टॅग: छान

अगदी छान

अगदी छान, छान काय खूपच छान वाटत आहे. ती आता माझ्या डेस्कवर आली होती. काय करू आणि काय नाही अस झाल आहे. सर्वात सुंदर!!! नाही ती ‘अप्सरा’ नाही, एक सुंदरतेचा आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. माझी ‘निवड’ मुळीच चुकीची नाही. शुक्रवारी तिला मी दिलेला पेन ड्राईव्ह परत करायला. किती छान! अजूनही ती इथेच असल्याचा भास होतो आहे. तिने मला पिंग करून ‘मी तुझ्या डेस्कवर येत आहे. पेन ड्राईव्ह रिटर्न करायला’. माझा मित्र मला नाश्ता करायला बोलावत होता. त्याला थोड्या वेळ थांब म्हणालो. ती जस जशी माझ्या डेस्ककडे येत होती. तसं तशी, माझी हालत खराब होत होती. तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. आज तिने इतक्यांदा पिंग केल आहे ना! मला मी हवेत असल्याप्रमाणे वाटत आहे. (more…)

दिवस असा की

काय बोलावं अस झालं आहे. आजचा दिवस! सर्वात सुंदर दिवस. मला आता नाही रहावत. मी बोलून मोकळा होतो. मला खरंच, नाही आता कंट्रोल. खूप दिवसांनी सकाळी उठून पळायला गेलो. आवरून पहिल्या इंटरव्यूसाठी गेलो. या कंपन्या सुद्धा असले अर्धवट पत्ते देतात. दोन किमी पायपीट करावी लागली. कंपनी फार काही खास नव्हती. ते नेहमीप्रमाणे बराच वेळ बसून राहावे लागले. त्या कंपनीची एच आर ने दहा जणांमध्ये सुरवात माझ्यापासून केली. असो, सध्याच्या कंपनीची ‘महिमा’. आता पहिल्याच राउंडला एच आर कशी आली कुणास ठाऊक. बर ती ‘ताई’ जरा जास्तच करीत होते. काय बोलायचे आणि ही काय बोलत होती. मला म्हणाली ‘तुझ्यातील एक कमतरता सांगू का?’. आता मी ह्या ताईला ‘नाही’ अस का म्हणेन? मला म्हणाली, ‘तू शॉर्ट टेम्पर आहेस’. काय बाई होती, चेहरा पाहून चक्क ‘खोटे भविष्य’. मी नाही म्हटल्यावर, तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. (more…)