आपल्याला राष्ट्रीय पक्षी माहिती असेलच. आज आपण, राष्ट्रीय प्राण्यांची ओळख करून घेऊ. गेल्या वर्षीच्या एकूण आढावा व ओळख घेऊन आज या राष्ट्रीय प्राण्याची निवड केलेली आहे. आता जसा चित्रपटात ‘ऑस्कर’ हा पुरस्कार मानला जातो. तसे देशातील तमाम प्राणी समुदायात, या ‘राष्ट्रीय प्राणी पुरस्कारा’ला आगळे वेगळेच महत्व आहे. (more…)
टॅग: प्राणी
द बॉस
जगातील सर्वात भयानक प्राण्यांमध्ये ‘बॉस’ हा प्राणी गणला जातो. काही वैज्ञानिकांच्या मते, डायनासोरपेक्षाही हा भयानक प्राणी आहे. हा प्राणी कंपन्यामध्ये आढळतो. हा प्राणी जणू दिसायला सर्वसामान्य असला तरी फारच भीतीदायक असतो. हा प्राणी, साधारणतः केबिनमध्ये बसून कंपनी नावाचा रथ हाकत असतो. रथाला जुंपलेले घोडे, त्याच्या भाषेत ‘गाढवं’ तो रथ रक्ताचे पाणी करून ओढत असतात. परंतु नेहमी त्याला कामाचा घडा अर्धा रिकामाच दिसतो. (more…)
रानडुकरे
या रानडुकरांची काय कथा वर्णावी? ही रानडुकरे सतत शहरात इकडून तिकडे यथेच्छ संचार करीत असतात. कुठूनही कसेही आणि कधीही हे निघतात. वाटेल तिथे, हवे तसे उभा राहतात. भर रस्त्यात ह्यांना सावज दिसलं की, हाणलाच ब्रेक. आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ ह्यांना अधिकच बेकाबू करते. तसे नियम त्यांना लागू होत नाहीत की, ते नियम ह्यांना नकोसे असतात. हे त्या आरटीओ नावाच्या परमेश्वराला माहित. अस नाही की माझ्यासारखे ‘घोडेस्वार’ फार गुणी असतात वगैरे. सर्वच घोडेस्वार नियम पाळतात अस मुळीच नाही. परंतु, चुकीची शिक्षा स्वतः भोगतात. पण तस् ह्या रानडुकरांच नाही. आणि या पुण्यात इतका सुळसुळाट झालाय न या रानडुकरांचा की, बोलायची सोय नको. (more…)