टॅग: लग्न

लग्नाआधी आणि नंतर…

लग्ना आधीच जीवन आणि लग्नानंतर होणारा जीवनातील बदल, यातील सुखी कोणते वगैरे गोष्टी कदाचित वादाचा विषय होवू शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर यात फरक असतो. जर फरक पडलेला नसेल. तर मग ‘अवघड’ आहे. (more…)

विषय लग्न

मी खरच खूप कंटाळलो आहे, या लग्न विषयाला. आजकाल जो पहाल तो, हाच एक विषय चघळत असतो. माझ्या नातेवाईकात आणि घरी जणू हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्या प्रमाणे चर्चा. बर कितीदा अस खोटे खोटे आनंदी आहे दाखवायचे?. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत होता. पूजा गाडीची, आणि हा बोलतोय काय? त्याच्याकडे पाहिल्यावर हसायला लागला. बहिणाबाई तर विचारूच नका. एखाद्या कार्यक्रमात गेली की, येतांना एखादी आवडलेल्या मुलीची माहिती घेऊन येते. जवळपास सर्वच नातेवाईकांना हा ‘छंद’ जडून गेला आहे. (more…)