कलाम काय बोलावं? सांगा आता कुणाला सांगाव? आता ‘अपेक्षा’ कुणाकडून करावी? ‘सोनिया’च्या सरकारने महागाईचा नांगर फिरवला. घोटाळे, करवाढ, भाववाढ!! त्यात आमच्या ‘ताई’ची प्रतिभा काय वर्णावी? स्वतःच्या पोराबाळांनापासून नातवंडांनापर्यंत सगळ्यांकडून ‘जगाचा भूगोलाचा’ अभ्यास गिरवून घेतला. परवाच्या निवडणुकीत पुत्ररत्न कोटींचा दानधर्म करतांना पोलिसांना ‘घावले’ म्हणे! काय महिमा म्हणावा घराण्याचा! कुमारी ‘मीरा’ आपल्या लाडक्या ‘कान्हाला’ शोधण्यात कोटी दस कोटी अर्पण केलेत. कुणास ठाऊक ‘कान्हाचे’ दर्शन घडले की नाही! आता याच्यापुढे कुणी किती आणि कसे उपकार केलेत याच वर्णन करू?? (more…)
टॅग: राष्ट्रपती
आदर्श
प्रिय ‘सोनियाच्या अंगणातील’ फुलांनो, आयुष्यात एखादा तरी ‘आदर्श’ असावा. आता आमच्याही पिताश्रींनी ‘आदर्श घे’ असे अनेकदा सांगितले. पण आम्ही कधीही तसा घेतला नाही. पण आता सर्व सारासार आणि ‘अर्थ’पूर्ण विचार केला आहे. याआधी देशाचा विचार करतांना ‘अर्थ’ला हीन समजत होतो. कदाचित, तुम्हीही हे ‘पाप’ केले असेल. पण आता न्यूनगंड सोडा. उठा राष्ट्रवीर हो! सज्ज व्हा, आणि जमेल तितके, शक्य होईल तितका ‘शिष्टाचार’ करा. ‘यस वी क्यान’ अस कोणी तरी मुंबईत मध्यंतरी बोललेलं. हो! मी ‘राजा हिंदुस्तानी’चा आदर्श घ्यायचे ठरवले आहे. सतराशे कोटीचे ‘अर्थ’पूर्ण काम तमाम केले. पहा, याला म्हणतात ‘सो कलमाडी की आणि एक राजा की’. तसे या आदर्शवादी मायबाप सरकारने खरंच एक मोठा ‘आदर्श’ निर्माण केला आहे. सर्वच आदर्शमंत्री लोकांचे सरकार आहे. (more…)