आज दुपारी रायपूरमध्ये मराठी मुलांना मारहाणीची बातमी वाचली. वाचून डोकच फिरलं. थोडा वेळ काय करू आणि काय नको अस झाल होत. माझ्या काही मित्रांना ती बातमी दाखवली. त्याचं पण डोक सरकल असाव. त्यावर ते मला म्हणाले की ‘आता कुठे आहे राज ठाकरे?’. त्यांना म्हणालो की ‘राज ठाकरेंनी काय ठेका घेतला आहे का मराठी माणसाचा?’ काही झाल की ‘कुठे आहे राज ठाकरे?’. मग त्यांना म्हणालो की ‘आता का काही बोलत नाहीत?, ठाण्यात परप्रांतीयांना ठोकलं तर, राज गुंड. आणि ते परप्रांतीय कसे पापभिरू ह्याचे प्रवचन ऐकवलं होत. आता ते चुकीचे होते तर आता हे चुकीच नाही का?’ मग कुठे काही म्हणतात. (more…)
आता म्हणाले खोट बोला
आज दुपारी परत त्या लोनवाल्याचा फोन. म्हणाला कि पैसे मी माझ्या हेडकडे दिले आहेत. तुम्ही आज येवून घेवून जा. मला एकूण आश्चर्यच झाले. काल परवा पर्यंत, ह्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात देतो म्हणणारा आज अगदी पैसे घेवून जा म्हणतोय. मी त्याला ठीक आहे अस म्हणालो. नंतर संध्याकाळी त्याच्या हेडला फोन केला तर तो मला म्हणाला कि तुमचे पैसे माझ्याकडे त्याने दिलेले आहेत. तुम्ही कधीही येवून घेवून जावू शकता. वाटल तर मी तुमच्या घरी येवून पैसे देतो. पण तुम्ही मला एक वायदा करा कि कस्टमर केअर कडून जर फोन आला तर त्यांना सांगा कि ‘मला त्याचवेळी पैसे त्या लोनवाल्याने घरी येवून दिले होते. पण त्यावेळी मी घरी नसल्याने त्याने ते पैसे माझ्या घरच्यांकडे दिले. मला हे माहित नव्हते. घरी फोन करून विचारल्यावर मला समजले’. नाही तर त्याची नोकरी जाईल. मी तसा मुख्यालयात मेल केला आहे. कि तुम्हाला माहित नसल्याने अस घडल. हे सगळ ऐकून काय बोलाव हेच कळल नाही. (more…)
असे परप्रांतीय
माझ्या राशीला हे का लागले आहेत ते काही कळत नाही. आज सकाळी मी माझ्या वरिष्ठाला (सिनिअर) ला एका कामासाठी एक साधा फोन्ट मागितला. तर साहेबांनी तो दिला नाही. मला काही त्याचे फारसे वाटले नाही. पण शंका आली. मागच्या शनिवारी मी ज्या फायनान्स कंपनी मार्फत लोन घेतले होते. त्या कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन लावला होता. कारण असे कि, ज्यावेळी मी ते लोन घेतले त्याच्या पहिल्या हप्त्याच्या वेळी इसीयस झालेले नव्हते. म्हणून मी ज्याचाकडून लोन घेतले त्याला हप्त्याची रोख रक्कम दिली आणि हप्ता भरण्यास सांगितले. नंतर इसीयस झाल्यावर पुन्हा पैसे गेले. हि बाब त्या लोनवाल्याला सांगितल्यावर तो मला रिफंड करावे लागेल. आणि त्याला एक महिना लागेल असे म्हटला होता. (more…)
गणेश उत्सव आणि प्रदूषण
दरवर्षी गणेश उत्सवात वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने या विषयावरून भर भरून लेख येतात. कोण कुठली पर्यावरणवादी नावाची जमात जणू काही गणपती येतो म्हणजे सगळ विश्वात जणू हाहाकार माजतो अस काहीस मत मांडतात. न्यूजच्यानल वाले कोणाला तरी पकडून आणतात. आणि तो मग जणू काही तरी वाईट घडत आहे, अस काहीस भासवतो. आजही तेच चालू होते रटाळ. काय कराव हे जणू त्यांनाच माहित आणि आम्ही जणू आत्ताच जन्माला आलो आहोत. हि गोष्ट त्या वेळची आहे ज्यावेळी मी नवीनच संगणकाचा कोर्ससाठी नगरला जात होतो. माझे काही मित्र वर्तमानपत्रात मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्यांच्या आग्रहास्तव मी ‘पत्रकारिता’ नावाच्या एका सहा महिन्याच्या कोर्स ला सहभागी झालो. (more…)
गणपतीची वर्गणी
ज सकाळी सकाळी समोरच्या इमारतीतील छोटी छोटी मुले गणपतीची वर्गणी मागायला आली होती. नंतर संध्याकाळी आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची मुले वर्गणी मागायला आली. दोघांनाही वर्गणी दिली. वर्गणी आणि माझे फार जुने नाते आहे. मराठी शाळेत शिकत असताना नेहमी वर्षातून एकदा सैनिकी फंड साठी एक रुपयाचे ते स्टीकर घ्यायचो. आणि इतरांप्रमाणे ते मी माझ्या कंपास पेटीला लावायचो. माध्यमिक शाळेत असताना वर्गात देखील आम्ही गणपती बसवायचो. त्यावेळी देखील आम्ही वर्गणी गोळा करायचो. (more…)
म्हणे आम्ही मुली
मी ज्या कंपनीत काम करतो तिथे माझ्या सोबत काही मुली(?) काम करतात. आता त्या म्हणतात कि आम्ही मुली आहोत. स्त्रिया आणि मुली यातला फरक काय? या प्रश्नाचे उत्तर देणे अगदी सोपे आहे. साधारणत आपल्या समाजात लग्न झाले कि मुलीला स्त्री मानतात. आता काहीना हे मान्य नसेल. आणि मला सुद्धा मान्य नाही. जी मुलगीला मुले झालेले आहेत, तिला तर आपण GIRL किंवा मुलगी कस मानायचं? हाच प्रश्न मला पडलेला आहे. माझ्या कंपनीत ह्या नियमाने एक दोन सापडतील. पण कंपनीतील उरलेल्या सगळ्या स्वत: ला मुली म्हणवून घेतात. (more…)
पुणे पॅटर्नचा नाहीतरी उपयोग काय होता?
राज्यातील समीकरणे बाजूला ठेवून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी सत्ता हेतूने फेबुर्वारी २००७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ‘पुणे पॅटर्न’ तयार केला. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात असलेले कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिले. खर तर दादाना भाईना महानगरपालिकेतून बाहेर काढायचे होते. म्हणून हा सगळा खटाटोप. काल उद्धव ठाकरे यांनी तो मोडण्याचा निर्णय मुंबईत जाहीर केला. तस पाहायला गेल तर ह्या पुणे पॅटर्न चा फायदा काहीच नव्हता. जो काही होता तो केवळ शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला होता. आणि नुकसान जे काही झाले ते कॉंग्रेसला झाले. बाकी फेबुर्वारी २००७ पासून ते आता पर्यंत पुण्यात काही नवीन घडले नाही. जे काही थोडे फार झाले ते राष्ट्रीय स्पर्धेपुरती नाटके झाली. भिंती, रस्ते, बस रंगवल्या म्हणजे काही विकास झाला अस मला तरी वाटत नाही. एक गोष्ट मात्र नक्की. इथले सगळे पक्ष कितीही विकासाच्या गप्पा मारू दे. पण सगळ्यांना सत्ताच हवी आहे. आणि विकास नावाचा कोणी इथे आला नव्हता. (more…)
पुण्यात काहीही घडू शकते
पुण्यात काल दोन बांगलादेशींना अटक झाली. दोघेही आठवी नापास. एकाच नाव अब्दुल हक आणि दुसरा मामून रैफ. घुसखोरी करून ते प्रथम मुंबईत आले. मामून रैफ १९९५ तर अब्दुल २००३ मध्ये भारतात आले. पुण्यात एका मोठ्या कंपनीत अब्दुल हक प्रोजेक्ट इन्चार्ज, त्याचा पगार एक लाख वीस हजार. तो देखील महिन्याचा. आणि मामून रैफ ला वीस हजार महिन्याचा पगार. त्यांनी बरेच पैसे कमावले. इथे लग्नही झाली. त्यातला अब्दुला वानवडीला तर मामून रैफ हिंजवडीला राहायला होता. त्यांनी शाळा सोडल्याचा खोटा दाखल्यापासून ते खोट्या पासपोर्ट पर्यंत सगळ जमवलं. आता पकडले गेले. पण पुण्यात काहीही घडू शकते. (more…)
भाषण का प्रवचन?
१५ ऑगस्टला आपल्या पंतप्रधानांनी दुखी चेहऱ्याने पण जोरात भाषण केले. जाऊ द्या काय बोले त्यावर आपण नंतर बोलू. त्यांनी भाषण हिंदीत केले. पण लिहून आणले गुरुमुखीत. गुरुमुखी हि पंतप्रधानांची मातृभाषा. वाचायला सोपे जावे म्हणून काय कि काय म्हणून आणले असावे. सोनियाजी पण भाषण हिंदीतूनच करतात पण, नेहमी भाषण इटलीत लिहून आणतात. कदाचित त्यानाही वाचायला सोपे जावे म्हणून असेल. आधी मी लहान असताना माझ्या वडिलांच्या म्हणण्यावरून वकृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. कधी नंबर आला नाही. परंतु भाग घ्यायचो. वडील भाषण पूर्ण पाठ करून घ्यायचे. आणि मग मी तिथे जावून बोलून टाकायचो. (more…)
घरातील अतिरेकी
आज सुटी असल्याने घराची साफसफाई केली. मागच्या आठवडा भरात मुंग्यांनी नुसता उच्छाद मांडून ठेवला होता. कुठलाही कोपरा बघा मातीच माती. आणि बाथरूम मध्ये तर रात्री झुरळांचे राज्य. तरी बर उंदीर नावाच्या दहशद्वाद्याला आमच घर अजून माहिती नाही. नाही तर काय झाले असते देव जाणे. आज संध्याकाळी घरभर भिंतीच्या बाजूने ती मिळते ना लक्षमणरेषा ती आणून आखून ठेवली. तासाभरानी बघतो तर अनेक मुंग्या मेलेल्या. आणि पाच एक झुरळ. चला हा आठवडा तरी चिंता कमी होईल. घर पुसून काढण्याचा प्लान आखला होता. पण बाथरूम आणि किचन मधेच बराच वेळ गेल्याने, शेवटी फारशी पुसून काढण्याचा प्लान रद्द करावा लागला. (more…)