टॅग: मोबाईल

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा हे नाव मजेशीर वाटेल. परंतु खरोखच अनेक अंधश्रद्धा आपल्याला आपल्या मोबाईल फोन/भ्रमणध्वनी बाबत आहेत. अशाच काही अंधश्रद्धाबद्दल आज थोडी उहापोह करणार आहे. (more…)

सोशल मीडिया आणि व्यवसाय

सोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो. (more…)

लिफ्ट

मला दोन गोष्टी बिलकुलही पटत नाहीत. एक म्हणजे ‘लिफ्ट मागणे’. आणि दुसरे ‘भीक मागणे’. दोन्हीही गोष्टी जरी वेगवेगळया असल्या तरीही साम्य आहे. रोज रस्त्याच्या कडेला हे ‘दीन’करराव हात दाखवत उभे असतात. का कुणास ठाऊक, मेहनतीचा कंटाळा येतो! की लागलेली सवय! दुसऱ्याच्या मदतीवर विसंबून राहतात. भीक मागणारे भिकारी जसे नशिबाच्या समोर गुढगे टेकून, आपला आत्मसन्मान गहाण टाकून दुसऱ्यांकडे ‘याचना’ करतात. तसे हे ‘लिफ्ट’वाले, आळसासमोर गुढगे टेकून, कोणी तरी लिफ्ट देईल या आशेने रस्त्यावर उभे. (more…)

व्यसन

विश्वातील बहुतांश लोकांना कोणते न कोणते व्यसन जडलेले असतेच. कदाचित आश्चर्य वाटेल! परंतु, खरे आहे. साधारणतः ज्या सवयीचा, मग ती कोणतेही असो, त्या सवयीचा अतिरेक झाला की त्याला ‘व्यसन’ असे संबोधतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो. (more…)

योगायोग?

योगायोग आहे का काय चालले आहे हेच कळेनास झाल आहे. अस नेहमी नेहमी का घडते तेच कळत नाही. म्हणजे मागील आठवड्यात शुक्रवारी, एक कावळीण माझ्याकडे पहात चालली असते. माझ्या लक्षात आल्यावर मी तिच्याकडे पाहतो. ती मान खाली घालून निघून जाते. ती माझ्याकडे अशी का पहात होती याचा मी विचार करीत चाललो असतांना, पुन्हा एकदा ती तशीच माझ्या समोरून जाते. थोडक्यात ‘एक्शन रिप्ले’. आता हा जो ‘एक्शन रिप्ले’ घडला ना, तो इथे जॉईन होण्याच्या खूप आधी म्हणजे बहुतेक जून वगैरे महिन्यात स्वप्नात पाहिलेला. त्यावेळेसही मी स्वप्नात हाच विचार करीत होतो. (more…)

नशीब

नशीब! ते म्हणतात ना ‘नशिबच गांडू तर काय करील पांडू’ तस झाल आहे अगदी! गेल्या दोन तीन महिन्यांपासून हे चालू आहे. मी जी गोष्ट करायला जातो ती होते, पण ताबडतोप किंवा एका झटक्यात होत नाही. म्हणजे ही अशी पहिलीच वेळ आहे. याआधी अस कधी घडल नव्हते. म्हणजे कंपन्या माझा इंटरव्यू घ्यायच्या आणि इंटरव्यू व्यवस्थित व्हायचे. परंतु नंतर पुन्हा त्यांचा फोन येत नसायचा. मग महिन्यानंतर, फोन! (more…)