२ ऑगस्टला पुण्यात स्वाभिमान संघटनेच्या ३१ शाखांचे उद्घाटन झाले. मी कुठे कधी उद्घाटन झाले हे मला कळले नाही. पण ठिकठिकाणी लावलेली भित्तिपत्रके बघून समजले. आज माझा बोपोडी मधील मित्र सांगत होता की आमच्या इथे नितेश राणे आला होता. तो म्हणाला त्याचा आवाज, बोलण्याची पद्धत अगदी नारायण राणे सारखी आहे. नितेश राणे काय म्हटला अस मी माझ्या मित्राला विचारल तर तो बोलला की ‘तुम्ही कोठेही आणि काहीही करा तुमच्यावर केस होणार नाही’. (more…)
रक्षा बंधनाचा धोका…
रक्षा बंधनाच्या दिवशी माझी नेहमी महाविद्यालयाला बुट्टी. घरी सांगायचो की आज सुटी आहे. खर तर मला कोणीच मैत्रिण नव्हती तरी देखील मला भीती वाटायची. की कोणी आणून राखी बांधली तर काय?. मला ही भीती शाळेत असल्या पासून निर्माण झाली. शाळेत मुली मुलाना राखी बांधयाच्या. मग असा काय नियम नव्हता पण राखी बांधली की १० रुपये द्यावे लागायचे. आई ने कधी एक रूपया दिला नाही. मग दहा रुपये सोडाच. नंतर नंतर या मुली देखील हुशार झाल्या. एक एक रुपयाच्या ५-१० राख्या घेउन यायच्या. आणि किमान १००/- घेउन जायच्या. बर राखी नको म्हटल की, त्या मनाला वाटेल तो अर्थ काढायच्या. किंवा एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला राखी बांधली नाही तरी देखील असाच काही अर्थ इतर लावायचे. (more…)
मुलीच बलवान
आज सकाळी माझ्या एका मित्राचा साखरपुडा होता. कार्यक्रम संपल्यावर मी शिवाजी नगर मधून ७ ची लोकल पकडली. बर, लोकल वेळेत आली. रेलवेचे आभार मानायला हवेत. लोकल खडकीला येताना मी एका मुलीला रेलवे स्टेशन वर धावत येताना बघितले. ती एवढी वेगात धावत होती की ती खडकी स्टेशन वर पोहचेपर्यंत लोकल दापोडीला पोहचेल. बघून हसू आले. लोकल खडकी स्टेशन वर आली . साधारणत: लोकल प्रत्येक स्टेशन वर २० सेकंड थांबते. १ मिनिट झाला लोकल निघेच ना. मी सिग्नल कड़े बघितल तिथे काही लाल दिवा नव्हता. काय झाल म्हणुन मी उतरून पाहतो तर काय त्या बाई साहेब मागाहून येत होत्या. आणि आमचा मोटारमन तिला बघत होता. बाई साहेब लोकल मधे पाउल टाकताच लोकलचा हार्न वाजला. जणू काही सलामीच दिली. लोकल निघाली. (more…)
पुण्यात नातेवाइकाकडे भोजनाचा योग आला तर
जर तुम्ही पुण्याला शिक्षणासाठी, नोकरीच्या शोधासाठी किंवा विशेष करून नातेवाइकाना भेटायला येण्याचा विचार करत असाल तर येण्या आधी काही गोष्टींचे ध्यान ठेवा. विशेषत हा अनुभव नातेवाइकांकडे येण्याची दाट शक्यता आहे. शाळेत असताना मी नेहमी दिवाळीच्या सुटीत, आणि कधी कधी में महिन्याच्या सुटीत माझ्या पुण्यातील काकाकडे मी यायचो. त्यावेळी कधी काही समजले नाही. पण आता कळते. पूणेकरांची भाषा ही साखरेपेक्षा गोड. त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे स्वत:च्या पराभवाला आमंत्रण देणे असा असतो. पुण्याला खुप मोठा इतिहास आहे, या माधुर्यपूर्ण भाषेचा. मी लहान असताना आई सोबत नेहमी माझ्या पुण्यातील मावशीकडे जायचो. पहिला दिवस मजेत जायचा. मावशी, काका, दादा आणि ताई खुप लाड करायचे. मग काय दुपारी मावशी आमरस, रात्री काका आइसक्रीम, दादा माझ्या सोबत दंगामस्ती करायचा. (more…)
ऑस्करचा झाला धोबी पछाड़
मध्यंतरी एक मराठी चित्रपट ‘एक डाव धोबी पछाड़’ आला होता. अशोक सराफ, त्याच्या बद्दल काय बोलावे? मराठी अभिनेत्यांचा राजा. चित्रपट हिट झाला. मी तो पहिला आहे. तुम्हीही बघितला असेल. मस्त चित्रपट. काल सहजच टाइमपास करावा म्हणुन टीवी पाहत बसलो. बिंधास मुव्ही वर एक खुप जुना चित्रपट लागला होता. चित्रपटाचे नाव होते ऑस्कर. बघतो तर काय यात देखील कथा आणि धोबी पछाड़ ची कथा सारखीच. त्यातला नायक देखील एक मोठा गुंड असतो. त्याला एक मुलगी असते. असो चित्रपट तर तुम्ही धोबी पछाड़ बघितला आहे ना. अगदी जसच्या तस. (more…)
राज ठाकरेंचे आंदोलन आणि मी
ही गोष्ट २००८ मधील आहे. त्या वेळी मी फोर्ट मधील (मुंबई) एका छोट्याशा सॉफ्टवेर कंपनीत कामाला होतो. आणि रहायला बोरिवलित. बोरीवली ते चर्चगेट असा माझा दररोजचा प्रवास. मुंबईचे आकर्षण कोणाला नाही? कंपनी तुन सुटल्यावर घरी जाण्याची घाई कधीच नसायची. लवकर घरी जायचे असे पण काही नसायचे. मुख्य म्हणजे मी रहायला मावशीच्या जुन्या घरात असल्याने तिथे मी एकटाच. म्हणतात ना ‘एकटा जीव सदाशिव’ त्यातली गत होती. कंपनीतुन मला निघायला ७ वाजायचे. आणि बोरिवलित पोहचयाला ८- ८:३० व्हायचे. लोकलला कायम गर्दी. पण कधीही त्याचा तिटकारा वाटला नाही. (more…)
ए टी म् म्हणजे एनी टाइम मिस्टेक
पुण्यात ए टी म् चा अर्थ एनी टाइम मिस्टेक असाच होतो. सरासरी १० पैकी ८ ए टी म् मधे काहीना काही बिघाड असतोच. कधी दरवाजा ख़राब, कधी पैसेच येत नाही. कधी कार्डच एक्सेप्ट होत नाही. तर कधी आत गेलेले कार्ड बाहेरच येत नाही. पूणे रेलवे स्टेशन ला ६ ए टी म् आणि ८ मशीन आहेत. या महिन्याच्या सुरवातीला सगळ्या ए टी म् मधे एकाच वेळी बिघाड झाला. प्रत्येकात नव नविन बिघाड. यूनियन बैंकच ए टी म् सगळ घ्यायच पण पैसे येत नव्हते. पंजाब नेशनल बैंकच ए टी म् दरवाजा तर कायम बिघडलेला असतो. कार्ड चुकीचे दाखवायचे. त्याच्या बाजूचे स्टेट बैंकच ए टी म् सगळी क्रिया करायचे आणि पैसे येत नसायचे, पण आपल्या खात्यातून आपण टाकलेली रक्कम वजा व्हायची. (more…)
इडियट
इडियट हा शब्द ‘सॉरी’ प्रमाणेच भारतात आला. नाही मी तुम्हाला इतिहास सांगणार नाही आहे. आज दुपारी कंपनीत नेहमी प्रमाणे मी माझ्या सहकार्य बरोबर जेवायला बसलो. आमच्या कंपनीत माझा एक मित्र आहे, म्हणायला तो ऑफिस बॉय आहे. पण त्याला मी कधीच तस समजल नाही. आणि तो पण कधी तस वागला नाही. त्याचे बोलणे पण तस नाही. नेहमी जेवताना तो त्याच्या डबा तो बाकी सगळ्याना आग्रहाने देतो. त्याच्या मानाने तो तो फारच कमी जेवतो. (more…)
ती
कशी सुरवात करू हेच कळत नाही आहे. काल मी संध्याकाळी माझ्या काकाकडे गेलो होतो. काही विशेष नाही सहजच. पण गेल्यावर ज्या घटना घडल्या, ते एकुणच अजुन देखील डोक जड होत आहे. मी मागच्या एक वर्षभर माझ्या काकाकडे रहायला होतो. त्या आधी देखील ६-७ महीने असेल त्या नंतर मुंबई. त्या ६-७ महिन्याचा काल म्हणजे आयुष्याच्या एका मोठ्या बदलाचा काळ. मी नुकताच एका संगणकाचा कोर्स संपवून नोकरीच्या शोधासाठी आलो होतो. (more…)
नियमितपणे अनियमित येणारी पुण्याची लोकल
आजकाल घड्याळ वापरणे रेल्वे खात्याने पूर्णपणे बंद केले आहे की काय अशी शंका यायला लागली आहे. रोज मी ८:२१ ची लोकल पकडतो. पण मला काही कधी मागच्या एका वर्षात अस दिसल नाही की लोकल बरोबर ८:२१ ला आली किंवा निघाली. आजचेच उदहारण घ्या. आज मी संध्याकाळी ७ च्या लोनावाला लोकल साठी पूणे स्टेशनवर ६:४० ला आलो. बघतो तर काय गाड़ी १५ मिनिटे उशिरा येणार. ३५ मिनिटे करायचे काय म्हणुन आज पूणे स्टेशनलाच जेवण करुयात असा बेत आखला. जेवणही झाल. (more…)