सायकल चालवणं तस नवीन नाही. बऱ्याच दिवसांपासून ठरवलेलं. परंतु अनियमितता होती. शेवटी गेल्या दोन दिवसांपासून सायकलपुराण सुरु झालं. (more…)
टॅग: कंपनी
लाडोबा
लाडोबा ऑफिसात पाऊल टाकतो. आपल्या उरल्या सुरल्या केसांची ठेवण ठीक करीत, ‘ए’कारांत शब्दांची उधळण सुरु करतो. डेस्कवर बसताच त्याला झालेल्या कामाची यादी हवी असते. पाणी प्यायचे असते, पण उठून घेण्याची ‘इच्छा’ नसते. आणि मग त्याचे ते डोळेरूपी घुबडांची भीरभीर सुरु होते. आणि त्या घुबडांना एखादे सावज दिसले. की तोंडाची लढाई सुरु. मग समोर कोणीही असो. ह्याला पाणी आणून देण्यासाठी आर्जव. का तर म्हणे घरी देखील हातात पाणी दिल्याशिवाय हा पीत नाही. जेवतांना देखील तसेच. म्हणजे डबा का आणत नाही? हा मला न सुटलेला प्रश्न. (more…)
शतक
आजचा दिवस एकदम मस्त आहे. आज माझी बाईकचा वेग वाढला. वाढून ‘शतक’ ठोकले. गेले पंधरा दिवसात सर्वात जास्त वेग ताशी ऐंशी किमी. पहिले चार -पाच दिवस तर ताशी साठ किमीपेक्षा अधिक होतच नव्हती. माझ घर ते कंपनी बावीस किमी अंतर आहे. तस् हायवे जातो त्यामुळे एकूण अंतरात फक्त सात सिग्नल. त्यात पीसीएमसी मध्ये तीन आणि पुण्यात आल्यावर चार सिग्नल. मोजून पस्तीस मिनिटे लागतात. जाम मजा येते बाईक चालवतांना. तसे मी काही ‘धूम’ वगैरे नाही. माझा माझ्या मनावर आणि बाईकवर कंट्रोल असतो. एकटा असल्याने बाईकचा वेग वाढवायला काही चिंता नसते. (more…)
प्यार किया तो..
म्हणजे आधीच म्हणणार होतो. पण.. राहू द्या. आता मी कंपनीत येतांना बाजूच्या इमारतीसमोर दोन कबुतरांना गुटर्गू करतांना पहिले. ही गोष्ट मला आता नवीन राहिलेली नाही आहे. पुण्यातच काय सगळीकडे अस चालते. काय करणार? कंपनीच्या डाव्याबाजूला थोड्याच अंतरावर कावळ्यांचे कॉलेज आहे. त्याच्या थोड पुढे गेले की, ब्रिगेडीयरांनी केलेल्या भीम पराक्रमाने पावन झालेली एक वास्तू. त्याही थोड पुढे गेले की, एक नावाजलेलं इन्स्टिट्यूट. इकडे कंपनीच्या उजव्या बाजूला खोक्यातील हिरो हिरोईनचे इन्स्टिट्यूट. त्याच्या आणखीन थोड पुढे गेल की चिमण्यांचे कॉलेज. (more…)
वर्ष
वर्ष! काय दिवस होता कालचा! सही! मागील वर्षी म्हणजे सात डिसेंबर २००९ला ही कंपनी जॉईन केलेली. थोडक्यात वर्ष झाले. काय बोलू? हे एक वर्ष म्हणजे ‘पिकनिक’ होती. म्हणजे तशी अजूनही चालू आहे. ते म्हणतात ना ‘नाव मोठ आणि लक्षण खोट’ तसं अगदी. कंपनीच्या इमारती आणि इथल्या सुविधांबद्दल काहीच वाद नाही. अतिशय उत्तम आहे. परंतु इथली जत्रा पाहून अचंबा वाटतो. मागील सात डिसेंबर २००९ ला सकाळी सव्वा सातला आलेलो. आठ वाजता येण्याचे सांगितलेलं. मस्त धुक्यात टिवल्या पावल्या केलेल्या. पुढचा इतिहास उगाळत नाही. पण एकूणच छान अनुभव. तो दिवस आणि कालचा दिवस. खर तर कालच या विषयावर बोलणार होतो. परंतु, तो माझा सखा उर्फ लॅपटॉप कोमात असल्याने गेल्या काही दिवसांपासून इच्छा असून बोलता येत नाही. काल अप्सरा आणि मी ब्रेक आउट रूममध्ये जवळपास पंधरा एक मिनिटे बोलत होतो. (more…)
हे क्षण
हे क्षण! काय बोलू अस झालं आहे. नुसतेच रोमांच सगळया शरीरभर उठत आहे. नुसते क्षण आठवून ही अवस्था आहे. प्रत्यक्ष असेल त्यावेळी! ऑफरसाठी एका कंपनीने फोन केला होता. म्हणजे थोडा जॉईनिंग डेटचा घोळ चालू आहे. काळजी नसावी दोन एक दिवसात त्याचा निकाल लागून जाईल. पण आता का कुणास ठाऊक तिची इतकी ओढ वाढली आहे ना! कालचा दिवस तिने इतका छान केला ना. तिचे ते इमेल. काय कळेनासे झाले आहे, ज्यावेळी ज्याची गरज असते ते तिला कळून जाते. गेले काही दिवसांपासून मी खुपच बैचेन झालो होतो. काल सकाळी सगळंच संपले अस वाटू लागलेलं. खुपंच मूड गेलेला. तीचा ते तीन इमेल आले. आणि सगळ् बदललं. (more…)