पुण्याची लोकल म्हणजे कचरा गाडी

मागचा अख्खा आठवडा सात वाजता पुणे स्टेशनवरून सुटणारी पुणे लोणावळा लोकल साडेसातच्या आत पुणे स्टेशनवरून सुटली नाही. रोज लोक लेखी तक्रार करून देखील, लोकल काही वेळेवर येत नव्हती. शुक्रवारी रात्री तर कहरच. रेल्वेचे कर्मचारी तक्रार देखील लिहून घ्यायला तयार नव्हते. शेवटी सगळे प्रवासी लोक त्यात मी देखील पुणेस्टेशन प्रबंधकाच्या केबिन मध्ये गेलो. सगळे फार चिडलेले होते. आम्हाला बघताच प्रबंधक साहेबांनी फोनाफोनी चालू केली. लोकल कुठे आहे? का अजून स्टेशन मध्ये अजून का नाही आलेली?. त्यांना तक्रार लिहून घेतली नाही कळताच त्या स्टेशन प्रबंधकाने त्या रेल्वे कर्मचाऱ्याला झापलं. खर तर मला त्याच्या झापून देखील समाधान होत नव्हत. मला वाटल होत की स्टेशनप्रबंधक ‘ अटल बिहारी’ असेल. पण तो मराठी होता. (more…)

काय करायचं या परप्रांतीयाचं?

दुधात भेसळ करणाऱ्या दोन आंध्र प्रदेशातील दोन तरुणांना काल पिंपरीत पोलिसांनी अटक केली. एक आहे बक्तुल रामचंद्र गिरी आणि दुसरा उमेश कृष्णा दांडे नामपल्ली. दोघेही खराळवाडी मधील साईकुंज इमारतीच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत राहणारे. रोज सकाळी साडेचार वाजता एका डेअरी मधून दीडशे लिटर दुध खरेदी करून अजमेर मधील एका ग्राहकाला काही पिशव्या त्याच किमतीत विकत असत. काही पिशव्या एका बाजूने फोडून त्यामधून दुध काढून, तेवढेच पाणी पिशव्यात भरून त्या सील करत असत. पन्नास लिटर दुध मागे दहा लिटर अतिरिक्त दुध हे निर्माण करत असत. चिखली आणि मोरेवस्ती येथील हॉटेल, चहाच्या टपऱ्या या ठिकाणी ते विकत असत. रोजचे निदान ३००-५०० रुपये सुटत असत. (more…)

टीव्ही आणि मी

दोन वर्षांपूर्वी मी मुंबईच्या एका आयटी कंपनीत रुजू झालो होतो. त्यावेळी मी माझ्या गिरगावमध्ये मावशीकडे राहायला होतो. तसा गिरगावात मी एकच महिना होतो. पण याच काळात माझ टीव्ही विषयीचे मत बनायला सुरवात झाली. कंपनीची अशी काही ठराविक वेळ नव्हती. कधीही या आणि आठ तास काम करून घरी जा. माझी कंपनी डीएन रोडवर होती. मला माझ्या मावशीचे घर ते कंपनी हे अंतर बेस्टने दहा मिनिटे आणि चालत २० मिनिटे. मी सकाळी दहाच्या सुमारास कंपनीत जायचो आणि ६:३० पर्यंत घरी यायचो. घरी आल्यावर फ्रेश होता होता सात वाजून जायचे. काय गप्पा होतील ते याच वेळेत. सात वाजले रे वाजले सगळे पहिल्या खोलीत टीव्ही समोर. मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून मी कधी काही बोलत नसायचो. त्यांचे ठरलेले कार्यक्रम सात ते दहा या वेळेत असायचे. (more…)

पुन्हा ही चूक घडणार नाही

मागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. अख्खा दिवस झोपून काढला. काल पण खर तर तेच केल होत. काल रात्री ताप उतरला होता. पण सकाळी पुन्हा आला होता. असो आता फ़क़्त डोक दुखत आहे. माझ्या या तापामुळे अनेकांची तशी डोकेदुखी झाली. आई तर काही विचारू नका. तिला तर काय करू आणि काय नको अस झाल होत. (more…)

माझे नाव पुढील पानावर

मी आठवीत असताना, माझ्याकडे जी पुस्तके होती त्यात इतिहासच एक पुस्तक होत. माझ्या वडिलांनी मला कधीच नवी कोरी पुस्तक आणली नाही. त्यांचे एक मित्र होते. त्यांच्या मित्राचा मुलगा माझ्यावरच्या इयत्तेत होता. तो आधी अभ्यासक्रमाची पुस्तके वापरायचा आणि वर्ष संपल्यावर तो मला ती सगळी पुस्तके मला वापरायला द्यायचा. आणि माझ वर्ष संपल्यावर मी त्याच्या बहिणीला ती द्यायचो. ती माझ्यापेक्षा एका वर्षांनी लहान व माझ्या खालील इयत्तेत. आमच दरवर्षी अस चालायचं. मी आठवीला गेलो तेव्हा माझी सातवीची अभ्यासक्रमाची पुस्तक त्याच्या लहान बहिणीला दिली. आणि आठवीची अभ्यासक्रमाची पुस्तके आणली. (more…)

अपघात

आज संध्याकाळी आठच्या लोणावळा लोकलने मी येत असताना गाडी फारच थांबत थांबत येत होती. दापोडीच्या पुलावर तर दहा मिनिटे थांबली. आता पुण्यातील लोकल कुठेही आणि कधीही थांबतात. आता एका वर्षानंतर मला देखील सवय झाली आहे. लोकल दापोडीहून निघून कासारवाडीला आली. जेव्हा कासारवाडीहून लोकल निघाली तर फलाटाच्या शेवटी दोन पोलीस उभे होते. अंधार असल्याने त्यातील एक पोलीस हातात एक मोठी बैटरी घेवून उभा होता. त्या फलाटावर एक प्रेत होते. बघूनच समजून गेलो. त्याच्या शरीरावर कापड टाकलेले होते. तरी मधील भाग खोलगट दिसत होता. लोकलला एवढा उशीर का झाला हे सुद्धा समजले. बहुतेक सातच्या नंतर सुटणाऱ्या एक्स्प्रेसने उडवले असावे. (more…)

अकलेचे कांदे

काल रात्री आमच्या इमारतीतील वरच्या मजल्या वरील एक व्यक्ती आला. मला म्हटला कि माझ्या संगणकाचा फोर्मेट मारायचा आहे. मी विचारलं का? तर तो बोलला, माझ्या संगणकातील मेक्याफी अंटी व्हायरस काढायचा आहे म्हणून. त्याला मी म्हणालो मग अनइंस्टाल करायचा मग. त्यासाठी फोर्मेट मारण्याची काय गरज?. तो म्हणाला नाही. फोर्मेट करावा लागेल अस माझा मित्र म्हणाला. त्याला म्हटला मला सुटीच्या दिवशी माझ्याकडे तुझा संगणक घेऊन ये. मग मी तो काढून दुसर एखादा टाकू. तो म्हटला ठीक आहे. बर हा जो व्यक्ती होता ना हा इंजिनियर आहे. आणि त्याच्या हाताखाली पन्नास जण काम करतात. आणि हा बोलतो कि सोफ्टवेअर काढण्यासाठी पीसी फोर्मेट करायचं. (more…)

लव्ह मैरेज की अरेंज मैरेज?

काल रात्री लोकल चुकल्याने बसने आलो. त्यात नेहमीप्रमाणे एक प्रेमी युगल होते. नाही तरी पुण्यात असले प्रेमी युगलांची संख्या कुठे कमी आहे म्हणा. संध्याकाळी घरी आलो. आमच्या शेजारी एक नवीन जोडप आल आहे राहायला. त्यांना एक गोड बाळ पण आहे. आज त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. नक्की काय होत आहे हे बघायसाठी मी बाहेर डोकावून बघितलं तर मारहाणीचा आणि कोणाचा तरी रडायचं आवाज येत होता. त्यांच्या घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला असल्याने नक्की काय होत हे मला कळल नाही. पण एवढं नक्की त्या जोडप्यात वादावादी चालू होती. सकाळी लोकल मध्ये एकाने सांगितलं की त्यांच्या येथील एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याने बोलताना त्याची जुनी लफडी तिच्या बायकोला सांगितली. त्याच्या बायकोला वाटले की हा मोकळ्या मनाचा आहे म्हणून तिने देखील तीच जुन प्रेम प्रकरण त्याला सांगितलं. झाल ह्याने तिला घराबाहेरच काढल. (more…)