तो शांत आणि ती मस्तीखोर. तो कायम घरात असतो. ती कायम घराबाहेर. तो खर्च वाचवणारा. ती वेळ वाचवणारी. परंतु दोघेही कामसू. त्याला सॉफ्टवेअरचे वेड आणि तिला रस्त्यावरून फिरायचे. त्याला मैत्री करायला जमते. ती कोणाशीच जुळवून घेऊ शकत नाही. तो व्हर्चुअल जगात रमणारा. कल्पना करणे. त्या कल्पना सत्यात उतरवण्याची किमया साकारणारा तो किमयागार. (more…)
टॅग: ती
ती ती आणि ती
ती! काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय नाही सुचत काही. ती इतकी छान, गोड का आहे? आणि स्वभावाने इतकी प्रेमळ आणि सरळ. तिची खूपच आठवण येत आहे. मला नव्हते घरात करमत. म्हणून आज, मी ऑफिसला आलेलो आहे. (more…)