टॅग: कायदा

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत माझे मत! कोणत्याही मुद्याला दोन बाजू असतातच. प्रत्येकजण आपली मते आपल्या अनुभवावरून बनवतो! त्यामुळे कोणतीही बाजू चुकीची नसते! असे निदान मी तरी मानतो! (more…)

कायदा आणि आपण

खरं तर कायदा बद्दल काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे? (more…)