नमस्कार :)

नमस्कार, माझ्या या नावाचा ब्लॉग सुरू करताना मला खरच खूप आनंद होत आहे. माझी मते मी यात मी मांडेल. माझे अनुभव मी यात तुमच्याशी हितगुज करेन. या आधी देखील मी काही ब्लॉग बनवले होते. पण आता मी माझ्या नावाने करायचे ठरवले आहे. असो, हा माझा पहिला वाहिला ब्लॉग.

मला अस नेहमी वाटत आलाय की आपण नेहमी काही तरी कराव आणि ते सातत्याने टिकवाव. म्हणजे कोणी मित्र करावा, त्याच्याशी मैत्री कायम राहावी. कोणते काम करावे, ते देखील सातत्याने व्हावे. आणि आनंदाची गोष्ट अशी की मी यात बर्‍याच अंशी सफल झालो आहे.

असो, पुन्हा भेट होईलच!

या पुढे विरोध नाही

या पुढे विरोध नाही. जवळपास एक वर्ष, जी लोक मला एक व्यक्ती म्हणून आणि एक सहकारी म्हणून आवडत नव्हती. त्याच्या बद्दलचा खूप राग कमी झाला. ते केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या प्रेममुळेच. आपल जर खरच कोणावर प्रेम असेल ना तर आपण त्या साठी काहीही करायला तयार असतो. मग आपली भाषा , प्रांत, हे काही आडवे येत नाही. कारण त्यात फक़त प्रेम असते, स्वार्थ नाही. (more…)

नवा दिवस नवा अनुभव

प्रत्येक दिवस काही ना काही शिकवून जातोच. कधी अस होत नाही की काही नव शिकायला भेटल नाही. परवा हे शिकलो की सगळ्या लोकांवर सारखा भरवसा ठेवणे चुकीचे आहे. विशेषत: असे की जे आपण आपल्या मनाच्या अगदी जवळचे असतील. काल, अनपेक्षित घटना घडू शकतात. (more…)

विश्वास आणि अपेक्षा

विश्वास ही अशी गोस्ट आहे की आपण दुसर्‍या व्यक्तीवर किंवा वस्तुवर काही चिंता किंवा विचार न करता त्याकडून आपल्याला हव तस काम होईल अशी केलेली अपेक्षा. खर तर माझा विश्वास सहजासहजी कोणावर बसत नाही. आणि मी अपेक्षा देखील करत नाही. अपेक्षा म्हणजे आपण दुसर्याकडून केलेली इच्छा. या दोनिहि गोस्टी पासून मी स्वतल दूरच ठेवण्याचा प्रयन्त करतो. कारण  रूपालीचा अनुभव घेतल्या नंतर कधी कोणावर विश्वास बसलाच नाही. मी अपेक्षा या करता करत नाही की आपली अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर मग वेदना देखील आपल्यालाच होतात. मग मन बेचैन होत. मनाला समजावं खूप अवघड असत. (more…)

अतिरेकी आणि अतिरेकी

आपल्या देशात अनेक विचार मानणारे लोक आहेत. काहींना एखादी गोष्ट पटते. तर काहींना दुसरी एखादी गोष्ट पटते. उदाहरण द्यायचे झाले. तर आपल्या पंतप्रधानांचे. काहींना मोदी बरोबर वाटतात. तर काहींना चुकीचे. दुर्दैव एवढेच आहे की, दोन्ही बाजूच्या लोकांना आपलेच मत बरोबर आहे. आणि ते दुसऱ्यांनी पटवून घ्यायलाच हवे असा त्यांचा अट्टाहास. थोडक्यात अतिरेकी दोन्हीही बाजूला आहेत. (more…)

गोष्ट एका कमळाबाईची

काय सांगावं ती करुणकथा.  एका आटपाट राज्यात एक शिवाजीराव नावाचा युवक रहात होता. तरुण राजबिंडा आणि रुबाबदार.  कधीही न घाबरणारा. त्याचा ‘आवाज’ सर्वांनाच परिचित असा.  त्याचा विवाह एक नाजूक, कोमल अशा ‘कमळाबाई’शी झाला. कमळाबाई मुळातच सालस, आज्ञाधारी. आता रा.स्व. संघरावांची कन्या म्हटल्यावर काय बात. बाबा कधीही काही म्हणाले की कायमच ‘दक्ष’.

दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरु झाला. अगदी ‘बाबरी’पासून ते ‘गोध्रा’पर्यंत दोघांचे विचार एक. नजर लागावी असा तो संसार. दोघांनी मिळून पुढे जाऊन ‘बाळ’ झाले. अगदी जोशींच्या ‘मनोहर’ सारखे. पुढे दुर्दैवाने ‘नारू’ रोगामुळे पाच वर्षातच दगावले. बाळाच्या

मला काय त्याचे??

संगीत

हे संगीत म्हणजे मनाचा आरसा. जसे पावसात भिजतांना मन उल्हासित होते, अगदी तसेच गाणी ऐकतांना सुद्धा. म्हणजे,

गोष्ट एका फसलेल्या चोरीची

एका आटपाट नगरात एक ‘हेमंत’ नावाचा युवक रहात असतो. तो ज्या इमारतीत वास्तव्य करीत असतो. त्या इमारतीला लागुनच असलेले ‘साई’मंदिरातील पेटी फसलेल्या चोरीची ही गोष्ट. नेहमीप्रमाणे रोज त्या मंदिराच्या

संकल्प स्वतःचे

किती अवघड! म्हणजे ‘संकल्प’ ही गोष्टच अशी आहे की, जी पाळणे जवळपास अशक्यप्राय आहे. शाळेत असतांना शिक्षकांच्या सांगण्यावरून मी अनेकदा अभ्यासाचे ‘वेळापत्रक’ बनवायचो. आणि ते पाळण्याचा संकल्प करायचो. पण चुकून एकदाही तो संकल्प पूर्णत्वास गेला नाही. इतरांचे पाहून वर्षाच्या सुरवातीला मी देखील नवीन गोष्टींचे ‘संकल्प’ सोडायचो. आणि सुरवात व्हायची. काही दिवसांनी ‘संकल्प’