हो खरंच! मी मराठीच आहे पण, माझ्या ट्विट्स आणि फेसबुकवरील सर्व स्टेटस ‘इंग्लिशमधून’ असतात. कॉमेंट्स देखील मी ‘इंग्लिश’ मधून टाकतो. त्यासाठी मराठीचा वापर करीत नाही. काय बुवा! आता नेटवरही मराठी मराठी कशाला? माझी ‘सही’ देखील मराठीत नाही. मी लिखाण सुद्धा मराठीत करीत नाही. परंतु मी मराठी आहे. मी गप्पा देखील मराठीत करीत नाही. आणि कंपनीत तर छे बुवा! कुठे पण मराठी कसं बोलायचे? आता सिनिअर लोक मराठी कुठे आहे? आणि ‘हिंदी’ बोललं तर बिघडलं कुठे?. (more…)