काल या नव्या कंपनीचा पहिला दिवस होता. आता दिवस म्हणू की रात्र? म्हणजे नाईटशिप होती. दिवसच मस्त होता. खर तर त्या कंपनीत जायची इच्छाच नव्हती. आणि मी काही आनंदी वगैरे नव्हतो. सकाळी लवकर उठून आवराआवर करायला सुरवात केली. मग लक्षात आले, आज पासून आपली कंपनी बदलली. मग मुडच गेला. पण नंतर ज्यावेळी जाग आली त्यावेळी तिचा ‘ऑल द बेस्ट’चा एसएमएस. त्यानंतर खूप मस्त! (more…)
टॅग: दिवस
३१ डिसेंबर
काय दिवस होता. कधीही आयुष्यात हा दिवस विसरणे शक्यच नाही. आणि खर बोलायचे तर मलाही विसरायचा नाही हा दिवस. मला माहिती आहे. जे घडायचे होते तेच घडले. पण ते ज्या पद्धतीने घडले, ते तसे घडेल अस कधीच वाटले नव्हते. आणि माझी तिला मनातलं सांगायची देखील इच्छा पूर्ण झाली. मला माहिती आहे, हे सांगायला खुपच जास्त वेळ गेला. कदाचित कधीच बोलू शकलो नसतो. आणि मनात राहून कुढत बसलो असतो. पण हे सर्व, जे घडले याचे श्रेय फक्त तुम्हालाच आहे. खरच तुम्ही नसता तर ‘काहीच’ घडल नसत. आणि तिच्याबद्दल काय बोलू? तीच मन खरच खूप मोठ आहे. (more…)
दिवस असा की
काय बोलावं अस झालं आहे. आजचा दिवस! सर्वात सुंदर दिवस. मला आता नाही रहावत. मी बोलून मोकळा होतो. मला खरंच, नाही आता कंट्रोल. खूप दिवसांनी सकाळी उठून पळायला गेलो. आवरून पहिल्या इंटरव्यूसाठी गेलो. या कंपन्या सुद्धा असले अर्धवट पत्ते देतात. दोन किमी पायपीट करावी लागली. कंपनी फार काही खास नव्हती. ते नेहमीप्रमाणे बराच वेळ बसून राहावे लागले. त्या कंपनीची एच आर ने दहा जणांमध्ये सुरवात माझ्यापासून केली. असो, सध्याच्या कंपनीची ‘महिमा’. आता पहिल्याच राउंडला एच आर कशी आली कुणास ठाऊक. बर ती ‘ताई’ जरा जास्तच करीत होते. काय बोलायचे आणि ही काय बोलत होती. मला म्हणाली ‘तुझ्यातील एक कमतरता सांगू का?’. आता मी ह्या ताईला ‘नाही’ अस का म्हणेन? मला म्हणाली, ‘तू शॉर्ट टेम्पर आहेस’. काय बाई होती, चेहरा पाहून चक्क ‘खोटे भविष्य’. मी नाही म्हटल्यावर, तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. (more…)