आज संध्याकाळी सह्याद्री वाहिनीवर ‘वीर सावरकर’ हा चित्रपट पहिला. वा! खरच खुप छान चित्रपट. असे चित्रपट दाखवले तर का कोण लोक नाव ठेवतील सह्याद्रिला. असो, सावरकरना स्वातंत्र्यवीर असे का म्हणतात ते आज कळले. खरच खुप त्रास सहन केला त्यानी. त्यानी केलेली हिंदू या शब्दाची व्याख्या अगदी योग्य आहे. आपण उगाचच अहिंसा आणि सर्वधर्म समभावाचे गोडवे गातो. आता कालचा घ्या ना. काल १४ अगस्त, पूणेस्टेशन मधे एक पीर आहे. कोण संत आहे ते काही माहिती नाही. परंतु आहे. काल मी बघितले की पिराच्या बाजूला एक मोठा मंडप टाकला होता. आणि काही तरी न समजेल अशी गाणी लागलेली होती. बर त्यात काही मला चुकीच वाटल नाही. परंतु तिथे एक हिरवा रंग असलेला आणि त्यावर चांदनी अशा झेंडा फडकत होता. चोकोन एवजी आयताकृति केला तर पाक चा शोभेल असा. (more…)
राष्ट्रपति बाई काय म्हणाल्या?
आज सह्याद्री वाहिनी वर राष्ट्रपति बाई चे भाषांतर केलेले स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला केलेले भाषण ऐकायला भेटले. खर तर ते सगळ भाषण मी जसच्या तस ‘हेमंतमत‘ मधे टाकल आहे. आपल्या देशाच्या पहिल्या नागरिक काय म्हणाल्या याचा संक्षिप्त स्वरूपात सांगतो. ताई म्हणाल्या ‘देशात हवामान सध्याला चांगले नसल्याने आणि स्वाइन फ्लू ची साथ आली असल्याने नागरिकांनी सरकारला मदत करायला हवी.’ ‘प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये प्रत्येकाने शिस्तिचे पालन करायला हवे, हीच देशाची संपत्ति आहे.’ ‘देश विकसित होतो आहे. सरकारच्या धोराणाने आपण केलेल्या सतत परिश्रमाने आपला देश जागतिक स्तरावर आपले स्थान निशित करू शकला आहे.’ (more…)
दहीहंडी महत्वाची नाही
पुण्यात नेहमी जोरदार साजरी होणारी दहीहंडी, या वेळी मात्र स्वाइन फ्लू आल्याने ती रद्द करण्यात आली आहे. ही खरच आनंदाची बाब आहे. दोन दिवस पूर्वी येरवडा पुलाच्या बाजूला दहीहंडी कार्यक्रमाची मोठी मोठी पोस्टर लागली होती. एका पोस्टर वर तर चक्क ५ लाखाचे बक्षिस देण्यात आले होते. परंतु आज सकाळ पासून विविध मंडळ यांचे दहीहंडी रद्द अशी पोस्टर बघून बरे वाटले. दहीहंडी हा आपण खर तर मोठ्या आनंदाने साजरा करणारा उत्सव. जगात कुठेही अस घडत नाही. माणसांचे थरावर थर. आणि बघता बघता एक उंचच्या उंच असा मनोरा बनतो. एक चिमुरडा या सर्वांच्या उंच थरावर पोहचतो आणि उंच बांधलेली दह्याची हंडी फोडतो. हे सगळ अगदी उत्साह वर्धक आणि रोमहर्षक पद्धतीने होत. कधी कधी थर कमी असेल तर हंडी फोड़ता येत नाही. परंतु त्याही वेळी उत्साह तेवढाच असतो. हे सगळे गोविंदा त्याही वेळी नाचतच असतात. आणि पाहणारे आनंद लूटत असतात. (more…)
मानमोड्या नव्हे झोपमोड्या
आजचा दिवस फारच क्लेशदायक गेला. म्हणजे करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, त्यातली गत. कंपनीतुन घरी आलो. आणि थोडा वेळ होतो ते लाइट गेली. पुणेरी भाषेत दिवे गेले. मी ज्या भागात राहतो त्या तिथे अस नेहमी घडते. भागाच नाव बिजलीनगर आहे. नावातच केवळ ‘बिजली’ आहे. प्रत्यक्षात अनेक वेळा वीज नसते. वीज नसल्याने मला काही काम करता येणे शक्य नव्हते म्हणुन मी बाहेर माझ्या नव्या शेजर्याशी गप्पा मारत बसलो होतो. तो आहे जळगावचा . जळगावाकरांची मराठी म्हणजे रसाळ, एक लय आणि लाघव. स्वाइन फ्लू वरुन बोलता बोलता विषय निघाला मान मानमोड्याचा. (more…)
पुण्यात स्वाइन फ्लू पेक्षाही घातक मास्क फ्लू
आज सकाळी ९ ची लोकल हुकली. बसने गेलो. कंपनीत आल्या आल्या माझ्या काही सहकारी मैत्रिणी मला विचारू लागल्या की, तू रोज लोकल ने येतो ना? मग मास्क घेतला का? मी म्हटल की लोकलने येतो परंतु मास्क घेतला नाही. झाल त्याना जणू काही भुत बघितल्या सारखेच माझ्याकडे बघू लागल्या. मला म्हणाल्या की, तू घे नाही तर आम्हालाही होइल. एकून डोकाच सरकल. मी त्याना सरळ सांगितल की अस वाटत असेल तर माझ्यापासून दूर रहात जा. बर संगणक चालू करतो तोच माझा एक दोस्तने जी टॉक वर मला तोच प्रश्न की मास्क घेतल का? आधीच या प्रश्नाने डोक सरकवल होत त्यात हा. त्याला म्हटल की नाही घेतला, आणि घेइल की नाही त्याचा अजुन विचार केलेला नाही. कदाचित त्याला समजल असाव. तो फक्त अस म्हणाला की, घेतल नाही तरी काही बिघडत नाही परंतु काळजी घे. (more…)
मास्कचे शहर पूणे
आज सकाळी आवरून निघायला उशीर झाला. त्यात लोकल जाते की काय याच टेंशन. घराला कुलुप लावून बाहेर निघालो तर जिकडे तिकडे सगळे हिरवे पांढरे मास्क घालून चाललेले लोक. आधी छोटी मुले त्यांच्या आई वडिलांबरोबर पाठीवर दप्तर, आणि त्यांच्या हातात हात. अशी आरडा ओरडा करत चाललेली नेहमी बघत आलेलो. बघून खुप छान वाटायचे. त्यांचे निरागस चहरे आणि कर्ण मधुर आवाज. सकाळ अगदी छान होवून जायची. पण आज त्याचे चेहरे मास्क मधे. आणि जणू काही कोणती मोठी दुर्घटना घडलेली अशी भयाण शांतता. कसा बसा मी स्टेशन वर आलो. पाहतो तर काय, सगळेच मास्क घातलेले. (more…)
संजय दत्त खलनायक की मुन्नाभाई?
आज दस का दम नावाचा एक कार्यक्रम माझ्या पहाण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. आज या कार्यक्रमात संजय दत्त आणि जैकी श्रोफला आमंत्रित करण्यात आले होते. मी काही हा कार्यक्रम नेहमी पाहतो असे नाही. पण आज सुटी असल्याने सहजच पहिला. कार्यक्रम चालू असताना संजय दत्तने काही वाक्य त्याच्या जीवना विषयी बोलली. “मैंने बन्दूक रखी थी, तो क्या हुआ? अपने घरवालो की इफाजत के लिए रखी थी| तो क्या गुनाह है?” “मुन्नाभाई बनानेका”. मग तो त्याच्या एका जुन्या चित्रपटातील ‘खलनायक’ या गाण्यावर नाचाला. त्याचे बोलणे एकून त्याच्या विषयीचा जो काही थोडा फार आदर होता तो पण संपला. (more…)
लव आजकाल
रक्षाबंधनच्या दिवशी माझी एक जुनी मैत्रिण मला राखी बांधान्यासाठी मला तिच्या कंपनीत यायला सांगितले. मी तीला सकाळी ९:१५ येतो म्हणुन सांगितले. ती ज्या कंपनीत काम करते ती कंपनी पूणे स्टेशन आयनोक्सच्या बाजूला आहे. मी आपला ९:१० लाच पोहोचलो. तीला फ़ोन केला तर ती म्हणाली की, १० मिनिटात येते. मग तो पर्यंत करायचे काय म्हणुन आयनोक्स गेट च्या बाजूला उभा राहिलो. लव आजकाल लागलेला होता. करायचे काय म्हणुन आयनोक्सकड़े बघायचो कधी तिथे जाणारे मुले मुलींकडे बघायचो. बरेच जण येत होते. सकाळच्या शो ला पण गर्दी असते हे मला त्या दिवशी बघून कळले. तिथे एका मुलगा सारख्या फेर्या मारत होता. कोणी तरी यायचे होते वाटत. जसा जसा वेळ जात होता तसा त्याचा पारा चढत होता. (more…)
पुण्यातील स्वाइन फ्लू
स्वाइन फ्लू ने पूणेकरांची झोपच उडवली आहे. सिंबायोसिस कॉलेजच्या सेनापती बापट रोड कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या एका विद्याथिर्नीला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचा अहवाल आल्यामुळे हा कॅम्पस १३ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रिय स्वाश स्पर्धा पुढे ढकलंन्यात आली आहे. अनेक शाळा पुढे हाच प्रश्न उभा ठाकला आहे. मास्क घेउन कितपत फायदा होइल याची काही कल्पना नाही. एकुणच परिस्थिती काही चांगली नाही. कोणी नुसता शिंकला तरी लोक त्याच्याकडे भीतीने बघतात. रस्त्यावरून चालताना मास्क घातलेले लोक बघितले की जैन लोकांची फेरी निघाली आहे की काय अशी शंका येते. (more…)
‘ती’ ची आई
काय करू ती चा विषय डोक्यातून जाताच नाही. आज मी रक्षाबंधन निमित्ताने संध्याकाळी माझ्या लहान बहिणीकड़े गेलो होतो. काकाने आज जेवायलाच बोलावले होते. जेवण खुपच छान होते. जेवण करत असताना मी न राहून काकाला ती च्या बद्दल विचारले, की ती कशी आहे. आली होती का घरी? काका म्हणाला मला तीची आई म्हणाली की ती तुझ्या तिकडेच (मी जिथे राहतो त्या भागात) रहाते. आणि तीला एकदा भेटून या असे त्यानी सांगितले. मग तू भेटलास अस विचारल्यावर तो म्हणाला जाइल. काकाच्या एकुणच बोलण्यावरुन फारच दुखी किंवा काही वाटते अस काही वाटल नाही. (more…)