गेले काही दिवस हा प्रश्न राहून राहून मनात येतोय. आपण एखादी गोष्ट करतो. का? अस विचारल्यावर काहीतरी उत्तर नक्कीच असतं. म्हणजे, सकाळी उठल्यावर दात घासतो. का दात घासतो? अस विचारल्यावर, उत्तर पटकन येईल की, दात स्वच्छ राहावेत म्हणून. कंपनीत जाऊन काम कशाला करतो? उत्तर येईल पैसे कमावण्यासाठी. अशा एक न अनेक गोष्टी करतांना, त्यामागे कारण असते. पण आपण गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या का करतो? अस विचारल्यावर अस कुठलंच उत्तर मनात पटकन येत नाही. (more…)
टॅग: फ्लेक्स
फ्लेक्स
मी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा असतो. स्टॉपच्या समोरच्या बाजूला एक इमारतीचे चित्र असलेले जाहिरातीचे फ्लेक्स असते. ‘तुमचे स्वप्न साकार करण्याची संधी’ अस काहीस लिहिलेलं असते. बस येते. बस निघाल्यावर प्रत्येक चौकाचौकात वेगवेगळया बिल्डरांची अगदी अनाकलनीय बॅनर/भित्तीपत्रके असतात. एका बिल्डरची जाहिरातीत संध्याकाळची वेळ, एक मुलगी शेतात दोन्ही हात लांब करून पाठमोरी उभी आहे. बाजूला लिहिले असते ‘युअर ड्रीम होम’. त्याच्या बाजूलाच दुसऱ्या बॅनरवर एक तरुण हसऱ्या चेहऱ्याने, कदाचित बाजूच्या दोन लहान मुलांचा बाप असावा. त्याच्या दोन मुलांसोबत गोट्या खेळतांना. बाजूला लिहिले असते ‘कंट्रीयार्ड’. बस पुढे निघते. (more…)