टॅग: जंगल

एक थी मांजर

एका जंगलात एक ‘वाघ’ रहात होता. तसे इतर अनेकही प्राणी राहायचे. वाघाच्या समोर कुणाचेही काही चालत नसायचे. काही प्रेमापोटी, तर काही भीतीपोटी त्याचे म्हणणे ऐकायचे. तसा वाघ खूपच प्रेमळ. जंगलातील प्राण्यांच्या, जंगलाच्या  भल्यासाठी तो कायम तत्पर असायचा. तसं म्हटलं तर जंगलात राज्य ‘गिधाडांचे’. त्यामुळे सर्वच प्राणी त्रासलेले. पण, वाघामुळे त्यांना आधार वाटायचा. वाघ जोपर्यंत आहे. तोपर्यंत कशाचीही काळजी नाही. कारण गिधाडांचा फडशा फक्त वाघोबाच पडू शकत होता. तो असला की, गिधाडे जंगलात सुद्धा फिरकत सुद्धा नसत. (more…)

भेडीया

एका जंगलात एक भेडीया रहात असे. जंगलातील, सर्व प्राण्यांच्या बित्त ‘बातम्या’ तिला माहित असत. सिंह कोणाची शिकार करतो. ससे, हरणे परिवारातील कोणकोणत्या सदस्यांवर ससेमिरा चालू आहे. जंगलातील कुत्री कोणाकोणाकडून हप्ते गोळा करतात. अगदी, मुंगीचे कितवे बाळपण होते, इथपर्यंत सर्वांची माहिती. राजा सिंहाच्या गुप्तहेरांना देखील जी माहिती उपलब्ध नसे ती माहिती भेडीयाकडे असे. ती रोज सकाळी जंगलातील घडलेल्या महत्वाच्या बातम्या एका चौकोनी आणि उंच शिळेवर उभे राहून कथन करीत असे. आणि त्या महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी जंगलातील सर्व प्राणी रोज त्या शिळेस समोर गोळा होत असत. (more…)