खर तर खूप गोंधळलो होतो. निवड कोणाची करावे हेच कळत नव्हते. पण, निर्णय घेतला आहे. खर तर मागील महिन्याच्या म्हणजे १३ फेब्रुवारीला मी माझा ‘होकार’ एका स्थळाला कळवला. आणि त्या मुलीनेही १४ फेब्रुवारीला तिचा होकार कळवला आहे. हाहा! काय बोलू यार मी? तिला माझ्याबद्दल काय माहिती आहे देव जाणे. आणि मी तर तिला एकच प्रश्न विचारलेला. नुसत्या तीस मिनिटांच्या बेसवर हा निर्णय घेतला आहे. (more…)
टॅग: निवड
अगदी छान
अगदी छान, छान काय खूपच छान वाटत आहे. ती आता माझ्या डेस्कवर आली होती. काय करू आणि काय नाही अस झाल आहे. सर्वात सुंदर!!! नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान! अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. माझा मित्र मला नाश्ता करायला बोलावत होता. त्याला थोड्या वेळ थांब म्हणालो. ती जस जशी माझ्या डेस्ककडे येत होती. तसं तशी, माझी हालत खराब होत होती. तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. आज तिने इतक्यांदा पिंग केल आहे ना! मला मी हवेत असल्याप्रमाणे वाटत आहे. (more…)