टॅग: व्यायाम

सायकल

सायकल चालवणं तस नवीन नाही. बऱ्याच दिवसांपासून ठरवलेलं. परंतु अनियमितता होती. शेवटी गेल्या दोन दिवसांपासून सायकलपुराण सुरु झालं. (more…)

दिनक्रम

दिनक्रम ही अशी गोष्ट आहे की जी जीवन बदलून टाकते. काहीवेळा आयुष्य देखील उलथवून टाकू शकते. दिनक्रम खरं तर पाळणे खूपच अवघड गोष्ट आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडून पाळला जातो आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीपर्यंत मी जी गोष्ट ठरवायचो ती ठरल्याप्रमाणे होणार नाही अशीच परिस्थिती होती. पण आता बऱ्यापैकी त्यावर मात केली आहे. (more…)

व्यायाम

अनेकदा अनेक कल्पना आपल्या डोक्यात येतात. पण कधी वेळेअभावी तर कधी आळसामुळे ठरवलेली गोष्ट पूर्ण करता येत नाही. खरं तर या विषयावर खूप आधीच बोलणार होतो. पण अशाच एका गोष्टीला वाव देऊ शकत नव्हतो म्हणून थांबलेलो! गेले चार दिवसांपासून व्यायाम सुरु केला आहे. खूप दिवसांनंतर ही इच्छा पूर्ण होते आहे. (more…)

दिशा आणि दशा

दैनंदिन कामाच्या गराड्यात आपण आपल्यालाच विसरून जातो! दिशा नसतेच! आपल्याला काय करायला हवे वा आपल्याला जे करायचे असते ते न होताच आपण गुंतून पडतो. कधीकधी कामाचा व्याप एवढा वाढतो की आपण जे ठरवलेलं असत ते देखील विसरून जातो! अगदी आठवीपासून न चुकता अर्थर्वशीर्ष, रामरक्षा व मारुतीस्तोत्र म्हणायचो! गेल्या वर्षभरापासून ते कामामुळे रोजच राहून जायचं. पुन्हा सातत्य यायला वर्ष गेलेलं. (more…)

ती जागा..

‘ती जागा’ मला रिकामी हवी आहे. कस बोलू? काय सांगू? मला खरंच तो विषय उफाळून आलेला आहे. अस का होत आहे? तो विषय मी ‘कोळसा’ करायचं ठरवलं. मी माझ्या कोणत्याही गोष्टीसाठी सारवासारव करीत नाही. मला तो विषय संपवून टाकायचा आहे. माझ्या भावी जोडीदाराचा त्यावर हक्क आहे. पण तो विषय आहे की अजूनही विस्तवाप्रमाणे धगधगतो आहे. हवेची झुळूक येते. आणि विस्तव पुन्हा पेटतो. ती आग भडकावतो. मला खरंच नाही सुचत आहे. डोक खरंच फुटायची वेळ आली आहे. माझ्यातील निर्णय क्षमता आणि निर्णय घेतल्यावर त्यावर अंमलात आणायची ताकत संपली आहे की काय याची शंका येत आहे. (more…)

बाईक घेतली

एक आनंदाची बातमी द्यायची आहे. शेवटी दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तिची ‘चाक’ माझ्या घराकडे वळली. तिची म्हणजे बाईक ची. मी मागील डिसेंबरच्या सोळा तारखेला तिला म्हणजे हिरो होंडा पॅशन प्रो बुक केलेली. आज माझा मित्र आणि मी तिला आणायला गेलेलो. आकाशी रंगाची, ती सकाळी आकाराच्या सुमारास शोरूम मधून घेतली. घरी आल्यावर तिची पूजा केली. या कार्यक्रमाला ‘प्रमुख पाहुणे’ ‘अआई’ होती. इमारतीच्या गच्चीत बसून त्यांनी ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली. माझ्या मित्राने पूजा सांगितली. तसे दोन देडफुटे या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे स्थळ माझ्या इमारतीच्या बाजूला जोडून असलेले साई मंदिरा समोरील जागा. (more…)