टॅग: सुदामा

कृष्णलीला

कृष्णलीला! सुदामा पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागतो. नवीन कंपनीत कोणीच मित्र नसल्याने तो एकटा रहात असतो. कंपनी आणि घर हाच काय तो दिनक्रम. दोन-अडीच महिन्याने त्याची ओळख एका ‘कृष्ण’ सोबत होते. हळू हळू मैत्री वाढते. तसा कृष्णही भारीच असतो. दुसऱ्याच महिन्यापासून ‘लीला’ दाखवायला सुरवात करतो. एके दिवशी सुदामा काम करीत असतांना त्याच्या डेस्कवर येतो. सुदामा आनंदाने त्याच्याशी गप्पा मारायला सुरवात करतो. खर तर कृष्णाला सुदामाच्या मानाने दीडपट पगार. पण तरीही ‘मदत’ मागतो. सुदामाने कारण विचारल्यावर, ‘मला तुझ्या बँकमधील अकौंट असलेल्या माझ्या बाबा वासुदेवांना गावी पैसे हवे आहेत. माझ्या बँकेने पाठवले तर, वेळ लागेल. तू पाठव. मी हवं तर दुपारीच पैसे वापस करील’ अस कृष्ण सुदामला सांगतो. सुदामा कृष्णाच्या या अडचणीत त्याची मदत करायचे मान्य करतो. आणि ताबडतोप पैसे वासुदेवाच्या अकौंटमध्ये टाकतो. (more…)