काय सांगू काल आणि आज मी कंपनीत कामात फारच चुका केल्या. तसा चुका अखंडपणे करण्याचा विक्रम मीच नोंदवला असेल. ज्या कामाला फार फार तर अर्धा दिवस लागायला हवा तिथ मी काल आणि आज मिळून दोन दिवस लावले आहेत. आणि अजूनही काम काही झालेलं नाही. अकरावीत असताना एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता भ्रष्टाचाराचा. त्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचे बक्षीस सुद्धा मिळाले. पण ज्यांनी स्पर्धा आयोजित केली होती त्या अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्यांच्या समितीतील भष्टाचार बद्दल बरच काही मी त्या निबंधात लिहिले होते. वकृत्व स्पर्धेत भाग घेतला, आणि भाषणासाठी उभा राहिलो. विषय होता माझा आवडता नेता. आणि भाषणाची पारंपारिक सुरवात केली आणि कोणावर बोलायचे तेच नेमके विसरलो. मग काय एका मित्राने सांगितले, मी कोणत्या नेत्यावर बोलणार होतो ते. (more…)
काळजीपेक्षा भीतीच जास्त
मागील दोन दिवसांपासून मला थोडी सर्दी आणि खोकला झाला होता. मला सहसा आजार होत नाहीत. पण यावेळी मात्र सर्दी झाली आणि त्यानंतर खोकला. आईच काही विचारू नका. मी काही म्हटलं नाही तरी मेडिकल मध्ये जाऊन व्हिक्स, दोन पांढऱ्या रंगाच्या गोळ्या आणल्या आणि घे म्हणाली. आता तिच्याशी काही वाद घालण्यात काही फायदा नव्हता. बर मी काल घेतो म्हणालो आणि सकाळी विसरलो. तर आईने ताबडतोप माझ्या वडिलांना फोन करून सांगितले. मग काय सकाळी सकाळी वडिलांचा फोन ओषधे घे म्हणून. त्यांना मी घेतो म्हटल्यावर त्यांनी फोन ठेवला. बर सकाळी कंपनीत आलो तर माझा सिनिअर आला नव्हता. चौकशी केल्यावर कळले की, त्याची मुलगी पलंगावरून खाली पडली. आणि आता हॉस्पिटल मध्ये आहे. पलंगावरून पडल्यावर हॉस्पिटलमध्ये? अस विचारल्यावर कळले की त्यानंतर तिने उलट्या करायला सुरवात केली म्हणून हा आपला डॉक्टरकडे घेवून गेला. (more…)
गैरसमज
आज संध्याकाळची ५:३० ची शिवाजीनगरहून लोणावळा लोकल पकडली. लोकल चिंचवडला आली. लोकल चिंचवडहून ज्यावेळी निघाली त्यावेळी माझ्या पुढच्या डब्यातील एका गेट वीराने एका मुलीचा स्क्राफ ओढला. ती फारच लोकलच्या जवळ असल्याने त्याचा सहज हात पोहचला होता. गाडीने वेग घेतला. तिचा स्कार्फ बरोबर तिची ओढणीसुद्धा ओढली गेली. ते बघून माझ खर तर काही संबंध नव्हता. पण तरीदेखील तिळपापड झाला. दोन सेकंदासाठी त्या गेट बहाद्दराला शिवी द्यावी अस मनात आल. माझ्या डब्यातील एक जण म्हणाला आजकाल मुल फार मुलींची छेड काढत असतात. खर तर अशी मुलींची छेडाछेडी मी मुंबईला असताना देखील कधी बघितली नव्हती. पुण्यात मुलींना शिट्ट्या मारतात हे बघितलं होत. पण अस अंगावर हात टाकण, पहील्यांदीच बघितलं. मी तो कोण आहे हे बघायचा प्रयत्न करीत होतो. पण तो कोण हे दिसतच नव्हत. माझ्या डब्यातील थंड प्रतिक्रिया बघून माझा खूपच त्रागा होत होता. विचार केला कि पुढच्या स्टेशनाला त्याला गाठायचं. (more…)
दंगल कोणाची हिंदूची की मुसलमानाची?
मागील दोन दिवसांपासून एक बातमी रोज वर्तमानपत्रात येत आहे. बातमी आहे मिरजेतील बिघडलेल्या वातावरणाबद्दल. सगळ्याच वर्तमानपत्रात अस लिहाल जातं की दंगल हिंदू- मुस्लीम मध्ये होत आहे. आता दंगल नेहमीच कुठे ना कुठे घडत असले. आणि अशा गणेश उत्सवात दंगली हा प्रकार काही नवीन नाही. आणि मला त्याबद्दल काही बोलायचे सुद्धा नाही. कारण मी काही आता मिरजेत नेमके काय घडते आहे हे काही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली नाही. पण वर्तमानपत्रातील नेहमी अशा प्रकारच्या बातम्यांच्या वेळी एक शब्द नेहमी वापरला जातो. आणि तो म्हणजे ‘हिंदू-मुस्लीम’. (more…)
साडेसाती
माझे आई आणि वडील भविष्य, ज्योतिष शास्त्राला मानतात. आज रात्री माझी आई म्हणाली की तुझी आजपासून साडेसाती संपली. आता त्यांच्या मते मागच्या काही वर्षांपासून ज्या अडचणी मला येत होत्या त्याचे मूळ कारण साडेसाती हे होते. मध्यंतरीपासून मला आर्थिक अडचणी अनेक येत आहेत. म्हणजे मला माझी मिळकतीपेक्षा अधिक खर्च होत आहे. आता मी फालतू खर्च काहीच करत नाही. तरीदेखील असे होते. आता साडेसाती किंवा भविष्य यामुळे मला अशा अडचणी येत आहेत अस मी मानत नाही. घर घेतल्यापासून माझ्या मिळकतीतील एक मोठा हिस्सा लोनच्या हप्त्यात जातो. दुसर म्हणजे मी करत असलेली इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक. आणि हो मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सरकार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे खर्चच खर्च होत आहे. त्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतात. (more…)
गणपती विसर्जन मिरवणूक का स्वतःची करमणूक?
काल रात्री आमच्या येथील विजेचा ट्रास्न्फार्मार जळाल्याने आज रात्रीपासून आज सकाळ पर्यंत वीज नव्हती. आता सकाळी मी झोपलो असल्याने काही मला जाणवले नाही. रात्री मी ट्रास्न्फार्मार जळल्याचा आवाज एकाला होता. आज अनंतचतुर्दशी असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे मी सकाळी उशिरापर्यंत झोपलो होतो. पण १०- १०:३० च्या आसपास मला मोठ्याने लावलेल्या गाण्याच्या आवाजाने जाग आली. उठून पाहतो तर आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची निघण्याची तयारी बहुतेक चालू होती. आवाज एवढा मोठा की, शेजारच्याच्या कानात ओरडून सांगितले तरी एकू जाणार नाही एवढा. बर आज शेवटचा दिवस ना, म्हणून मी म्हटलं की एखादा दिवस वाजवलं तर काय बिघडतंय. म्हणून मी घरात येऊन पुन्हा झोपलो. (more…)
पुन्हा कोणासाठी नोकरी शोधायची नाही
मध्यंतरी ती च्या लहान बहिणीने मला तिच्यासाठी अर्धवेळ(पार्टटाइम) नोकरी शोधायला सांगितली. खर तर मी आजकाल माझ्या स्वत:साठी नोकरी शोधात नाही. तर इतरांसाठी काय शोधणार? आणि मुख्य म्हणजे मला हे मनस्वी पटत देखील नाही. पण म्हटलं तीची बहिण आहे. तर चला बघुयात. याआधी मी कधीच कोणासाठी माझ्या बॉसशी बोललो नाही. काल कशीबशी हिम्मत करून त्याला विचारले कि, तुमच्या पाहण्यात कोणती अकौंटची पोझिशन आहे का? असेल तर मला नक्की कळवा. माझी एक मैत्रीण आहे तिला हवी आहे. आता आमची कंपनी हि आयटी कंपनी त्यामुळे तिला हवी तशी पार्टटाइम आमच्या कंपनीत मिळणे अवघड. (more…)
नगरचे रस्त्यातले खड्डे
परवा मी आमच्या गणेश मंदिरातील दर वर्षी होणारा भंडारासाठी गावी गेलो. माझ गाव वांबोरी. वांबोरी नगर पासून पुढे २५ किलोमीटर. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवाजीनगर हुन नगर बस पकडली. त्याच बस मध्ये माझा एक जुना मित्र भेटला. त्याच्या म्हणण्यावरून मी रांजणगावचे तिकीट काढले. तो म्हणाला कि रांजणगावपासून आपण दुचाकीवरून जावू. खर तर मला निघायला खूप उशीर झाला होता. म्हटलं कि दुचाकीवरून लवकर पोहचू. म्हणून मी त्याला हो म्हटलं. पण नशिबात काही लवकर पोहचण नव्हत. त्याचा मित्र भेटला. मग त्याच्या पुढे आम्ही निघून नगरला पोहचेपर्यंत दोन वाजून गेले. (more…)
पीएमपीएल म्हणजे जलद आणि उद्धट सेवा
आज कंपनीतून निघायला उशीर झाला. माझ्या मित्राने मला बोपोडी पर्यंत त्याच्या दुचाकीवर सोडले. बोपोडीच्या बस स्थानकावरून (स्थानक वगैरे काही नाही. पण जिथे बस थांबतात त्यालाच इथे स्थानक म्हणतात) निगडीची बस पकडली. बसायला जागा नव्हतीच. मग मी पार पुढे, बस चालकाच्या मागे असणाऱ्या जाळीला धरून उभा राहिलो. नेहमी प्रमाणे वाहक म्हणजे कंडक्टर काही लवकर तिकीट मागायला आला नाही. ड्रायव्हर पण काही विचारू नका. धूम ३ चा वगैरे कोणी विचार करत असेल तर त्याचा विचार नक्की व्हावा. काय घाई म्हणावी त्याची, वा अगदी समोरील गाड्या एका मागून एक मागे जात होत्या. अस वाटत होत कि संगणकावर कुठला तरी रेसिंग चा खेळ खेळत आहोत. दापोडी, फुगेवाडी कधी गेल कळलंच नाही. वल्लभनगरच्या थोडे पुढे असताना, एका स्कूटीवर दोन स्त्रिया चालल्या होत्या. आमची बस मागून आली. बस आणि ती स्कुटी यातलं अंतर फारच कमी होत. त्यात एका ठिकाणी त्या स्त्रीने ब्रेक मारला. झाल ह्या ड्रायव्हारने कशी बशी वेगात असलेली बस सावरली. पण शांत बसेल तो ड्रायव्हार कसला. त्याने बस तिच्या पुढे नेवून तिला शिव्यांची लाखोली वाहिली. (more…)
बोलण आणि करणं
बोलण आणि करणं! आज सकाळी नऊची लोकल हुकली. खर तर चूक माझीच होती. मी उठलो होतो, ७:४५ ला पण पुन्हा झोपलो. आणि मग जाग आली ८:२० ला. मागच्या दोन – तीन दिवसांपासून रोजच देवपूजा आणि अथर्वशीर्ष होताच नाही आहे. आणि माझा रोज रात्री झोपताना मी हाच विचार करतो कि उद्या सकाळी लवकर उठायचं. पण होताच नाही उठण. खरच आपण जे ठरवतो आणि करतो यात किती फरक पडत असतो. याचा असा कधी मी विचारच केला नव्हता. माझी आई नेहमी म्हणत असते कि ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’. आंपण जे बोलतो आणि ठरवतो यावर आपण चालव असा आईचा दंडक. वडील कोणतीही गोष्ट आधी बोलत नाहीत करून दाखवतात. आणि उरलो मी जो फ़क़्त ठरवतो करत नाही अस नाही पण ते कधी कधी. (more…)