टॅग: मराठी

फक्त मराठीच

बऱ्याच दिवसांनी अचानक प्रकट होतो आहे. मोठ्या मनाने क्षमा कराल अशी अपेक्षा करतो. अनेक दिवसांपासून मनात एक विचार घोळतो आहे. भाजप-शिवसेनेचे लफडे पाहून पार विटून गेलेलो. अस वाटलेलं नेमक कोण मूर्ख. आपण की ते? असो, गेले काही महिन्यांपासून निरीक्षण करतो आहे. जेव्हापासून ‘मोदी लिपीत’ देशाचे व्यवहार सुरु झालेत. तेव्हापासून हे गुज्जूभाई. अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत स्पष्ट मराठीत व्यवहार करायचे. आता काय करणार. दुधावाल्यापासून ते किराणा. इस्त्रीपासून ते मिठाईवाल्यांपर्यंत हेच भय्या. फक्त केस कापणारा देवकृपेने मराठी. आजकाल हे सगळे अचानक ‘हिंदीत’ सुरु झालेत. गझनी चित्रपटातील गझनीने ह्यांची ‘मेमरी’ लॉस केली काय, देव जाणे.
(more…)

बाळासाहेब ठाकरे

काय बोलू! अगदी असह्य होतंय. अगदी ती, बाळासाहेब नसण्याची बातमी आल्यापासून ते आतापर्यंत सगळंच.. माहिती नाही का, पण त्या महान व्यक्तीच्या नसण्याच्या गोष्टीने अगदी असुरक्षित वाटत आहे. खर तर एक गोड बातमी तुम्हाला सांगणार होतो. पण हे अस घडलंय की..घराचाच आधारस्तंभ कोसळल्याप्रमाणे वेदना होत आहेत. त्या महामानवाबद्दल काय बोलावं, काय सांगाव. (more…)

हरकत नाय…

माझे ब्लॉग, लेख चोरी जात आहेत. पण ‘हरकत नाय’. खरच! काही हरकत नाही. ‘सीपी’ करण्यात काहीही हरकत नाही. स्वतःच्या नावाने माझ्या नोंदी प्रसिद्ध केल्यास तरी काही हरकत नाही. नो कॉपी राईट!!! काहीही करा. पण ‘मराठी’ वाढवा. माझे लेख चांगले वाटले असतील तर, त्यांना काहीतरी अर्थ आहे अस वाटत असेल तर बिलकुल ‘नावाचा’ विचार करू नका. त्यातून थोडेफार ‘अर्थार्जन’ होणार असेल किंवा तुमच्या ब्लॉगची हिटिंग वाढणार असेल तर उत्तमच. आता ती गोष्ट वेगळी की, माझा ‘ब्लॉग’ हा त्यासाठी कधीच नव्हता आणि नाही आहे. आणि कधीच तसा नसेल. (more…)

पण

हो खरंच! मी मराठीच आहे पण, माझ्या ट्विट्स आणि फेसबुकवरील सर्व स्टेटस ‘इंग्लिशमधून’ असतात. कॉमेंट्स देखील मी ‘इंग्लिश’ मधून टाकतो. त्यासाठी मराठीचा वापर करीत नाही. काय बुवा! आता नेटवरही मराठी मराठी कशाला? माझी ‘सही’ देखील मराठीत नाही. मी लिखाण सुद्धा मराठीत करीत नाही. परंतु मी मराठी आहे. मी गप्पा देखील मराठीत करीत नाही. आणि कंपनीत तर छे बुवा! कुठे पण मराठी कसं बोलायचे? आता सिनिअर लोक मराठी कुठे आहे? आणि ‘हिंदी’ बोललं तर बिघडलं कुठे?. (more…)

या पुढे विरोध नाही

या पुढे विरोध नाही. जवळपास एक वर्ष, जी लोक मला एक व्यक्ती म्हणून आणि एक सहकारी म्हणून आवडत नव्हती. त्याच्या बद्दलचा खूप राग कमी झाला. ते केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या प्रेममुळेच. आपल जर खरच कोणावर प्रेम असेल ना तर आपण त्या साठी काहीही करायला तयार असतो. मग आपली भाषा , प्रांत, हे काही आडवे येत नाही. कारण त्यात फक़त प्रेम असते, स्वार्थ नाही. (more…)